आगळं! वेगळं !!!
Showing posts with label टोलेबाजी. Show all posts
Showing posts with label टोलेबाजी. Show all posts

हा महाराष्ट्र माझा!

=> युती तोडणाऱ्यांना भांडी घासायला लाऊ -संजय राऊत

 • म्हणजे पुन्हा भांड्याला भांडे लागणारच

=> मोदींनी केंद्राचे पहावे, महाराष्ट्राचे आम्ही बघून घेऊ -राज ठाकरे

 • आम्ही एकदा वाटणी केली म्हणजे केली, मतदार मंडळी तेल लावीत गेली

=> फक्त खर्च वाढला, सिंचन झालेच नाही -पृथ्वीराज चव्हाण

 • खर्चात पुढे आहे, हा महाराष्ट्र माझा!

=> रिकामे जहाज जास्तच गोंगाट करते, सोनिया गांधींची मोंदीवर टीका

 • टीका की काँग्रेसच्या जहाजाची तक्रार?

अल्टीमेटम लागू


पटेल : नरुभाईला क्लिनचिट, गुप्तभेटीची पेरलेली तीबातमी आणि सर्व पर्याय खुल्लेचा इशारा बरोब्बर जमलं की नाही टायमिंग?
पवार : होय, टायमिंग अचूक जुळलयं खरं. पण त्या महायुतीवाल्यांनी आपल्याला त्यांच्याकडे जागा नाही म्हणून जो गोंधळ घातला,  तो न घालता ते थोडं शांत राहिले असते तर सस्पेन्स अजून वाढला असता.
पटेल : होय त्यांनी शांत रहा आणि पाहाची भूमिका घ्यायला पाहिजे होती खरी, पण नेमकं काय झालं कुणास ठाऊक? माझा सर्व पर्याय खुले आहेतचा बाईट स्क्रीनवर सुरू होता आणि खाली पट्टीमध्ये राष्ट्रवादीला महायुतीत स्थान नाहीची स्ट्रीप पळत होती. सगळाच पचका झाला. बाबा आणि कंपनीच्या पोटात उठणाऱ्या गोळ्याचं परिवर्तन गुदगुल्यात झालं असेल.
पवार : मला ठाऊक आहे ना महायुतीत काय घडलं ते. तेथे फक्त स्वाभिमान आडवा आला, नाहीतर कविवर्य रामदास तर आनंदात तयार होते. आणि बाकीचेही ना ना करते प्यार तुम्हीसे कर बैठे म्हणाले असते.
पटेल : चला कसा का असेना अल्टीमेटम लागू पडला म्हणायचा.
पवार : हो तर, माणिकबाळ बावीस सव्वीसचा डोस प्यायलाच तयार नव्हतं.  गुळण्या करुन बाहेर काढून टाकायचा बेटा. आता डोस कसा गिळतो ते बघावं लागेल. आणि बाबाही पी बाळा काकांच्या हातून एवढा डोस पी बघू माझं शहाणं बाळ ते असं म्हणून आपल्याला डोस पाजायला मदत करतात का ते ही पहावं लागेल.
पटेल : आणि त्यानंतरही डोस प्यायला तयार नसेल तर?
पवार : तर जास्त कडवट लागत असेल असं समजून मग डोस थोडा पातळ करावा लागेल.

