मोबाईलवर मिळवा फ्री एसएमएस | आगळं! वेगळं !!!

मोबाईलवर मिळवा फ्री एसएमएस

ज्या न्यूज, हेल्थ टिप्स, जोक्स, स्पोर्टस्‌ अशा सारख्या एसएमएस सर्विसेस मिळण्यासाठी मोबाईल ऑपरेटर दरमहा प्रत्येक चॅनल्ससाठी चार्जेस आकारतात, तेच एसएमएस चॅनल्स आपल्या मोबाईलवर फ्री मिळायला लागले तर तुम्हाला फार मजा येईल की नाही?

तुम्ही म्हणाल की हे कसं शक्य आहे? होय हे खरे आहे आणि शक्यही आहे. 'Googlesmschannels' ही एक पूर्ण मोफत मिळणारी सेवा आहे. त्यासाठी तुम्हाला काहीही शुल्क आकारले जात नाही. या सेवेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला प्रथम गुगलच्या http://labs.google.co.in/smschannels/browse या साईटवर भेट द्यावी लागेल.

तेथे तुमचे गुगल अकाऊंट व तुमचा मोबाईल नंबर देऊन साईनअप झाल्यावर, तुम्हाला एक व्हेरिफिकेशन कोड तुमच्या मोबाईलवर पाठविला जाईल. तुम्हाला मिळालेला कोड साईटवर विचारलेल्या ठिकाणी तुम्ही एन्टर केलात की साईनअपची प्रक्रिया पूर्ण होईल.

त्यानंतर तुम्हाला येथे बिजनेस, एज्युकेशन, एंटरटेन्टमेंट, फायनान्स, फूड, हेल्थ, जॉब्स, जोक्स, न्यूज, शॉपींग, स्पिरिच्युअल, स्पोर्टस, टेक्नॉलॉजी, ट्रॅव्हल्स, वेदर अशी चॅनल्सची भली मोठी यादीच दिसेल. त्यापैकी आपल्या आवडीचे चॅनल्स पाहून निवडून सबस्क्राईब करा.

याशिवाय तुम्हाला झटपट जर अधिक काहीतरी शोधायचे असेल तर सर्च बॉक्सची मदत घ्या. उदा. या पेजवरील 'सर्च फॉर चॅनल्स' या सर्च बॉक्स मध्ये तुम्ही जर टाईप केले marathi news तर मराठी न्यूज चॅनल्सची यादी आपल्यापुढे येईल. आणि तुम्ही जर ते 'मराठी न्यूज चॅनल्स' सबस्क्राईब केलेत तर, चक्क मराठी भाषेतील न्यूज तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळायला लागतील अगदी मोफत.

याशिवाय तुम्ही सबस्क्राईब झालेल्या चॅनल्सवर तुमच्या मित्रमंडळींनाही आमंत्रित करु शकता. येथील 'इन्व्हाईट युजर्स' या पर्यायाद्वारे एकाचवेळी जास्तीतजास्त पाच जणांना, त्यांचे मोबाईल नंबर या बॉक्समध्ये टाईप करून आमंत्रित करू शकता. आणि त्यानाही या मोफत सेवेत सामील करून घेऊ शकता.

त्यासाठी तुमचे आमंत्रण मिळालेल्या मित्रांनी ज्या चॅनल्सच्या नावाने आमत्रण मिळाले आहे त्या चॅनल्स च्या नावाने 'ON' असा फक्त एक एसएमएस 9870807070 या क्रमांकावर पाठवून प्रतिसाद देणे आवश्यक आहे. उदाहरण : 'ON AajTakMarathi' याप्रमाणे.

1 Comments: