April 2014 | आगळं! वेगळं !!!

पॉलिटिका ई-पुस्तकावरील प्रतिक्रिया



पॉलिटिका ई-पुस्तकावरील प्रतिक्रिया
माझे ई-पुस्तक पॉलिटिका गुढीपाडवा दि.31.03.2014 या दिवशी प्रसिध्द झाल्यानंतर काही वाचकांनी त्यावर दिलेल्या प्रतिक्रिया येथे दिल्या आहेत. ज्या वाचकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत, त्यांचेही आभार आणि ज्या वाचकांनी दिलेल्या नाहीत त्यांचेही आभार. यापुढेही येणाऱ्या प्रतिक्रिया येथे अपडेट करण्याचा प्रयत्न केला जाईल.

Mon 07/04/2014 11:56 AM
Shri.Raman Karanjkaranche Politika he akadam mast pustak ahe.
Shri.Ramadas Futaney yanche zak janavale.
- JAYANT G ADKAR

¬¬¬¬

Tue 08/04/2014 09:46 AM
Dears,
Politika Charolyas are really fantastic!
Regards!
- Shripad J Lele
Associate Vice President  ( EHS,QS)

¬¬¬¬

Thu 10/04/2014 12:59 PM
Respected  Sir/Madam,
Thank you so much for sending this open-minded, realistic and practical email.
Such type of great mail could never get in my reading.
Once again thanks & best wishes from me.
Thanks & regards,
-Shahaji Jadhav,

¬¬¬¬

Thu 10/04/2014 04:44 PM
पॉलिटिका : *रमण कारंजकर* yanche pustak avadale.  Chalu ghadamodinche
darshan ghadale.
-
Anil Mohite

¬¬¬¬

Fri 11/04/2014 08:27 AM
Zakaaaaaaaaaaaaaaaaaaaaaassssssssssssss !!!!!!!!
With best regards,
- Shubhada Raje

¬¬¬¬

Fri 11/04/2014 09:50 AM
Dhanyavad
Politica …….

Vachayal dilyabaddal Kup Khup aabhari aahe………

If you have any books please send it to me on my below email id
Thanks & Regard's
- Anand Ranjane

¬¬¬¬

Sun 13/04/2014 05:37 PM
hi Raman...
khup mast..
pollitica madhle vatratika awdlya...
khas karun ti ashok chavan an rahul gandhi...
ithun pudhe j kahi lihishil ,te wachayla nakkich awdel mala...
asach lihit raha....
all d best...
- poonam p patil


¬¬¬¬

उत्सव लोकशाहीचा



उत्सव लोकशाहीचा
आधी जाणार मतदानाला
मगच लागणार कामाला
संकल्प मनाशी करुया
मतदानाचा हक्क बजवून
लोकशाहीचा उत्सव मनवूया
प्रचंड मतदान करुन
जिल्ह्याच्या नांवावर
नवा विक्रम घडवूया

