आगळं! वेगळं !!!
Showing posts with label App. Show all posts
Showing posts with label App. Show all posts

विविध टूल्सचे एकच अॅप

https://youtu.be/dPpRib3mXfk


आपल्या स्मार्टफोनमध्ये आवश्यक असलेल्या वेगवेगळ्या टूल्ससाठी अनेक वेगवेगळी अॅप्स डाऊनलोड करुन आपण आपल्या स्मार्टफोनवर इन्स्टॉल करत असतो. त्यामुळे स्मार्टफोनच्या स्टोअरेजमधील बरीच जागा कमी होत असते.

पण आता असे एक अॅप आहे, की ज्यामध्ये नोटपॅड, भाषांतर करण्यासाठी ट्रान्सलेटर, रेकॉर्डर, मॅग्निफायर, कोड स्कॅनर, क्लिनर, बॅटरी सेव्हर, करन्सी व युनीट कनव्हर्टर, हर्ट रेट मॉनीटर, मॅप, साऊंड मीटर इत्यादी आवश्यक अशी तीसहून अधिक टूल्स एकाच अॅप मध्ये समाविष्ट केलेली आहेत. आणि त्या अॅपची फाईल साईजही सुमारे सहा एमबी इतकी कमी आहे.

या अॅपबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ बघा.

अमेरिकन व्हॉटसअॅपला पर्याय भारतीय जिओ चॅट

http://nathtel.blogspot.com/
जिओ चॅटचा लोगो

व्हॉटसअॅप अॅप इन्स्टॉल केलेले नसेल असा स्मार्टफोन विरळाचं. जवळपास सगळ्या स्मार्टफोनवर हे अॅप आढळून येईल. या अॅपची लोकप्रियता आजही कायम आहे. त्याच्या स्पर्धेत इतरही काही वुई चॅट, लाईन, हाईक, चॅटऑन इत्यादी सारखी अॅप्स उतरली, पण ती काही व्हॉटसअॅप इतकी लोकप्रियता मिळवू शकली नाहीत. त्यामुळे आजही व्हॉटसअॅप ची मोहिनी कायम आहे.  

आता रिलायन्सने व्हॉटसअॅप सारखेच आपले एक भारतीय अॅप JIO Chat या नावाने गुगल प्लेवर उपलब्ध केले आहे. व्हॉटसअॅप प्रमाणेच हे एक फ्रेंडस अँड फॅमिली नेटवर्किंग अॅप आहे.  व्हॉटसअॅप आणि JIO Chat मधील एक महत्वाचा फरक म्हणजे JIO Chat हे शंभर टक्के मोफत आहे. व्हॉटसअॅप हे एक वर्षापर्यंत मोफत वापरता येते त्यानंतर मात्र सुमारे पंचावण्ण रुपये प्रतिवर्षी त्यासाठी मोजावे लागतात. यासोबतच JIO Chat मध्ये व्हॉटसअॅपपेक्षा अधिक काही नविन वैशिष्ट्ये समाविष्ट केलेली आहेत.

  • यामध्ये टेक्स्ट मेसेज सोबत मल्टिमिडीया फाईल्स ऑडिओ, व्हिडीओ, इमेजेस तर पाठविता येतातच, पण Document फाईल्सही शेअर करता येतात.
  • यामध्ये इमोशन्स, डूडल्स, स्टिकर्स शेअर करता येतात.
  • यामध्ये व्हाईस व व्हिडिओ कॉलींग तसेच ग्रुप कॉलींगसुध्दा करता येते.
  • यामध्ये बातम्या, क्रिडा आणि मनोरंजनासाठी Firstpost, Moneycontrol, Cricketnext, IBNlive, MTvIndia असे अनेक चॅनेल्स उपलब्ध आहेत.
  • यामध्ये ग्रुप तयार करताना आता सभासदांच्या संख्येची अडचण येणार नाही, कारण यात ग्रुप मेंबर्सची मर्यादा 499 इतकी ठेवलेली आहे.

व्हॉटसअॅप मधील सगळ्या फीचर्स पेक्षा काही अधिक आणि वेगळ्या अश्या फीचर्सने भरलेले हे अॅप  फ्री आणि अॅड फ्री सुध्दा आहे. 

http://nathtel.blogspot.com/
जिओ चॅट आणि व्हॉटसअॅपमधील फीचर्सचा तुलनात्मक तक्ता

http://nathtel.blogspot.com/
जिओ चॅटमधील फिचर्स


http://nathtel.blogspot.com/
जिओ चॅटमधील फिचर्स


http://nathtel.blogspot.com/
जिओ चॅटमधील फिचर्स

विशेष म्हणजे अमेरिकन व्हॉटसअॅप वापरण्याऐवजी स्वदेशी JIO Chat वापरा. आणि व्हॉटसअॅपच्या माध्यमातून अमेरिकेला जाणारे आपले कोट्यावधी रुपये वाचवा असे आवाहन करणारा मेसेज सध्या सोशल मिडीयातून व्हायरल होत आहेत.

