वास्तूशास्त्राचे पुस्तक डाऊनलोड करा मोफत
वास्तूशास्त्राचे पुस्तक डाऊनलोड करा मोफत
वास्तूशास्त्राविषयीचे आकर्षण कुणाला नसते? तर
सर्वांनाच असते. आणि त्याविषयी जमेल तशी आणि शक्य असेल तशी माहिती मिळविण्याकडे
आणि वाचण्याकडे सर्वांचाच कल असतो. पण हीच भरपूर माहिती एखाद्या पुस्तकरुपाने
आपल्या हाती पडल्यास आणि त्यातूनही ई-बुकच्या स्वरुपात चक्क मोफत मिळाल्यास दुधात
साखरच म्हणावी लागेल.
तर आज आपण एका अशाच संकेतस्थळाबाबत माहिती घेणार आहोत. या
संकेतस्थळांवर आपणांस वास्तूशास्त्राविषयीची माहिती मोफत मिळेल. वास्तूशास्त्र
तत्व, तसेच एका बाजूने, दोन्ही बाजूने व तीन्ही बाजूने रस्ता असलेल्या
उदाहरणांची अशी तीन चार प्रकारची वास्तूशास्त्राबद्दलची भरपूर आकृत्या समाविष्ट असलेली ई-पुस्तके पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करुन घेता
येतील. तसेच याच संकेतस्थळावर धार्मिक संगिताचा मोठा संग्रह ही डाऊनलोड करण्यासाठी
उपलब्ध आहे. आपल्या आवडीनुसार आपण धार्मिक संगीतही येथून डाऊनलोड करुन घेऊ शकाल.
या संकेतस्थळावर ही सुविधा इंग्रजी व हिंदी या दोन्ही भाषेत उपलब्ध आहे.