आगळं! वेगळं !!!
Showing posts with label tolebaji. Show all posts
Showing posts with label tolebaji. Show all posts

सुदृढतेचं लक्षण!

=> संरक्षण खात्यातूनही 'आदर्श'शी संबंधित कागदपत्रे गायब; संरक्षण खात्याच्या वकिलाची आयोगापुढे माहिती
 • आम्ही देशाचे संरक्षण करतो, कागदपत्रांचे नाही

निवडून न आलेले हुकूमशहा

=> ओबीसी कनेक्शन; मुंडेंनी आजमावले (भुज)बळ
 • गडकरी, पाहतायत ना तुम्ही आमची गळाभेट?

मंत्रालयातील उंदीरमामा

=> कारवाईशिवाय पर्यायाच नव्हता; पोलीस कारवाईबाबत पंतप्रधानांचे प्रथमच वक्तव्य
 • तुम्हाला म्हणून सांगतो, कारवाई केली नसती तर आमचंच काही खरं नव्हतं बघा!

बॉलीवूडचा नवा मंत्र

=> योगगुरू रामदेवबाबा हे तर संन्यासी नसून उद्योगपती आहेत : कॉंग्रेस सरचिटणीस दिग्विजयसिंह
 • कॉंग्रेस पक्षात दिग्विजयसिंह हे एकमेव 'साक्षात्कारी' सरचिटणीस आहेत

'रामलीला'

=> धान्यापासून मद्यनिर्मिती बंद!
 • आरारा! सगळाच घोटाळा झाला की, 'प्यायला' मिळाल्याशिवाय धान्य 'खायचं' कसं?

'रिमोट'मध्ये गडबड

=> काळ्या पैशाचे होणार सर्वेक्षण; अर्थमंत्रालयाने सोपविली तीन प्रमुख संस्थांवर जबाबदारी
 • आमच्या आगामी 'सर्वेक्षणात' आम्ही विचारलेल्या प्रश्नांची 'खरीखुरी' उत्तरे द्यायची बरं का!
=> गुणवत्तेनुसार पोलिसांना पदोन्नती; त्रुटी लवकरच दूर करणार : आर.आर.पाटील

भगवं-निळं

=> तंबाखूच्या पुड्यांवर १ डिसेंबरपासून अधिक कडक इशारा
 • म्हणजेच आता आपल्या तंबाखूचा स्वाद होणार आणखी कडक आणि लज्जतदार!

खरे 'भारतरत्न'चे मानकरी

=> राज्यपालांविरुद्ध काहीही बोलणार नाही : कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा
 • दोन कारणे, पाहिलं सगळं काही बोलून झालंय, दुसरं कुणी ऐकायलाही तयार नाही

'लेटेस्ट व्हर्जन'

=> गरज पडल्यास पुन्हा पाकमध्ये घुसू; बराक ओबामांचा तालिबानींना इशारा
 • असे इशारे देण्यास शिकण्यासाठी भारताने अमेरिकेकडे ट्युशन लावावी

हेच खरं दुखणं!

=> सीमेवर बिनधास्त फिरता यावे; फारूक अब्दुल्लांचे स्वप्न
 • अशी स्वप्ने स्वप्नातच पूर्ण होतात

विठ्ठला कुणाचा झेंडा घेऊ हाती?

=> भारताची अब्रू चव्हाट्यावर; आणखी एक 'मोस्ट वाँटेड' आढळला मुंबईतच; चौकशीचे आदेश
 • निदान यादीत नावे टाकल्यावर तरी यांनी असे कुठेही आढळणे चुकीचे आहे

हार्ड टू स्लिप डिस्क

=> कर्नाटकाबाबत निर्णयाची केंद्राला घाई नाही; राज्यपालांनी घाईगडबडीत अहवाल पाठविला असल्याचे मत
 • कारभारी दमानं, होऊ द्या दमानं!

आघाडीचा धर्म जखमी

=> भारत अमेरिकेसारखी कारवाई करणार नाही : पंतप्रधान मनमोहनसिंग
 • भारतीयांची तुमच्याकडून 'ती' अपेक्षाही नाही

'मारुतीचं' शेपूट

=> अयोध्या निकालाला स्थगिती; अलाहाबाद उच्च न्यायालयाचा 'चमत्कारिक' निर्णय : सर्वोच्च न्यायालय
 • रामजी की लीला है न्यारी

आयजीच्या जीवावर बायजी उदार!

=> लादेन त्याज्यच; पण शिक्षेचा अधिकार अमेरिकेला कसा? मुस्लीम संघटनांचा सवाल
 • वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ल्याचा लादेनला अधिकार होता तसाच! 

हे मात्र 'चीटींग'

=> राणेंच्या आरोपांचे समर्थन केलेले नाही : मुख्यमंत्री, ते आरोप राणेंचे; कॉंग्रेसचे नव्हेत : माणिकराव ठाकरे
 • आता 'सुपारी' फोडा नारायणराव

ये तो अपना धंदाच है भाय!

=> 'सुपारी'चे पुरावे दिलेत, तर शिवसेनाप्रमुख पद सोडतो : बाळासाहेब ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना आव्हान
 • बोला चव्हाण साहेब, आहे का तयारी 'सुपारी' फोडायची?

दार उघड बये आता दार उघड

=> कायदा हा सर्वासाठी समान आहे.कोणती व्यक्ती कोणत्या पदावर आहे, याचा कायद्याशी काहीही संबंध नसतो : मुंबई उच्च न्यायालय
 • तळं राखेल तोच पाणी चाखेल या प्रवृत्तीला हे कोण समजावणार?

'कर' ही नाही आणि 'डर' ही नाही

=> सेनेच्या 'सुपारी'ची माहिती नाही : गृहमंत्री आर.आर.पाटील
 • तंबाखू तर सोडाच पण आबा 'सुपारी' सुद्धा खात नाहीत

भ्रष्टाचारामुळे समाज अस्वस्थ

=> मुख्यमंत्री बिनविरोध निवडून येणार; युतीचा उमेदवार नाही
 • जैतापूरच्या पार्श्वभूमीवर युती झाली 'मॅनेज'