धोनीकडून लाखो भारतीय क्रिकेटप्रेमींचा अपमान | आगळं! वेगळं !!!

धोनीकडून लाखो भारतीय क्रिकेटप्रेमींचा अपमान

कालच दोन बातम्या वाचण्यात आल्या. एक बातमी वाचण्यात आली त्यात धोनी म्हणतोय की "सचिनला वर्ल्डकप गिफ्ट करायचाय" विजेतेपदाचा चषक भेट करुन सचिनची शेवटची विश्वचषक स्पर्धा साजरी करु असं वक्तव्य त्याने केलंय. आणि त्याचसोबत दुसरी एक बातमी वाचली, "वर्ल्डकप सचिनपुरताच नाही" असं कपिलदेवचं मत आहे. पुढे कपिलदेव म्हणतो की, सचिन महान खेळाडू असून त्याने भारतीय क्रिकेटची अनमोल सेवा केली आहे, पण स्पर्धेत सचिन एकटाच खेळत नाही, संघापेक्षा तो नक्कीच मोठा नाही. कपिलदेवच्या ह्या स्पष्टवक्तेपणाला सर्वानीच 'दाद' आणि सादही द्यायला हवी.


यातील धोनीचे वक्तव्य बेजबाबदारपणाचे आणि भावनेच्या आहारी जाऊन केलेले आहे असे वाटते. सध्या काय झालय की, सचिनवर स्तुतिसुमने उधळण्याची स्पर्धा सुरु झाली आहे. यात कोणीही आपण मागे राहू नये याची पुरेपूर काळजी घेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. 

यात सचिनचा द्वेष करण्याचा उद्देश आहे अशातला भाग नाही, पण सचिनला 'भारतरत्‍न' द्या, वर्ल्डकप द्या, भारतीय क्रिकेट म्हणजे सचिन आणि सचिन म्हणजेच भारतीय क्रिकेट अशीच वातावरण निर्मिती सध्या सुरु आहे. हे म्हणजे पण अती झालं अन् हसू आलं असा प्रकार सध्या सचिनबाबत सुरु आहे. तेव्हा सचिन 'भक्तांनी ' सुद्धा क्रिकेट म्हणजे टीमवर्क आहे हे आधी लक्षात घ्यायला हवं. दुसऱ्या एकाही सहकाऱ्याशिवाय सचिन एकटा काहीतरी करु शकेल काय? याचा विचार करावा.

सचिन महान आहे याबाबत कुणाचेही दुमत नाही, पण आता जे काही करायचं ते फक्त त्याच्यासाठीच ही भूमिका इतर खेळाडूंच्या मनोधैर्यावर विपरीत परिणाम करु शकते. कपिलदेवच्या भाषेत सांगायचं तर तो इतर खेळाडूंचा अपमान होईल. 

धोनीने असं वक्तव्य करण्याआधी भारतातील लाखो क्रिकेटप्रेमींचा विचार करायला हवा होता, असं वक्तव्य करून त्याने देशाचा आणि सर्व क्रिकेटप्रेमींचा अपमान केला आहे. वर्ल्डकप ही काही एकट्या धोनीची जहागिरी नाही की, त्याने ती सचिनला बहाल करावी. या वर्ल्डकपवर हक्क आहे तो फक्त आणि फक्त लाखो भारतीय क्रिकेटप्रेमींचाच. जे तुम्हाला डोक्यावरही घेतात आणि निराश झाल्यावर तुमचे पुतळेही जळतात. जितका तुमचा स्वतःवर अधिकार नाही तितका ह्या लाखो भारतीय क्रिकेटप्रेमींचा तुमच्यावर अधिकार आहे. हेच तुमचे मायबाप आहेत हे धोनीनेच काय पण कुणीही विसरून चालणार नाही. 

तेव्हा आता एकच लक्ष्य "वर्ल्डकप जिंकायचा तो फक्त "लाखो भारतीय क्रिकेटप्रेमींसाठीच"

3 Comments:

  1. वा. अगदी मनातलं लिहीलंत तुम्ही. विश्वचषक सचिनला तर मग भारताला काय आणि क्रिकेट वेड्या भारतीयांना काय. सचिन मोठाच आहे, पण त्याला खूपच मोठा करतात लोक. कपिलदेव चा १००% बरोबर आहे. धोणीला थोडं विचार करून बोलायला हवं. भारतरत्नाचा तुम्ही विषय काढलात, तुमच्या सारखंच मत आहे माझं पण. अजून वेळेच्या कसोटीवर खरं उतरायचं आहे सचिनला. त्याने देशाला काहीतरी दिलं पाहिजे, खेळातील मनोरंजन सोडून. नुसत्या खेळाच्या जोरावर भारतरत्न काही योग्या वाटत नाही. सचिनला टीव्ही आणि जाहिरतींची खूप मदत झाली. गावसकर काही साधा खेळाडू नव्हता. त्याने तर वेस्ट इंडीज आणि ऑस्ट्रेलिया ची ७०-८० च्या काळातली गोलंदाजी खेळली. सचिनला खरं सांगायचं तर त्या क्षमतेची गोलंदाजी खेळावी लागली नाही. पण गावसकर ला पद्म भूषणच मिळू शकला. जर सचिनला पद्म विभूषण आहे तर गावसकरला पद्म विभूषण का नाही. त्यामुळे माझ्या मते तरी हे पद्मा पुरस्कार आणि भारतरत्ना देण्याची सुत्रं चुकीची आहेत.

    ReplyDelete
  2. याला "लाखो भारतीय क्रिकेटप्रेमींचा अपमान" म्हणणं म्हणजे फारच अतिशयोक्ती वाटते !!

    ReplyDelete
  3. अहो आता सगळ्या मॅचेस आधिपासुन फीक्स असतात. कशाला आपल्या डोक्याला त्रास करुन घ्यावयाचा.

    ReplyDelete