वैशिष्टयपूर्ण तेल | आगळं! वेगळं !!!

वैशिष्टयपूर्ण तेल

त्यांचं नाव नाना आडनाव टकले, पण खरोखरीच ते टकले ही होते. साहजिकच त्यावर उपाय शोधण्याचा त्यांना छंदच जडला होता. विशेषतः निरनिराळ्या कंपन्यांच्या तेलाच्या जाहिराती वाचणं आणि त्यांची कात्रणे संग्रही ठेवणे हा त्यांचा उद्योगाच झाला होता.

संजय एका तेल कंपनीचा विक्रेता होता.
तो त्या दिवशी नानाकडे गेला. त्याने आपल्या कंपनीच्या तेलाची माहिती सांगून नानाला पटवायला सुरुवात केली. पण नाना कसले वस्ताद? त्यांनी त्याला काही लवकर दाद लागू दिली नाही.

नानांनी संजय पुढे त्यांच्याकडील कात्रणांची फाईलच टाकली. या तेलात अठरा जडीबुटी वापरल्या आहेत, या तेलाने एक महिन्यात केस यायला सुरुवात होते, अशी प्रत्येक तेलाची वैशिष्टये पटापट सांगून नाना संजयला म्हणाले, यातील कोणती वैशिष्टये तुमच्या कंपनीच्या तेलात आहेत?

त्यावर संजय म्हणाला, अहो नाना तुम्ही सांगता ती सर्वच्या सर्व वैशिष्टये आमच्या कंपनीच्या तेलात आहेतच, पण आमच्या कंपनीचा असा दावा आहे की, आमच्या कंपनीच्या तेलातील वैशिष्टया व्यतिरिक्त दुसरी कुठलीच वैशिष्टये इतर तेलात असणार नाहीत.

नाना आश्चर्यचकीत झाले, ते संजयला म्हणाले तुम्ही असा दावा कसा करू शकता? त्यावर संजय हसत उत्तरला, अहो नाना आमची कंपनी बाजारातील सर्व तेलांचे मिश्रण बनवून हे तेलं तयार करते.

0 Comments:

Post a Comment