मोबाईलवरुन फ्री बोलत रहाण्याची ट्रीक | आगळं! वेगळं !!!

मोबाईलवरुन फ्री बोलत रहाण्याची ट्रीक

How to get free Talktime?


मोबाईलवरुन फ्री बोलत रहाण्याची ट्रीक


शीर्षक वाचून विचारात पडलात ना? पण असे घडू शकते. तुम्ही तुमच्या प्रीपेड मोबाईल वरुन महिनेच्या महिने फ्री बोलत राहू शकता अगदी कोणत्याही नेटवर्कवर. ही हॅकींग ट्रीक नाही किंवा कोणतीही बेकायदेशीर कृतीही नाही. उत्सुकता वाढली ना, चला तर मग सांगूनच टाकतो हे कसं शक्य आहे ते.
या युक्ती लाभ कुणालाही घेता येईल, मात्र त्यसाठी तुमच्याकडे TATA DOCOMO कंपनीचे प्रीपेड कनेक्शन असणे आवश्यक आहे. आणि रुपये 251 एकवेळेस खर्च करावे लागतील. (पण ज्यांच्याकडील मोबाईल मध्ये आधीच 251 रुपयांहून अधिक बॅलन्स शिल्लक असेल, त्यांनी तर डायरेक्ट ही ट्रीक वापरावी, त्यानी पुन्हा 251 रुपये वेगळे खर्च करण्यची गरज नाही.) TATA DOCOMO चे एक 251 रुपयांचे Combo voucher आहे. ते रिचार्ज केल्यास 251 रुपयांचा पूर्ण टॉकटाईम मिळतो, व त्याची Validity लाईफटाईम आहे, आणि त्यासोबत 30 दिवसांसाठी TATA To TATA नेटवर्कसाठी 250 मिनीटे (15,000 सेकंद) व  इतर सर्व नेटवर्ककरितां लोकल 250 मिनीटे (15,000 सेकंद) असे एकूण 500 मिनीटे म्हणजेच 30,000 सेकंद फ्री मिळतात.
आता तुम्ही म्हणाल की, हे रिचार्ज केल्यावरच जर हे 30,000 सेकंद मिळत असतील तर मग त्यात काय विशेष. पण विशेष तर पुढच्या ट्रीकमध्येच आहे. सर्वप्रथम तुम्हाला एकवेळेस हे 251 रुपयांचे रिचार्ज करावे लागेल. त्यानंतर 30 दिवस मनसोक्त बोलून या फ्री 30,000 सेकंदांचा आनंद घ्या (अर्थातच फ्री सेकंदांच्या मर्यादेत राहून, आणि जर का त्याहून अधिक बोलणे झाले तर बॅलन्समधून वजा होतील).
आता असं बघा की, तुम्ही 251 रुपये एकदाच खर्च केले आहेत. तेही टॉकटाईमच्या रुपाने तुम्हाला परत मिळाले आहेतच, आणखीन वर 30,000 सेकंद फ्री. म्हणजेच तुमचा एक पैसाही खर्च झालेला नाही. पण टॉकटाईमध्ये गुंतला आहे इतकेच.

आता वेळ झाली आहे ट्रीक वापरण्याची
 
  • कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन रिचार्ज हा पर्याय निवडा

