आगळं! वेगळं !!!

मोफत अॅप्समधील जाहिराती कशा काढाव्यात

https://youtu.be/5PSytuE8vLE

अँड्रॉईड मोबाईल फोनमधील बहुतांश वापरात येणाऱ्या मोफत अॅप्समध्ये अॅडस असतात. आणि त्या पहाणे किंवा अॅप वापरताना त्यांचा अडथळा येणे कोणालाही आवडत नाही. तर या अॅडस कशा प्रकारे त्या अॅपमधून काढता येतील? याची माहिती देणारा How to remove ads from apps हा व्हिडीओ पहाण्यासाठी येथे क्लिक करा.

Paytm ने केला POS अॅपमध्ये पेमेंट स्विकृती पध्दतीत बदल

https://youtu.be/ljFZ2gJ2P-Y

New Updated

Paytm ने नुकतेच आपल्या POS अॅपच्या माध्यमातून Debit/Credit कार्ड द्वारा स्विकृत करण्यात येणाऱ्या पेमेंटच्या पध्दतीमध्ये बदल केलेला आहे. काय आहे हा बदल? कशी आहे ही नविन पेमेंट स्विकृतीची पध्दत? हे Step by step guide द्वारे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ अवश्य बघा.

टीप : यापूर्वीच्या पध्दतीचा व्हिडिओ बघण्यासाठी येथे क्लिक करा.


स्मार्टफोनचा स्पीड कसा वाढवावा?

https://youtu.be/GxRFiNmBAII

स्मार्टफोनचा स्पीड बऱ्याचवेळेस मंदावतो, तर मंदावलेला स्पीड कोणत्याही अॅपच्या मदतीशिवाय कसा वाढवावा? यासाठीच्या काही उपयुक्त टीप्स जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ अवश्य बघा.

https://youtu.be/GxRFiNmBAII

कार्ड स्वाईप मशीनशिवाय स्मार्टफोनवर डेबिट क्रेडिट कार्डद्वारे पैसे कसे स्विकारावेत?

https://youtu.be/VTpuk0zyOIk

पाचशे व हजार रुपये नोटा बंद झाल्यापासून डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे व्यवहार करण्याकडे सर्वांचा कल वाढताना दिसत आहे, किंबहुना आता ते यापुढील काळात अपिरहार्यच होणार आहे.

पण सद्यपरिस्थितीत ही अचानक झालेली सुरुवात असल्याने अजून तरी बऱ्याच छोट्या दुकानदार, व्यावसायिकांकडे EDC/POS (Ponint of Sale) म्हणजेच कार्ड स्वाईप मशीन उपलब्ध नाही. काहींनी काळाची गरज ओळखून बँकेकडे मागणीही नोंदविली आहे. परंतु आता तरी त्यांच्याकडे ती सोय उपलब्ध नाही.

अशा परिस्थितीत काही व्यावसायिक मोबाईल वॉलेट या पर्यायाचा वापर करत आहेत. पण यासाठी तेच अॅप समोरच्या ग्राहकाच्या मोबाईलवरही इन्स्टॉल केलेलं असणं आवश्यक असतं. तसं नसेल तर याप्रकारे पैसे स्विकारता येत नाहीत. 


ग्राहकाने अॅप इन्स्टॉल केलेले नाही, पण डेबिट किंवा क्रेडिट कार्ड ग्राहकांकडे आहे, पण दुकानदारांकडे स्वाईप मशीन नाही. तर अशा परिस्थितीतही दुकानदारांना त्यांच्या स्मार्टफोनवर या कार्डद्वारे पैसे स्विकारता येणे शक्य आहे. ते कसे? त्यासाठी हा व्हिडिओ पहा.