आपल्या देशाचा अभिमान असणाऱ्या प्रत्येक देशप्रेमी नागरिकांनी व्हॉटसअॅप ऐवजी JIO Chat वापरायला सुरुवात केली तर काहीही अशक्य नाही.

फक्त मला काय त्याचे? आणि मी एकट्याने बदल करुन काय फरक पडणार आहे? असा नकारार्थी विचार न करता, मी स्वतः बदलले आणि माझ्या ओळखीच्या लोकांनाही बदलायला सांगितले अशी भूमिका प्रत्येकाने घेतली तर या विचाराचे एका चळवळीत रुपांतर व्हायला वेळ लागणार नाही.

JIO Chat गुगल प्लेवर सर्च करुन डाऊनलोड करुन घ्या अथवा येथून करा.

आवश्यक अॅप; कॉल रेकॉर्डर


http://nathtel.blogspot.com/

आपल्याला आलेल्या किंवा आपण इतरांना केलेल्या कॉल्स मध्ये नेमके काय संभाषण झाले होते याचे रेकॉर्डिंग असणे काही प्रसंगी फार गरजेचे व उपयुक्त ठरते. त्या कॉल रेकॉर्डिंगवरुन प्रत्यक्ष काय संभाषण झाले होते याचा पुरावा आपल्या जवळ उपलब्ध होतो. आणि त्याचे अनेक प्रकारे फायदे होऊ शकतात.

उदा. कोणी एखादी व्यक्ती त्रास देण्याच्या हेतूने सतत कॉल करत असेल, बिझनेस मध्ये एखादे डील कोणत्या रेटमध्ये फायनल झाले होते याची माहिती पाहिजे असेल, किंवा तुम्ही एका मित्रास एका कार्यक्रमाचे आमंत्रण दिल्यावर त्याने काय सबब सांगितली होती याची त्याला आठवण करुन द्यायची असेल तर अशावेळी या कॉल रेकॉर्डिंगचा उपयोग होतो. श्या एक ना अनेक गोष्टींसाठी पुरावा म्हणून उपयोगी ठरणारे कॉल रेकॉर्डिंग करण्यासाठी आपल्या स्मार्टफोनवर कॉल रेकॉर्डींग अॅप असणे अतिशय गरजेचे आहे.

गुगल प्ले वर तसे अनेक कॉल रेकॉर्डींगचे अॅप्स उपलब्ध आहेत. पण त्यापैकी Call Recorder - ACR NLL निर्मित अॅप वापरुन पहायला हरकत नाही. हे एक चांगले मोफत कॉल रेकॉर्डिंग अॅप आहे. या अॅपद्वारे फोनवर येणाऱ्या प्रत्येक कॉलचे, तसेच फोनवरुन केल्या जाणाऱ्या प्रत्येक कॉलचे आपोआप रेकॉर्डिंग केले जाते.

आपणांस ज्या क्रमांकांच्या कॉल्सचे रेकॉर्डिंग होऊ नये किंवा ते होण्याची आवश्यकता नाही असे वाटत असेल तर, हवे ते क्रमांक यातून वगळण्याची सुविधा यांत उपलब्ध आहे. ही सुविधा येणाऱ्या व फोनवरुन केल्या जाणाऱ्या अश्या दोन्ही प्रकारच्या कॉल्ससाठी आहे. कॉल्सचे होणारे रेकॉर्डिंग जतन करण्यासाठी विविध फाईल फॉरमॅटचे पर्याय सुध्दा यात आहेत.

याची फाईल साईज 5.9 MB आहे.