तुम्ही पहिले 251 रुपयांचे रिचार्ज केल्यानंतर 30 दिवसा नंतर एक पैसाही खर्च न करता हे 30,000 सेकंद पुन्हा पुन्हा कसे मिळवायचे ते पहा. 251 रुपयांचे रिचार्ज करण्यापूर्वी तुमचा आधीचा थोडाफार बॅलन्स निश्चीतच शिल्लक असेल. आणि तुमचे या महिन्यातील बोलणे फ्री सेकंदांच्या मर्यादेत झाले असे गृहित धरले तर, तुमच्या मोबाईल अकाउंटमध्ये 251 रुपयांहून अधिक बॅलन्स शिल्लक होता तो तसाच आताही असणार आहे. आता पुन्हा तुम्हाला हे 30,000 सेकंद फ्री मिळण्यासाठी पुन्हा 251 रुपयांचे रिचार्ज करणे आवश्यक आहे. पण त्यासाठी प्रत्यक्ष 251 रुपये तुम्ही आता पुन्हा खर्च करण्याची गरज नाही.
ट्रीक
 तर त्यासाठी तुम्ही TATA DOCOMO कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन रिचार्ज हा पर्याय निवडायचा आहे. तेथील बॉक्समध्ये तुमचा मोबाईल नंबर टाईप केल्यावर तीन पर्याय दिसतील त्यापैकी Special Recharge हा पर्याय निवडून त्यातील रु.251 चे व्हाऊचर सिलेक्ट करा. त्यानंतर पेमेंटचे 1)  Pay by Your Current Mobile Balance व 2) Pay by Net banking, Credit/debit card असे दोन पर्याय तुम्हाला दिसतील त्यापैकी 1) Pay by Your Current Mobile Balance या पर्यायाची निवड करा. त्यानंतर एक व्हेरीफिकेशनचा कोड नंबर तुमच्या मोबाईलवर एसएमएसने प्राप्त होईल. तो कोड साईटवर दिसत असलेल्या बॉक्समध्ये टाईप करा. म्हणजे रिचार्जची प्रक्रिया पूर्ण होईल.
  
  • तीन पर्यायापैकी Special Recharge हा पर्याय निवडा

  • त्यापैकी रु.251 चे व्हाऊचर सिलेक्ट करा

  • पेमेंटसाठी Pay by Your Current Mobile Balance हाच पर्याय निवडा

आता तुम्ही तुमचा बॅलन्स चेक करा म्हणजे तुम्हाला कळून येईल की, काय घडले आणि काय बिघडले ते. खरे तर काहीच घडले नाही. तुमच्याच बॅलन्समधून 251 रुपये वजा झाले आणि पुन्हा तेच पूर्ण टॉकटाईम म्हणून तुमच्या बॅलन्समध्ये जमा झाले. आणि पुन्हा 30 दिवसांकरिता 30,000 सेकंद फ्री मिळाले. म्हणजेच ही युक्ती वापरल्यामुळे पुन्हा एक पैसाही खर्च न करता 30,000  सेकंद फ्री मिळाले, आणि बॅलन्स आहे तेवढा आहेच. याप्रमाणे दर महिन्याला ही ट्रीक वापरुन तुम्ही काहीही खर्च न करता फ्री बोलत राहू शकता.
महत्वाचे अपडेट : दि. 28 फेब्रु. 2013 पासून या ट्रीकसाठी आवश्यक असलेला Pay by Your Current Mobile Balance हा पर्याय कंपनीने काढून टाकला आहे. त्यामुळे आता ही ट्रीक निरुपयोगी ठरली आहे. वाचकांनी याची नोंद घ्यावी.

7 Comments:

  1. अवश्य अमोलजी! Tested Trick

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. Replies
    1. माननीय प्रसीकजी, आपल्या भेटीबद्दल धन्यवाद.
      1) सर्वप्रथम यात वापरण्याचे व्हाऊचर रु.251/- चे आहे, रु.250/- चे नाही हे ध्यानात घ्या, अन्यथा घोटाळा होऊ शकतो.
      2) आपण जर लेखातील (TATA DOCOMO चे एक 251 रुपयांचे Combo voucher आहे. ते रिचार्ज केल्यास 251 रुपयांचा पूर्ण टॉकटाईम मिळतो) हे वाक्य लक्षपूर्वक वाचले तर तुमच्या लक्षात येईल की कोणताही टॅक्स लागणार नाही.

      Delete
  4. आता ही ट्रीक नाही चालणार का ..?

    ReplyDelete
    Replies
    1. दि. 28 फेब्रु. 2013 पासून या ट्रीकसाठी आवश्यक असलेला Pay by Your Current Mobile Balance हा पर्याय कंपनीने काढून टाकला आहे. त्यामुळे आता ही ट्रीक निरुपयोगी ठरली आहे.

      Delete