गुगल प्लेवरील खरेदी अधिक सुलभ

http://nathtel.blogspot.com/

आत्तापर्यंत गुगल प्लेवरील आवडलेले अॅप्स, बुक्स इत्यादी खरेदी करण्यासाठी क्रेडिट कार्ड किंवा गुगल गिफ्ट व्हाऊचर असे मर्यादित पर्याय उपलब्ध होते. त्यामुळे ज्यांच्याकडे क्रेडिट कार्ड अथवा गुगल गिफ्ट व्हाऊचर नाहीत अशा मोबाईल धारकांना एखादे आवडलेले पुस्तक किंवा अॅप्लीकेशन विकत घेण्याची इच्छा असली तरी ते खरेदी करु शकत नव्हते.

पण आता गुगल प्लेवरील अॅप्स, बुक्स खरेदी करण्याच्या पर्यायात आणखी एक भर पडली आहे. आयडिया सेल्युलर कंपनीने गुगलशी यासंदर्भात करार केला आहे. त्यामुळे जे मोबाईल धारक आयडियाचे ग्राहक आहेत, त्यांना गुगल प्लेवरील खरेदीसाठी आयडिया कॅरियर या पर्यायाचा वापर करुन खरेदी करता येणार आहे.

त्यासाठी गुगल प्लेचे लेटेस्ट अपडेटेड व्हर्जन मोबाईलवर असणे आवश्यक आहे. अकाऊंट मधून पेमेंट ऑप्शन येथून हा आयडिया कॅरियरचा पर्याय निवडता येईल. त्यानंतर एक मेसेज पाठविण्याची विचारणा केली जाईल. (हा मेसेज क्रमांक टोल फ्री आहे) त्याला होकार द्यावा. मोबाईलचे व्हेरिफिकेशन होताच, आपणांस हा पर्याय येथून पुढे गुगल प्लेवरील खरेदीसाठी उपलब्ध होईल. हा पर्याय प्रीपेड व पोस्टपेड या दोन्ही प्रकारच्या ग्राहकांकरिता उपलब्ध आहे.

या नविन सुविधेमुळे आवडीचे अॅप्लिकेशन इच्छा असूनही खरेदी करता येत नाही, ही मोबाईलधारकांची अडचण दूर होण्यास मदत होणार आहे.

अमेरिकन व्हॉटसअॅपला पर्याय भारतीय जिओ चॅट

http://nathtel.blogspot.com/
जिओ चॅटचा लोगो

व्हॉटसअॅप अॅप इन्स्टॉल केलेले नसेल असा स्मार्टफोन विरळाचं. जवळपास सगळ्या स्मार्टफोनवर हे अॅप आढळून येईल. या अॅपची लोकप्रियता आजही कायम आहे. त्याच्या स्पर्धेत इतरही काही वुई चॅट, लाईन, हाईक, चॅटऑन इत्यादी सारखी अॅप्स उतरली, पण ती काही व्हॉटसअॅप इतकी लोकप्रियता मिळवू शकली नाहीत. त्यामुळे आजही व्हॉटसअॅप ची मोहिनी कायम आहे.  

आता रिलायन्सने व्हॉटसअॅप सारखेच आपले एक भारतीय अॅप JIO Chat या नावाने गुगल प्लेवर उपलब्ध केले आहे. व्हॉटसअॅप प्रमाणेच हे एक फ्रेंडस अँड फॅमिली नेटवर्किंग अॅप आहे.  व्हॉटसअॅप आणि JIO Chat मधील एक महत्वाचा फरक म्हणजे JIO Chat हे शंभर टक्के मोफत आहे. व्हॉटसअॅप हे एक वर्षापर्यंत मोफत वापरता येते त्यानंतर मात्र सुमारे पंचावण्ण रुपये प्रतिवर्षी त्यासाठी मोजावे लागतात. यासोबतच JIO Chat मध्ये व्हॉटसअॅपपेक्षा अधिक काही नविन वैशिष्ट्ये समाविष्ट केलेली आहेत.