* * *

नऊ चे बारा

नऊ चे बारा

युवराज : थँक्यू मोईली अंकल.
मोईली : थँक्यू कशासाठी युवराज?
युवराज : मी नऊच्या ऐवजी बारा म्हटलं आणि तुम्ही ते लगेच जाहीरही करुन टाकलंत म्हणून.
मोईली : त्यात काय मोठं युवराजजी, इटस् माय ड्यूटी.
युवराज : कोणती? लोकसेवेची?
मोईली : छे छे. ती माझी ड्यूटी नाहीच मुळी. तसं असतं तर देशभरातल्या गृहिणी किती दिवसापासून मागणी करताहेत तेव्हाच किंवा विरोधी पक्ष कंठशोष करुन राहिले आहेत तेव्हाच मी नऊ चे बारा मान्य केले असते की.
युवराज : मग आता असं काय घडलंय की तुम्ही नऊचे बारा केलेत अंकलजी?
मोईली : आपली इच्छा आम्हाला शिरसंवाद्य आहे युवराज. तुम्ही तोंडातून शब्द काढायचा अवकाश की आम्ही तो झेललाच म्हणून समजा.
युवराज : हं. हल्ली मलाही तसंच वाटायला लागलयं खरं. कारण मनमोहन अंकलांनीही तो अध्यादेश फाडून केराच्या टोपलीत टाकला असं त्यांच्या ऑफीसमधल्या प्यूनने मला सांगितलं. आणि पृथ्वीराज अंकलनेही तो आदर्शचा फेटाळलेला अहवाल स्विकारला म्हणे. खरंच मोईली अंकल, जसं मी म्हणतो अगदी तसंच कसं काय घडायला लागलंय हे मलाही कळेना.
मोईली : गांधी घराण्याचा करिश्मा आहेच तसा युवराज.
युवराज : मोईली अंकल परवा मी दिलेल्या मुलाखतीमुळे आपल्या पक्षात चैतन्याची लहर आलीय असं मी ऐकतोय खरंय का ते?
मोईली : अगदी खरंय युवराज ते, चैतन्याची इतकी लहर सळसळायला लागलीय की कार्यकर्ते अगदी सैरभैर झालेत कुठे पळू आणि काय करु आणि काय नको अशी भावना त्यांच्यात दिसून यायला लागलीय. (स्वगत : विरोधी पक्षात नाही गेले म्हणजे झालं)
युवराज : पण बरं झालं अंकल तुम्ही नऊचे बारा केलेत ते. मी मागे महाराष्ट्रात गेलो होतो तेव्हा ते एक गाणं ऐकलं होतं त्याची आठवण होतेय बघा, काय होतं ते... हं... मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा
मोईली : (स्वगत : आता आपलेच बारा वाजल्यामुळे जनता आपल्याला घरी जाऊ देईल की काय असं वाटायला लागलयं) खरंय युवराज ते. आता विरोधकांचे बारा वाजलेचं म्हणून समजा. आपल्या पक्षासाठी पूर्ण आयुष्य वेचलेल्या जेष्ठ आणि श्रेष्ठ अशा सर्व पाईकांसाठी पुढची काय आज्ञा आहे ती नेहमीप्रमाणे आम्हाला खाजगीत न सांगता जगजाहिर करावी युवराज. तेवढं पुढच्या वेळीही (स्वगत: आपण सत्तेवर आलोच तर) मंत्रीमंडळात आम्हाला स्थान देण्याचं लक्षात असू द्यावं अशी विनंती आहे युवराज.

* * *

आत्मक्लेशबी बोल्ड; ईट गोल्ड’!


<A title="आत्मक्लेश-आगळं! वेगळं!!!" href="http://nathtel.blogspot.com/"><img src="http://2.bp.blogspot.com/-bj4vcxK4k38/UWzUuy7dWWI/AAAAAAAAAnI/loIy7Rr-IcM/s1600/Gold+buskits.jpg" alt="आगळं! वेगळं!!!"></a>>> सोने गडगडले, पेट्रोलही एक रुपयाने स्वस्त; आली स्वस्ताई!
 • बी बोल्ड; ईट गोल्ड’!


>> आणखी वेळ द्या; संजय दत्तची सुप्रिम कोर्टात याचिका
 • सरेंडर के लिए भी 'तारीख पे तारीख'?


>> धर्मनिरपेक्षतेचे प्रमाणपत्र नको; भाजपने जद(यू) ला सुनावले, नव्या वादाला फुटले तोंड
 • या वादात जनतेने आपलं तोंड फोडू नये म्हणजे झालं!


>> ना राजीनामा, ना दिलगिरी अजित पवार सभागृहात परतले
 • हा तो 'आत्मक्लेश' जाणावा!


एक घाव बारा मती

=> क्रेडिट कार्ड संस्कृती भारतात रुजतेय; दिवाळीच्या एका महिन्यात 26 हजार कोटींची विक्रमी खरेदी
 • नाहीतरी ऋण काढून सण साजरा करण्याची आपली परंपराच आहे

हात आणि घड्याळाचं जमलं!

=> साखरेचे दर पुन्हा कडाडले; प्रतिक्विंटल १०० रुपयांची वाढ
 • वाईट वाटून घेऊ नका; आम्ही पेट्रोल किती 'प्रचंड' स्वस्त केले त्याची आठवण करा!
=> अभिनेत्री काजोल आता अँकारिंग करणार
 • उतरत्या लोकप्रियतेला छोट्या पडद्याचा आधार!
=> हात आणि घड्याळाचं जमलं! महापालिका निवडणुकासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी; जागावाटप स्थानिक पातळीवर
 • आता घड्याळ हातावर बसणार की घड्याळाचा 'गजर' हात बंद करणार?