इंग्लिश शिकण्यासाठी एक मस्त अॅप


अँड्रॉईड फोनचा उपयोग प्रत्येक जण आपापल्या आवडीनुसार करत असतो. कुणाला गेम खेळण्यात मजा वाटते, तर कुणी संगीत ऐकण्याचा आनंद घेतात, तर काही जण सतत इंटरनेटशी कनेक्ट रहाणे पसंत करतात. पण मनोरंजनासोबतच या फोनचा उपयोग शिक्षणासाठी कसा करुन घेता येईल? असा विचार किती लोकांच्या मनात येत असेल?
शिक्षणाचे नांव ऐकताच पडल्या ना तुमच्या कपाळावर आठ्या? नक्कीच पडल्या असणार. आणि ते ही साहजिकच आहे म्हणा. कारण अभ्यासापासून सुटका पाहिजे म्हणून तर फोन हातात घेतलाय, आणि आता पुन्हा इथेही शिक्षणच? काय कटकट आहे, असाच काहीसा विचार तुमच्या मनात आला असणार. पण मी सांगतो ते इंग्रजी शिकण्यासाठी असलेले एक भन्नाट अॅप तुम्ही तुमच्या फोनवर डाऊनलोड करुन घ्या. आणि बघा मग शिक्षणासोबतच मनोरंजनाचा ही अनुभव तुम्हाला आल्याशिवाय रहाणार नाही.
सध्या गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असलेली एखादे पुस्तक वाचत असल्याप्रमाणे इंग्रजी शिक्षणाचा कोर्स डिझाईन केलेली, बरीच रटाळ आणि कंटाळवाणी अॅप्स तुम्ही पाहिली असतील. आणि त्यामुळेच नको ते इंग्रजी शिक्षण अशी तुमची मानसिकता झाली असेल.
पण मी येथे तुम्हाला जे अॅप सांगणार आहे, ते तुम्ही पाहिलेल्या सर्व अॅप्सपेक्षा वेगळं आहे. याचा इंटरफेस अतिशय वेगळा आहे. इंग्रजी ऐकणे, बोलणे, लिहणे आणि वाचणे अशा चारही पध्दतीने हिंदी भाषेतून इंग्रजी शिकण्याचा हा एक विनामूल्य कोर्स आहे. आणि या कोर्सची भाषा हिंदी असल्यामुळे मराठी भाषिकांना हा इंग्रजी शिकण्याचा कोर्स आपल्या मातृभाषेतून शिकण्याइतकाच सोपा आणि जवळचा वाटेल.
हा कोर्स इंटरॅक्टीव्ह पध्दतीने डिझाईन केलेला आहे. शिकणाऱ्याला यात प्रत्यक्ष सहभागी करुन घेत, गंमतीदारपणे, खेळकर पध्दतीने यातील लेसन्स असे पुढे जात रहातात की, शिकणारांना मजा तर येतेच शिवाय ज्ञानही मिळत जाते. शिवाय तुम्ही दिलेल्या उत्तरांचे रिझल्टही येथे ताबडतोब मिळत जातात. आणि अचूक उत्तरांना गुणांऐवजी कॉईन्स दिले जातात. या कॉईन्सचा उपयोग या कोर्समध्ये पुढे काही लेसन्स लॉक्ड आहेत, ते अनलॉक करण्यासाठी करता येतो. आणि आवश्यकतेनुसार कमी असणारी कॉईन्स तुम्हाला मित्रांकडून घेता येतात किंवा त्यांना देता ही येतात.
या कोर्समध्ये सुमारे शंभराहून अधिक लेसन्स आहेत. हा सगळा कोर्स मनोरंजक पध्दतीने शिकत असताना, आवश्यक त्या ठिकाणी उपयुक्त अशा व्याकरणाबाबतच्या टिप्सही प्रदर्शित होत रहातात. या कोर्स मध्ये शब्दसंग्रह देखील आहे. तसेच या कोर्समध्ये मनोरंजनात्मक आणि ज्ञानवर्धक गेम्ससुध्दा समाविष्ट केलेल्या आहेत.
या अॅपचे आणखी वेगळं वैशिष्ट्य म्हणजे यात दिलेली हेल्पलाईन. ही एक व्हॉटसअप प्रमाणे चॅटींगची सुविधा असलेली हेल्पलाईन आहे. इंग्लिश शिकत असताना तुम्हाला येणाऱ्या काही शंका, अडचणीबाबत तज्ञांसोबत या हेल्पलाईनद्वारे ऑनलाईन संवाद साधून शंका समाधान करून घेता येण्याची सोय आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण कोर्स ऑफलाईन आहे. फक्त हेल्पलाईनचा उपयोग करण्याव्यतिरीक्त इंटरनेट सुरु असण्याची आवश्यकता नाही.
हे अॅप परिवारातील लहान मुलांपासून थोरांपर्यंत सर्वांना, तसेच इंग्रजी शिकण्याची नव्याने सुरुवात करणाऱ्यांपासून ते इंग्रजी येत असणाऱ्यांपर्यंत सर्वांनाच उपयुक्त ठरेल यात शंका नाही.
तुम्हालासुध्दा हे अॅप नक्कीच आवडेल, आणि याचा वापर केल्यानंतर तुम्ही इतरांना सुध्दा याची शिफारस कराल अशी खात्री वाटते. आणि तुम्ही जर तुमच्या परिचितांना व्हॉटसअप अथवा ईमेलने याची शिफारस केली, आणि तुम्ही पाठविलेल्या लिंकवरुन जर कुणी हे अॅप डाऊनलोड करुन, त्याचा वापर सुरू केला तर त्या जॉईनींगचे आणखी चारशे कॉईन्स तुमच्या खात्यावर जमा होतील. आहे की नाही, आम के आम, और गुठली के दाम.
अॅप डाऊनलोड करुन घेण्यासाठी खाली दिलेला QR Code  तुमच्या अँड्रॉईड फोनवर स्कॅन करा, आणि डाऊनलोड करुन घ्या.
किंवा खालील लिंक वेब ब्राऊजरच्या अॅड्रेसबारमध्ये टाईप करा.
http://goo.gl/sjvUt0