  • यामध्ये टेक्स्ट मेसेज सोबत मल्टिमिडीया फाईल्स ऑडिओ, व्हिडीओ, इमेजेस तर पाठविता येतातच, पण Document फाईल्सही शेअर करता येतात.
  • यामध्ये इमोशन्स, डूडल्स, स्टिकर्स शेअर करता येतात.
  • यामध्ये व्हाईस व व्हिडिओ कॉलींग तसेच ग्रुप कॉलींगसुध्दा करता येते.
  • यामध्ये बातम्या, क्रिडा आणि मनोरंजनासाठी Firstpost, Moneycontrol, Cricketnext, IBNlive, MTvIndia असे अनेक चॅनेल्स उपलब्ध आहेत.
  • यामध्ये ग्रुप तयार करताना आता सभासदांच्या संख्येची अडचण येणार नाही, कारण यात ग्रुप मेंबर्सची मर्यादा 499 इतकी ठेवलेली आहे.

व्हॉटसअॅप मधील सगळ्या फीचर्स पेक्षा काही अधिक आणि वेगळ्या अश्या फीचर्सने भरलेले हे अॅप  फ्री आणि अॅड फ्री सुध्दा आहे. 

http://nathtel.blogspot.com/
जिओ चॅट आणि व्हॉटसअॅपमधील फीचर्सचा तुलनात्मक तक्ता

http://nathtel.blogspot.com/
जिओ चॅटमधील फिचर्स


http://nathtel.blogspot.com/
जिओ चॅटमधील फिचर्स


http://nathtel.blogspot.com/
जिओ चॅटमधील फिचर्स

विशेष म्हणजे अमेरिकन व्हॉटसअॅप वापरण्याऐवजी स्वदेशी JIO Chat वापरा. आणि व्हॉटसअॅपच्या माध्यमातून अमेरिकेला जाणारे आपले कोट्यावधी रुपये वाचवा असे आवाहन करणारा मेसेज सध्या सोशल मिडीयातून व्हायरल होत आहेत.

आपल्या देशाचा अभिमान असणाऱ्या प्रत्येक देशप्रेमी नागरिकांनी व्हॉटसअॅप ऐवजी JIO Chat वापरायला सुरुवात केली तर काहीही अशक्य नाही.

फक्त मला काय त्याचे? आणि मी एकट्याने बदल करुन काय फरक पडणार आहे? असा नकारार्थी विचार न करता, मी स्वतः बदलले आणि माझ्या ओळखीच्या लोकांनाही बदलायला सांगितले अशी भूमिका प्रत्येकाने घेतली तर या विचाराचे एका चळवळीत रुपांतर व्हायला वेळ लागणार नाही.

JIO Chat गुगल प्लेवर सर्च करुन डाऊनलोड करुन घ्या अथवा येथून करा.

आवश्यक अॅप; कॉल रेकॉर्डर


http://nathtel.blogspot.com/

आपल्याला आलेल्या किंवा आपण इतरांना केलेल्या कॉल्स मध्ये नेमके काय संभाषण झाले होते याचे रेकॉर्डिंग असणे काही प्रसंगी फार गरजेचे व उपयुक्त ठरते. त्या कॉल रेकॉर्डिंगवरुन प्रत्यक्ष काय संभाषण झाले होते याचा पुरावा आपल्या जवळ उपलब्ध होतो. आणि त्याचे अनेक प्रकारे फायदे होऊ शकतात.

उदा. कोणी एखादी व्यक्ती त्रास देण्याच्या हेतूने सतत कॉल करत असेल, बिझनेस मध्ये एखादे डील कोणत्या रेटमध्ये फायनल झाले होते याची माहिती पाहिजे असेल, किंवा तुम्ही एका मित्रास एका कार्यक्रमाचे आमंत्रण दिल्यावर त्याने काय सबब सांगितली होती याची त्याला आठवण करुन द्यायची असेल तर अशावेळी या कॉल रेकॉर्डिंगचा उपयोग होतो. श्या एक ना अनेक गोष्टींसाठी पुरावा म्हणून उपयोगी ठरणारे कॉल रेकॉर्डिंग करण्यासाठी आपल्या स्मार्टफोनवर कॉल रेकॉर्डींग अॅप असणे अतिशय गरजेचे आहे.

