गुगल अॅडसेन्स आता हिंदी भाषेसाठीही | आगळं! वेगळं !!!

गुगल अॅडसेन्स आता हिंदी भाषेसाठीही



गुगल अॅडसेन्समध्ये आता हिंदी भाषेसाठी अच्छे दिन आ गये है असं म्हणायला हरकत नाही. हिंदी भाषेतून ब्लॉग लिहणाऱ्या ब्लॉगर्सनी केलेल्या प्रयत्नांना (जर त्यांनी काही प्रयत्न केले असतील तर, कारण त्यांनी काय प्रयत्न केले, कधी केले, कुठे केले याबाबत माहिती उपलब्ध नाही) यश आले आणि गुगल अॅडसेन्स आता हिंदी भाषेसाठी उपलब्ध झाले आहे. गुगल लँग्वेज सपोर्ट या लिंकवर हिंदी भाषेचा समावेश केलेला पाहता येईल. 

आत्तापर्यंत जे हिंदी भाषिक ब्लॉगर्स पदरमोड करुन ब्लॉग लिहीत होते, किंवा त्यांना त्यासाठी उत्पन्नाचा स्त्रोत उपलब्ध नव्हता, त्यांना आता ही एक चांगली संधी उत्पन्न झाली आहे. 

पण यामुळे एक झाले की, आता हिंदी भाषिक ब्लॉगर्सना ब्लॉगद्वारे गुगल अॅडसेन्सच्या माध्यमातून अर्थार्जन करण्यासाठी अधिक परिश्रम घेऊन चांगले लिखाण करावे लागेल आणि त्याचसोबत ब्लॉगच्या ट्रॅफिकवरही लक्ष ठेवावे लागेल.  आता सर्वप्रथम कोणत्या हिंदी ब्लॉगला गुगल अॅडसेन्सच्या जाहिराती दाखविण्याचा मान मिळणार आहे हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. 

हिंदी भाषिक ब्लॉगर्सना याबद्दल शुभेच्छा देतानाच, मराठी भाषिक ब्लॉगर्सच्या मनात गुगल अॅडसेन्समध्ये आपल्या मराठीला अच्छे दिन कधी येतील असा विचार नक्कीच येत असेल.

0 Comments:

Post a Comment