अपडेट : या अॅपच्या निर्मात्यांनी, या अॅपच्या लेटेस्ट व्हर्जनमध्ये हिंदी भाषेसोबत मराठी भाषेचा पर्यायही माध्यम म्हणून उपलब्ध करुन दिला आहे. त्यामुळे मराठी भाषाप्रेमी लोकांना इंग्रजी आपल्या मातृभाषेतून शिकणे आता सहज शक्य झाले आहे.

ज्यांनी हे अॅप यापूर्वीच डाऊनलोड केलेले आहे, त्यांनी ते अपडेट करुन घ्यावे म्हणजे त्यांना मराठी भाषेचा पर्याय निवडीसाठी उपलब्ध होईल.
§ § §

अॅन्ड्रॉईड फोनवरील इंटरनेट वापरात बचत शक्य


मर्यादित वापर करुनही अॅन्ड्रॉईड फोनवरील इंटरनेट पॅक लवकर संपतो अशी बऱ्याच जणांनी तक्रार असते. त्यात काही प्रमाणात तथ्यही आहे. कारण जेव्हा आपण फोन इंटरनेटला कनेक्ट करतो, तेव्हा फोनमधील बरीचशी अॅल्पीकेशन्स आपल्या नजरेस न येता, आपल्या अपरोक्ष इंटरनेटचा वापर करुन त्यांच्या साईटला कनेक्ट होत असतात. आणि त्यांच्याकडून होत असलेल्या डाटा ट्रान्स्फरमुळे आपल्या वापरापेक्षा अधिक लवकर डाटा पॅक संपण्याचा अनुभव येणे शक्य आहे. कोणत्या अॅप्लीकेशन्सने किती डाटा वापरला आहे हे माय डाटा मॅनेजर सारख्या अॅपच्या माध्यमातून स्पष्टपणे दिसून येईल.

कोणत्या अॅप्लीकेशन्सना डाटा वापरण्याची परवानगी द्यायची व कोणत्या अॅप्लीकेशन्सना नाकारायची यावर जर नियंत्रण ठेवता आले तर इंटरनेटच्या डाटा वापरात काही प्रमाणात बचत करता येऊ शकेल. आता हे नियंत्रण कसे ठेवायचे, तर आपल्या अॅन्ड्रॉईड फोनवर फायरवॉल अॅप्लीकेशन इन्टॉल करुन नियंत्रण ठेवता येईल. गुगल प्ले वर बरीचशी फायरवॉल अॅप्लीकेशन्स मोफत उपलब्ध आहेत. पण त्यापैकी बहुतेक रुट केलेल्या अॅन्ड्रॉईड फोनवरच चालू शकणारी आहेत. त्यामुळे ज्यांनी फोन रुट केलेला असेल, त्यांना ती उपयुक्त ठरतील.पण ज्यांचा फोन रुट केलेला नसेल, त्यांच्यासाठी No Root Firewall नावाचे एक अॅप्लीकेशन आहे ते उपयोगी ठरेल. याचा वापर केल्यास इंटरनेट कनेक्ट झाल्याबरोबर कोणती अॅप्लीकेशन्स इंटरनेटला कनेक्ट होऊ पाहात आहेत, व त्यांना परवानगी द्यायची की नाही हे या फायरवॉलमुळे ठरवता येते. आणि त्यामुळे आपल्या अपरोक्ष, आपल्या परवानगीशिवाय होत असलेल्या अनावश्यक इंटरनेट डाटा वापरांवर नियंत्रण ठेवून बचत करणे शक्य होते.

विशेषतः जे लोक केवळ व्हॉटसअॅप, फेसबुकच्या वापराकरीताच असलेले इंटरनेट पॅक वापरत असतील त्यांना याचा विशेष फायदा होईल.