गुगल प्ले वर तसे अनेक कॉल रेकॉर्डींगचे अॅप्स उपलब्ध आहेत. पण त्यापैकी Call Recorder - ACR NLL निर्मित अॅप वापरुन पहायला हरकत नाही. हे एक चांगले मोफत कॉल रेकॉर्डिंग अॅप आहे. या अॅपद्वारे फोनवर येणाऱ्या प्रत्येक कॉलचे, तसेच फोनवरुन केल्या जाणाऱ्या प्रत्येक कॉलचे आपोआप रेकॉर्डिंग केले जाते.

आपणांस ज्या क्रमांकांच्या कॉल्सचे रेकॉर्डिंग होऊ नये किंवा ते होण्याची आवश्यकता नाही असे वाटत असेल तर, हवे ते क्रमांक यातून वगळण्याची सुविधा यांत उपलब्ध आहे. ही सुविधा येणाऱ्या व फोनवरुन केल्या जाणाऱ्या अश्या दोन्ही प्रकारच्या कॉल्ससाठी आहे. कॉल्सचे होणारे रेकॉर्डिंग जतन करण्यासाठी विविध फाईल फॉरमॅटचे पर्याय सुध्दा यात आहेत.

याची फाईल साईज 5.9 MB आहे.

'नामा' ही जाहला परका

घुमान संमेलनाच्या वेळी
हालत नव्हते
तुमच्या 'नामां'शिवाय 
आमच्या पेपरचे पान

संपन्न झाले संमेलन
विसरलो आम्ही घुमान
आज होता म्हणे तुमचा 
665 वा संजीवन समाधी सोहळा

पण तुमच्या स्मरणांसाठी
रिकामा नव्हता हो
पहिल्या पानावरचा
एकही कोपरा

'राँधे माँ' साठी मात्र
जागा ठेवा बरं का
माध्यमांसाठी आता
'नामा' ही जाहला परका

संत शिरोमणी श्री नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा


संत शिरोमणी श्री नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा


http://nathtel.blogspot.com/
संत शिरोमणी श्री नामदेव महाराजनाचू कीर्तनाचे रंगी।
ज्ञानदीप लाऊ जगी।


असा भक्तिचा संदेश देत

भागवत धर्माची पताका

संपूर्ण भारतभर फडकविण्याचे

अलौकिक कार्य करणाऱ्या

संत शिरोमणी श्री नामदेव महाराजांचा

आज संजीवन समाधी सोहळा.

त्यानिमित्त संत शिरोमणी

श्री नामदेव महाराजांचे चरणी विनम्र अभिवादन!
विंडोज 10 च्या ISO फाईलवरुन बूटेबल मिडीया तयार करणेविंडोज 10 ची ISO फाईल आपण डाऊनलोड करुन घेतलेली आहे. विंडोज 10 थेट कसे डाऊनलोड करायचे हे आपण याआधीच पाहिलेले आहे. आता आपण डाऊनलोड करुन घेतलेली ही विंडोज 10 ची ISO फाईल म्हणजे डिस्क इमेज या स्वरुपातील फाईल असते. या फाईलवरुन आपल्याला विंडोज 10 थेट संगणकावर स्थापित करता येत नाही. त्यासाठी त्या फाईलवरुन बूटेबल मिडीया उदा. युएसबी पेनड्राईव्ह किंवा डिव्हिडी तयार करावी लागते.

