अनाहूत कॉल्स व एसएमएस पासून मुक्तता | आगळं! वेगळं !!!

अनाहूत कॉल्स व एसएमएस पासून मुक्तता

मोबाईल ग्राहकांची नको असलेल्या कॉल्स व एसएमएस पासून मुक्तता करण्यासाठी दूरसंचार नियामक मंडळाने म्हणजेच 'ट्राय'ने आता नवीन नोंदणी प्रक्रिया सुरु केली आहे. याचे वैशिष्ट्य असे की, यात सात प्रकारात वर्गीकृत केलेल्या आपल्या आवडीच्या वर्गातले एसएमएस पूर्णतः किंवा अंशतः प्राप्त करण्याचे अथवा बंद करण्याचे पर्याय उपलब्ध केले असून आठवा पर्याय वापरून नको असलेले सर्वच कॉल्स व एसएमएस बंद करता येतील.


ही नोंदणी १० फेब्रुवारी २०११ पासून सुरु होत आहे, आणि ग्राहकांनी यात निवडलेले पर्याय १ मार्च २०११ पासून कार्यान्वित केले जाणार आहेत.
अशी असेल ही पद्धती :
  • ज्या ग्राहकांनी यापूर्वीच DND (Do Not Disturb) अंतर्गत नोंदणी केली असेल, अशा ग्राहकांनी पुन्हा या योजनेत नोंदणी करण्याची गरज नाही. अशा ग्राहकांना 'फुल्ली ब्लॉक्ड' या प्रवर्गात ठेवण्यात येईल.
     
  • नव्याने नोंदणी करू इच्छिणार्‍या ग्राहकांना १९०९ या क्रमांकावर 'व्हॉइस कॉल' च्या माध्यमातून किंवा एसएमएस द्वारे नोंदणी करता येईल.
     
  • ग्राहकांना खालील वर्गीकृत प्रकारातील पसंत असलेले किंवा नापसंत असलेले एसएमएस निवडता येतील.
      0. पूर्णपणे प्रतिबंधित (टेलीमार्केटिंग कॉल्स / एसएमएस नाही)
  1. बँकिंग / इन्सुरन्स / फायनान्शियल प्रोडक्ट्स / क्रेडिट कार्ड्स
  2. रिअल इस्टेट 
  3. एजुकेशन
  4. आरोग्य
  5. कन्झुमर गुड्स व ऑटोमोबाईल्स
  6. कम्युनिकेशन / ब्रॉडकॉस्टींग / इंटरटेन्टमेंट /आयटी 
  7. टुरिझम व लेझर
  • 'व्हॉइस कॉल' च्या माध्यमातून नोंदणीसाठी १९०९ या क्रमांकावर कॉल करावा लागेल.
     
  • एसएमएसच्या माध्यमातून नोंदणीसाठी START <option(s)> या नमुन्यात १९०९ या क्रमांकावर पाठवावा लागेल. उदा. 'आरोग्य' या प्रकारातील एसएमएस तुम्हाला प्राप्त करायचे असतील तर START 4 असा एसएमएस १९०९ ला पाठवावा लागेल.
     
  • एकाहून अधिक पर्यायसुद्धा निवडता येतील. उदा. 'एजुकेशन' व 'आरोग्य' असे पर्याय पाहिजे असतील तर START 3,4 त्यासाठी असा मेसेज पाठवावा लागेल.
     
  • कोणत्याही पर्यायासोबत '0' पाठविल्यास त्याला 'फुल्ली ब्लॉक्ड' निवड मानण्यात येईल. उदा. START 0,3,4 असा एसएमएस जर १९०९ ला पाठविला तर तो 'फुल्ली ब्लॉक्ड' मानला जाईल.
     
  • पसंती बदलासाठी / विद्यमान विकल्प बंद करण्यासाठी STOP <option(s)> आणि नवीन पसंती सुरु करण्यासाठी START <option(s)> असा एसएमएस १९०९ वर पाठवावा लागेल.
  • ही नोंदणी १० फेब्रुवारी २०११ पासून सुरु होत आहे, आणि ग्राहकांनी यात निवडलेले पर्याय १ मार्च २०११ पासून कार्यान्वित केले जाणार आहेत.

2 Comments:

  1. एक नंबर... नक्की सुरू होणार आहे ना हे?
    मला काहीही नको आहे तेंव्हा मी START 0 एवढाच SMS करू ना?

    ReplyDelete
  2. विक्रांतजी, आपल्या दोन्ही प्रश्नांची उत्तरे 'होय' अशीच आहेत.

    ReplyDelete