आगळं! वेगळं !!!

आमची 'खास' थाळीआमची 'खास' थाळी
पार्टी फंड गोळा करण्याचा
'आम' भोजनालयाचा नवा फंडा
दहा हजाराची 'एके' थाळी बघून
'आम' आदमी मात्र पुरता थंडा

लाल फितीची शिस्त

लाल फितीची शिस्त

गोठलेल्या गारपीटग्रस्तांची मढी
सरणांवर गेली तरी विलाज नाही
नियमानुसारच मिळेल त्यांना मदत

कुणी घाई करायचं काम नाही
कुणासाठीही नियम धाब्यावर बसवायला
हे काही आदर्शचं बांधकाम नाही

तिसऱ्याचा लाभतिसऱ्याचा लाभ
मोदीवर लक्ष आहे म्हणत
सेनाच खरी लक्ष्य आहे
दोघांच्या संघर्षात सत्ता मात्र
तिसऱ्याचेच भक्ष्य आहे

‘हात’ बलहातबल
उमेदवार शोधून शोधून
घड्याळ झाले हतबल
हातकणंगलेत वाढले अखेर
काँग्रेसचेच हातबल

स्टंटबाजीस्टंटबाजी
व्यर्थ गेली राजकारणात हयात
'आप'ल्यासमोर मस्तक टेकावे
स्टंटबाजी कशी करायची असते
ते फक्त केजरीवालकडूनच शिकावे


आघाड्यांची दुकानेआघाड्यांची दुकाने

सत्तेच्या भागीदारीची गणिते
आता जुळायला लागली
 येताच निवडणूकीची दिवाळी
आघाड्यांची दुकाने उघडायला लागली

आदर्श सभाआदर्श सभा
राहुल गांधींच्या सभेत
अशोक चव्हाण मागे दिसले
लगेचच ओरडले विरोधक
भ्रष्टाचाराला पाठीशी घातले

बात हजम नहीं हुई
बात हजम नहीं हुई

पंचतारांकित भोजन

फक्त दोघांनाच रुचले

बात हजम न झाल्याने

महायुतीला नाही पचले'महा'राज युती'महा'राज युती

लोकसभेचे रण सोडा
मोदींना दिल्लीत धाडा
'महा'राज युती साठी
उघडा आहे आमचा वाडा

नाराज अजूनी
नाराज अजूनी

सदाभाऊंनी माढा गटवले, 
जानकरांना बारामतीत पाठवले,
महायुतीने प्रकरण मिटवले, 
पण नाराज अजूनी आठवले

प्रत्येकांचं दिसतयं
प्रत्येकांच दिसतयं

आपलं ठेवावं झाकून
दुसऱ्यांच बघावं वाकून
जनता हसतेय आता
प्रत्येकांच दिसतयं ते बघून