ISO फाईलवरून बूटेबल मिडीया बनविणे ही एक अत्यंत सोपी प्रक्रिया आहे. थोडक्यात ड्रॅग अँड ड्रॉप अँड क्लिक अशा स्वरुपाची ही प्रक्रिया आहे. त्यासाठी आपणाकडे विंडोज 10 ची ISO फाईल, बूटेबल मिडीया मेकर प्रोग्रॅम आणि 4 जीबी पेक्षा अधिक क्षमतेचे युएसबी पेनड्राईव्ह किंवा डिव्हिडी अशा स्वरुपाचे माध्यम असणे आवश्यक आहे. 

युएसबी पेनड्राईव्ह 4 जीबी क्षमतेचा असला तरी प्रत्यक्षात त्याची क्षमता 4 जीबी पेक्षा कमीच असते हे लक्षात घ्यावे, त्यामुळे किमान 8 जीबी क्षमतेचा तरी पेनड्राईव्ह असावा. तसेच डिव्हीडीपेक्षा युएसबी पेनड्राईव्ह अधिक गतीमान माध्यम आहे, असे मत काहीजण व्यक्त करतात. येथेही आपण  युएसबी पेनड्राईव्हचाच विचार केलेला आहे. पण डिव्हिडी काय किंवा युएसबी पेनड्राईव्ह काय माध्यम कोणतेही वापरले तरी काही फरक पडत नाही. आपल्याकडील उपलब्धतेनुसार आणि पसंतीनुसार कोणते माध्यम वापरायचे ते आपण ठरवावे.

आता हे बूटेबल पेनड्राईव्ह कसे तयार करायचे ते पाहू. यासाठी सर्वप्रथम ZOTAC WinUSB Maker या नावाचा बूटेबल मिडीया मेकर प्रोग्रॅम डाऊनलोड करुन घ्या. 


http://nathtel.blogspot.com/


युएसबी पोर्टमध्ये युएसबी पेनड्राईव्ह बसवा. तत्पूर्वी हा पेनड्राईव्ह रिकामा असल्याची खात्री करा. कोणत्याही महत्वाच्या फाईल्स त्यात ठेवू नका. कारण या प्रक्रिये दरम्यान पेनड्राईव्ह फॉरमॅट केला जातो. 

ZOTAC WinUSB Maker प्रोग्रॅम उघडा. खालील प्रतिमेत दाखविल्याप्रमाणे त्यामध्ये विंडोज एक्सप्लोररमध्ये दिसणारा युएसबी पेनड्राईव्हचा आयकॉन ड्रॅग अँड ड्रॉप करा. 


http://nathtel.blogspot.com/


त्यानंतर विंडोज 10 च्या ISO फाईलचा आयकॉन ड्रॅग अँड ड्रॉप करा. आणि मेक युसबी बुटेबल बटनावर क्लिक करा. 

http://nathtel.blogspot.com/


पेनड्राईव्हमधील फाईल्स फॉरमॅट करण्याची विचारणा केली जाईल त्याला होकार द्या. 

http://nathtel.blogspot.com/


त्यानंतर बूटेबल मिडीया निर्माण करण्याची प्रक्रिया सुरु होईल, आणि ती पूर्ण होताच सक्सेसचा संदेश प्रदर्शित होईल. 

http://nathtel.blogspot.com/


याप्रकारे आपला विंडोज 10 च्या ISO फाईलवरुन बूटेबल पेनड्राईव्ह तयार झाला आहे.


विंडोज 10 थेट डाऊनलोड कसे करावे

http://nathtel.blogspot.com/
विंडोज 10


मायक्रोसॉफ्टने 29 जुलै 2015 रोजी सादर केलेली विंडोज 10 ही आधुनिक संगणक प्रणाली वापरुन पहाण्याची उत्सुकता सर्वच संगणक वापरकर्त्यांना नक्कीच लागलेली असेल. ही नव्याने सादर केलेली विंडोज 10 प्रणाली आपल्या संगणकावर स्थापित करण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध आहेत.

