गुगलच्या अ‍ॅडसेन्ससाठी प्रयत्न करताय? | आगळं! वेगळं !!!

गुगलच्या अ‍ॅडसेन्ससाठी प्रयत्न करताय?

जर तुमचा मराठी ब्लॉग असेल, आणि तुम्ही जर त्यावर जाहिराती मिळाव्यात म्हणून गुगलच्या अ‍ॅडसेन्ससाठी प्रयत्न करत असाल तर गुगलच्या अ‍ॅडसेन्स संदर्भातील काही धोरणांची माहिती होण्यासाठी हा लेख अवश्य वाचावा.


गुगलच्या अ‍ॅडसेन्स संदर्भात प्रायव्हसी पॉलिसी बाबत एका ब्लॉगवर एक लेख नुकताच वाचण्यात आला. त्या लेखामध्ये गुगलने अ‍ॅडसेन्ससाठी फक्त प्रायव्हसी पॉलिसी सक्तीची केल्याबद्दल उल्लेख आहे. ते बरोबर आहे. पण गुगलने त्याचसोबत .com किंवा तत्सम टॉप लेव्हलचे डोमेन नेमही सक्तीचे केले आहे याबाबत काहीच उल्लेख आढळला नाही. म्हणून त्याबाबत मी 'त्या' लेखाखाली सर्व वाचकांना माहिती होण्याच्या दृष्टीने प्रतिक्रिया दिली होती, परंतु तेथे आजपर्यंत तरी ती प्रतिक्रिया मला दिसली नाही. अर्थातच प्रतिक्रिया प्रसिद्ध करणे न करणे हा ज्याच्या त्याच्या मर्जीचा प्रश्न आहे हे ही आपण लक्षात घेतले पाहिजे.

असो तर गुगलने अ‍ॅडसेन्ससाठी ब्लॉगची भाषा इंग्रजी, प्रायव्हसी पॉलिसी बरोबरच .com किंवा तत्सम टॉप लेव्हलचे डोमेन नेमही सक्तीचे केले आहे ही वस्तुस्थिती आहे. उदाहरणार्थ:

-Unsupported Language
-Your website must be your own top-level domain (www.example.com and not www.example.com/mysite).
-You must provide accurate personal information with your application that matches the information on your domain registration.
-Your website must contain substantial, original content.

त्यामुळे १) ब्लॉगची भाषा इंग्रजीच पाहिजे, २) प्रायव्हसी पॉलिसी ब्लॉगवर असलीच पाहिजे व ३) .com किंवा तत्सम टॉप लेव्हलचे डोमेन नेमही असलेच पाहिजे या इतक्या व अजूनही काही जाचक अटीमुळे मराठी ब्लॉगर्सना नको ते गुगल अ‍ॅडसेन्स असे वाटले तर त्यात नवल वाटण्याचे काहीच कारण नाही.

आज घडीला मराठी ब्लॉग्सची संख्या भरपूर तर आहेच, परंतु दररोज त्यात मोठया संखेने वाढही होत आहे. आणि ब्लॉगची भाषा जरी मराठी असली तरी संपूर्ण विश्वातून वाचक मराठी ब्लोग्सना भेट देतात. आता हे तुम्हाला आम्हाला तर माहित आहेच पण गुगललाही याची जाणीव आहे. तरीही त्यांचे इंग्रजी प्रेम उतू जात आहे. खरे म्हणजे मनसे व शिवसेना यांनी हा मुद्दा हाती घेऊन गुगलवर मराठी भाषेतील ब्लॉग्जना जाहिराती देण्यासाठी दबाव आणायला हवा.( गंमतीने असही म्हणता येईल की, मनसे व शिवसेना यांच्या जर 'ई-शाखा' असतील तर त्यांनी त्यांच्या 'ई-स्टाईलने' 'ई-राडा' करायला काहीच हरकत नाही)

असो, गुगल अ‍ॅडसेन्सचे अकाऊंट मंजूर होत नाही म्हणून मराठी ब्लॉगर्सनी नाराज न होता गुगल अ‍ॅडसेन्सऐवजी Admaya चा पर्याय म्हणून विचार करायला हरकत नाही.

5 Comments:

  1. नमस्कार, माझ्या स्वत: कडे सुद्धा admaya चे अकांउट आहे,पण गेल्या वर्षभरात मी नेटवरती या admaya विषयी बरेच उलटसुलट "scam" ऐंकले आहे,म्हणून जाहीराती अजून वापरल्या नाही आहेत..तुम्हाला याच्या विषयी कसा अनुभव आहे ते नमुद करणे,म्हणजे मी त्या जाहीराती माझ्या ब्लॉग वर वापरायला सुरुवात करीन.
    http://www.icomplaints.in/admaya.in-is-a-big-scam-....please-dont-sign-04490.html
    धन्यवाद :-)

    ReplyDelete
  2. प्रशांतजी, मी ही केवळ गुगलला पर्याय म्हणून Admaya च्या जाहिराती आत्ताच लावल्या असल्यामुळे त्याबाबत तसे काही मत व्यक्त करणे उचित होणार नाही. आपल्या भेटीबद्दल धन्यवाद!

    ReplyDelete
  3. This comment has been removed by the author.

    ReplyDelete