गांधीवादाची 'प्रॅक्टिकल' परीक्षा

=> आघाडीत पुन्हा कडाडली वीज; ऊर्जामंत्र्यांना टाळून कॉंग्रेसचे 'सीएम'ना साकडे
 • सर्वसामान्यांच्या घरात अंधार केल्यावर 'कडाडून' प्रकाश पाडायला नको का?
=> पंतप्रधानांच्या पत्राची दखल का नाही? सर्वोच्च न्यायालयाने सरकारला फटकारले
 • आम्हाला वाटलं नेहमीप्रमाणे 'टोपली'म्हणून...
=> हल्ल्यांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा : अण्णा हजारे
 • गांधीवादाची 'प्रॅक्टिकल' परीक्षा

'पट' की 'चित'

=> आता व्यवस्थाच बदलायला हवी : लालकृष्ण अडवाणी
 • व्यवस्था नवीन पण कामकाज जुनेच
=> भाजपविषयी नरमाई का? खुल्या पत्रातून दिग्विजयसिंह यांचा अण्णा हजारेंना सवाल
 • 'नरम' 'गरम' धोरण 'तपासणी तज्ञ' दिग्विजयसिंह
=> 'पत' राखण्यासाठी 'पट' दडपला; शिक्षण खात्याकडून पडताळणी अहवालाचे आज सादरीकरण
 • आज होणार फैसला 'पट' की 'चित'

भारताची 'पत'ही धोक्यात

=> अमेरिकेला सर्दी, जगाला शिंका; सर्व शेअर बाजार आपटले; भारतात पाच कोटींचा फटका
 • अखेर अमेरिका 'गारठली'

'कॅग'चा अहवाल संसदेत सादर


=> संसदेला तुमची गरज नाही; दिल्ली उच्च न्यायालयाचा कलमाडींना दणका, १ लाखाचा दंड

 • पण मला संसदेची आहे ना... 

रुतला विकासाचा गाडा

=> अधिवेशनापूर्वीच खडाजंगी, भ्रष्टाचाराबाबत पंतप्रधान आक्रमक
 • कुणाच्या भ्रष्टाचाराबाबत? भाजपच्या...?

नारळाची बर्फी

=> पाक परराष्ट्रमंत्री हीना रब्बानी खार प्रसारमाध्यमांच्या 'फॅशन आयकॉन' म्हणून केलेल्या उल्लेखामुळे अस्वस्थ
 • हाय रब्बा! हिंदुस्थान में मैं क्या करने आई थी, यह भी मुझे नही याद आ रहा है

ऑफ सिझन डिस्काऊंट

=> भ्रष्टाचाराच्या खाणीत येडीयुरप्पा; लोकायुक्तांच्या अहवालात ठपका
 • भ्रष्टाचार के इस सफर में, तू अकेला ही नहीं है, हम भी तेरे हमसफर हैं...

'अर्धे' भारतीय

=> मुंबई बॉम्बस्फोट तपासाबाबत स्कॉटलंड यार्डची मदत घेणार : मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
 • फक्त दिग्विजयसिंह याचीच मदत पुरेशी होईल

काँगेसचा दिग्गीराजा तो 'बाब्या'

काँगेस पक्षाचे सरचिटणीस दिग्विजयसिंह उर्फ दिग्गीराजा पुन्हा बरळले. अर्थातच ते नेहमीप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आपला निशाना बनविण्यास चुकले नाहीत. त्यांचीही मजबुरी असेल कदाचित्‌! हायकमांडला खुश करण्यासाठी काय काय करावे लागते, त्याचा समृद्ध अनुभव त्यांच्या पाठीशी आणि गाठीशी आहेच.

मंत्री व्हायचेच कशाला?

=> महाराष्ट्राचे पंख कापले; गुरुदास कामत यांचा 'नाराजीनामा'
 • केंद्रीय नेतृत्वाला निदान एक तरी 'गुरु' भेटला

दिग्विजयसिंह यांची मुक्ताफळे

=> पाच किलोमीटर धावा आणि पोलीस व्हा! भरतीचे निकष बदलले; तोंडी परीक्षा झाली बंद
 • नवा निकष : प्राप्त परिस्थितीला 'तोंड' न देता 'पळता' येणे आवश्यक

भूमी अधिग्रहण कायदा

=> मंत्रीमंडळ फेरबदलाबाबत सोनिया, मनमोहनसिंग चर्चा; द्रमुककडून नावे न देण्याचा निर्णय
 • बरोबर आहे, कुणाला 'बाळू' अन् कुणाला 'टाळू' ही भानगडच नको

जातींच्या पेटवा ज्योती

=> राष्ट्रवादीची प्रकरणे बाहेर काढण्यासाठी अण्णांचा खांदा कशाला?
 • म्हणजे कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे कशाला? असचं ना?

सोशल इंजिनिअरिंग

=> कलमाडींना 'व्हीआयपी' ट्रीटमेंट; कारागृह अधिक्षकांची उचलबांगडी
 • 'चहापाण्यासाठी' एवढे आकांडतांडव कशाला?