पहिला पर्याय म्हणजे आपल्या संगणकावर पूर्वीच स्थापित असलेली विंडोज 7, विंडोज 8.1 प्रणालीसाठी नविन विंडोज 10 आरक्षित करुन अपग्रेड करणे, आणि दुसरा पर्याय म्हणजे मायक्रोसॉफ्टच्या संकेतस्थळांवरुन विंडोज 10 डाऊनलोड करुन घेणे. यापैकी ज्यांनी पहिल्या पर्यायाचा अवलंब केलेला आहे, त्यांना अपग्रेडेशन काही काळ प्रतिक्षा करावी लागण्याची शक्यता आहे.

आणि ज्यांना प्रतिक्षा करण्याची इच्छा नाही, त्यांच्यासाठी विंडोज 10 डाऊनलोड करुन घेण्याचा पर्याय उपयुक्त ठरेल. मात्र विंडोज 10 डाऊनलोड करुन घेण्यासाठी मायक्रोसॉफ्टच्या संकेतस्थळाला भेट दिल्यावर विंडोज 10 डाऊनलोड करुन घेण्यासाठी आधी मिडीया क्रिएशन टूल डाऊनलोड करुन घेणे अनिवार्य आहे. त्यानंतर त्या टूलवर असलेल्या पर्यायापैकी योग्य तो पर्याय निवडल्यानंतरच विंडोज 10 डाऊनलोड करुन घेण्याची प्रक्रिया सुरू होते. 

पण हे मिडीया क्रिएशन टूल डाऊनलोड करुन न घेता ही विंडोज 10 ची ISO फाईल थेट कशी डाऊनलोड करुन घेता येईल, हे आपण आज येथे पहाणार आहोत.

मायक्रोसॉफ्टच्या संकेतस्थळाला आपण भेट देतो तेव्हा तेथे सर्वप्रथम आपल्या संगणकावर कोणती प्रणाली स्थापित आहे, हे आपल्या नकळत तपासले जाते. आणि जर आपल्या संगणकावर विंडोजची प्रणाली स्थापित आहे हे त्या वेबसाईटला निष्पन्न झाले तर मिडीया क्रिएशन टूल डाऊनलोड करुन घेण्याचा पर्याय पुढे येतो.

आणि याच टप्प्यावर आपण एक छोटीशी युक्ती वापरुन, म्हणजे आपल्या संगणकावर विंडोज ऐवजी दुसरीच प्रणाली (उदा. मॅक, ऊबंटु, अँड्राईड इत्यादी) स्थापित आहे असे भासवून, आपण मिडीया टूल डाऊनलोड न करता ही विंडोज 10 ची ISO फाईल थेटपणे डाऊनलोड करण्याची लिंक प्राप्त करु शकतो. आणि त्यासाठी फार वेगळं असं काही करण्याचीही गरज पडत नाही. ही युक्ती काय आहे ते आता आपण पाहू.

गुगल क्रोम हा एक लोकप्रिय आणि बहुतांश संगणकांवर वापरला जाणारा वेब ब्राऊजर आहे. त्यामुळे आपणही आपल्या संगणकावर गुगल क्रोम हा वेब ब्राउजर वापरत आहात हे येथे गृहित धरु. तर आता या वेब ब्राऊजरमध्ये आपणाला फक्त एक छोटेसे एक्सटेन्शन अॅड करायचे आहे. युजर एजंट स्विचर या नावांचे हे एक्सटेन्शन गुगलच्या वेब स्टोअरमध्ये सर्च करुन अॅड करता येईल किंवा येथे क्लिक करुनही अॅ़ड करुन घेता येईल. 

