जागरुक ग्राहक | आगळं! वेगळं !!!

जागरुक ग्राहक

"काय हो शेठ, यावेळी तुमच्या जाहिरातींचा कागद चांगला का नाही वापरला? नेहमी तर दर्जेदार असतो की." शहरातील प्रसिद्ध कापड दुकानात थेट मालकाजवळ जाऊन विसुभाऊ बोलते झाले.
"अरे या या विसुभाऊ, बसा इथे." अरे चहा घेऊन ये पाहू दोन. जाहिरातींच्या कागदाबाबत ही जागरुकता दाखविणारे ग्राहक भेटल्याने शेठ भलतेच खुष झाले.

चहा घेता घेता शेठ विसुभाऊंना म्हणाले,"त्याचं काय आहे विसुभाऊ, यावेळी त्या प्रेसवाल्याने चूक केली आहे, मी त्यांना बजावलंय की यापुढे खपवून घेणार नाही म्हणून. पण बाकी विसुभाऊ मी तुमच्या चोखंदळपणाला दाद देतो की, तुम्ही कागदाबाबत सुद्धा किती जागरूक आहात ते."त्यावर चहाचा कप खाली ठेवत विसुभाऊ उत्तरले, "मग हो, लिहायला पाठकोरे वापरतो म्हणून काय झाले? त्यासाठीही मला दर्जेदारच कागद लागतो!"

0 Comments:

Post a Comment