हे एक्सटेन्शन आपण आपल्या गुगल क्रोम ब्राऊजरमध्ये अॅड केल्यानंतर त्याचा आयकॉन ब्राऊजरच्या टूलबारवर दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर सिलेक्ट युजर एजंट याखाली ड्रॉपडाऊन मेनूमध्ये डिफॉल्ट सिलेक्ट असलेले आपणांस दिसेल. आता त्यावर क्लिक केल्यावर खाली दिसणाऱ्या यादीतील नावांमधून विंडोज ऐवजी दुसरी एखादी संगणक प्रणाली निवडा उदा. क्रोम ऑन मॅक. त्याचबरोबर ही निवड केल्यामुळे टूलबारवरील आयकॉनवर ऑन चे चिन्ह दिसेल. याचा अर्थ आता आपण युजर एजंट चेंज केला आहे. त्यामुळे आता आपल्या संगणकावरील स्थापित प्रणाली मायक्रोसॉफ्टच्या वेबसाईटला विंडोज ऐवजी मॅक आहे असे दिसेल.

http://nathtel.blogspot.com/
युजर एजंट स्विचर


हा टप्पा व्यवस्थितपणे पार पाडला आहे याची खात्री झाल्यानंतर मायक्रोसॉफ्टच्या संकेतस्थळावरुन विंडोज 10 ची ISO फाईल थेट डाऊनलोड करुन घेण्यासाठी येथे क्लिक करा. मायक्रोसॉफ्टच्या वेबसाईटला भेट देताच आता त्यांच्या तपासणीत आपल्या संगणकावर विंडोज ऐवजी दुसरीच प्रणाली स्थापित आहे असे दिसेल. त्यामुळे मग या वेबपेजवर विॆडोज 10 ची कोणती आवृत्ती आपणांस डाऊनलोड करुन घ्यायची आहे त्यासाठीचे पर्याय सर्वप्रथम आपणांसमोर येतील. त्यापैकी विॆडोज 10 हा पर्याय निवडा. किंवा आपल्या गरजेनुसार इतर दुसरा पर्यायसुध्दा निवडता येईल.

http://nathtel.blogspot.com/
विंडोज 10 आवृत्ती निवडीचे पर्याय


त्यानंतर भाषा निवडीचा आणखीन एक पर्याय आपणांपुढे येईल. त्यापैकी इंग्लिश हा पर्याय निवडा. त्यानंतर लगेचच आपणांसाठी विंडोज 10 ची ISO फाईल डाऊनलोड करुन घेण्यासाठी लिंक निर्माण करण्याची प्रक्रिया सुरु झालेली दिसेल. ती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्या वेबपेजवर बॅकस्पेस किंवा पेज रिफ्रेश यासारखी कोणतीही कृती करु नका.

http://nathtel.blogspot.com/
विंडोज 10 भाषा निवडीचे पर्याय


त्यानंतर काही क्षणांतच विंडोज 10 ची ISO फाईल थेट डाऊनलोड करुन घेण्यासाठी, 32 बिट व 64 बिट अशा दोन पर्यायाद्वारे ती लिंक आपणांसमोर येईल. या दोन्ही पर्यायापैकी आपल्या गरजेनुसार आवश्यक त्या पर्यायाच्या बटनावर क्लिक करुन विंडोज 10 ची ISO फाईल आपणांस थेट डाऊनलोड करुन घेता येईल.

http://nathtel.blogspot.com/
विंडोज 10 डाऊनलोड लिंकचे पर्याय


महत्वाची सूचना : या डाऊनलोड लिंकची वैधता केवळ चोवीस तासच असते. त्यामुळे चोवीस तासांच्या आतच हे डाऊनलोडींग पूर्ण करुन घ्यावे लागते, हे येथे लक्षात घेणे गरजेचे आहे. त्यामुळे ही फाईल जलद गतीने डाऊनलोड करण्यासाठी एका फाईलचे सुमारे आठ भागात विभाजन करुन आठपट शीघ्र गतीने डाऊनलोडींग करण्यासाठी प्रसिध्द असलेला इंटरनेट डाऊनलोड मॅनेजर सारखा एखादा प्रोग्रॅम यासाठी उपयुक्त ठरु शकेल.