ई-साहित्य प्रतिष्ठान : एक चळवळ



ई-साहित्य प्रतिष्ठान : एक चळवळ

मराठी भाषेतील साहित्यासाठी काही तरी केले पाहिजे या एका विचाराने झपाटलेली, आणि मराठी साहित्यावर प्रेम करणारी काही मंडळी सुमारे पाच वर्षापूर्वी एकत्र आली. मग सुरु झाले विचारमंथन, विचारांना दिशा मिळाली आणि त्यातूनच जन्म झाला एका चळवळीचा. आणि बघता बघता काही कालावधीतच त्या चळवळीने एका साहित्य यज्ञाचे स्वरुप धारण केले, त्या यज्ञाचं, त्या चळवळीचं नांव आहे ई-साहित्य प्रतिष्ठान.
छापील साहित्याच्या तुलनेत ई-साहित्य निर्मितीला येणारा अल्प खर्च, अनंतकाळचा टिकाऊपणा, वितरणासाठीचा अल्प खर्च, हव्या तश्या बहुरंगी सजावटीमुळे अधिक आकर्षकपणा आणि कमीत कमी वेळेत निर्मिती, याचसोबत कागद व शाईचा वापर नसल्यामुळे पर्यावरणचा समतोल राखण्यास अनुकूल अशी ई-साहित्य माध्यमाची जबरदस्त ताकद लक्षात घेऊन त्यांनी हेच माध्यम निवडले.
आणि या मंडळींनी ई-साहित्याच्या सेवेत स्वतःला झोकून दिले. अगदी निस्वार्थीपणे. यातून स्वतःला काही प्राप्ती व्हावी हा उद्देश तर अजिबातच नाही, तर मराठी साहित्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या जगभरात विखुरलेल्या साहित्यप्रेमींना आपल्या माध्यमातून काही तरी चांगले साहित्य प्राप्त व्हावे. नवोदितांना प्रकाशन, वितरणांसाठी व्यासपीठ मिळावे, हाच या चळवळीच्या मागे उभा असलेला आणि या कार्यासाठी त्यांना निरंतर प्रेरणा देत रहाणारा उदात्त विचार.
नवोदित साहित्यीकांना प्रोत्साहन देऊन, त्यांचे साहित्य प्रकाशित करणे ते वितरीत करणे, नियतकालिके चालविणे, तसेच त्यांच्या संकेतस्थळांवर हे सर्व साहित्य सर्व मराठी साहित्यप्रेमी वाचकांना उपलब्ध करुन देणे यासारख्या कार्यातून ही चळवळ आज प्रगती करत आहे.
त्यांच्या ई-साहित्य प्रतिष्ठान या संकेतस्थळांवर त्यांनी आजवर प्रकाशित केलेली अडीचशेहून अधिक विविध विषयांवरील ई-पुस्तके, नियतकालिके असे सर्व ई-साहित्य डाऊनलोड करुन घेण्यासाठी सर्वांना उपलब्ध आहेत. आणि तेही अगदी विनामूल्य. साहित्य आणि वाचक यांच्यात कोणत्याही जाहिरांतींचासुध्दा अडथळा नाही, असा पारदर्शकपणा या संकेतस्थळावर पहायला मिळतो.
www.esahity.com

वितरणांसाठी आज या ई-साहित्य प्रतिष्ठानकडे सुमारे दीड लाख वाचकांचा ई-मेल आयडींचा डाटाबेस तयार आहे. आणि सर्व ई-साहित्य या लाखो वाचकांपर्यंत ई-मेलच्या माध्यमातून अतिशय जलदगतीने पोहोचविले जाते.
तेव्हा या चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी, आणि चांगले साहित्य वाचायला मिळण्यासाठी आपण सर्वांनी त्यांच्या संकेतस्थळाला एकदा भेट देऊन एक प्रसन्न अनुभव जरुर घ्यावा. येणारे नविन साहित्य मिळण्यासाठी आपला ई-मेल आयडी देऊन सभासद म्हणून नोंदणी करावी. 
बारा कोटी मराठी माणसांपैकी निदान एक टक्का म्हणजे किमान बारा लाख लोकांपर्यंत पोहोचण्याचा संकल्प उरी बाळगून ई-साहित्य प्रतिष्ठान उत्तुंग झेप घेण्यासाठी सज्ज आहे. त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकून, त्यांच्या संकल्पाच्या पंखात बळ भरण्यासाठी, प्रत्येक मराठी वाचक सभासद नोंदणीच्या रुपाने आपले योगदान नक्कीच देतील अशी अपेक्षा आहे.

* * *

नळावरची भांडणे



नळावरची भांडणे
शिवीगाळ करत रोजच लफडी
बाहेर काढली जात असतात
सार्वजनिक नळावरची भांडणे आता
उमेदवारांचा प्रचार करत असतात

दिल्लीची किल्ली



दिल्लीची किल्ली
गल्लीतून दिल्लीत गेल्याची स्वप्ने
हल्ली रोजच पडायला लागली
पण सूज्ञ मतदारांच्या हाती दिसणारी
किल्ली बघून झोप ऊडायला लागली

तुमचा हात आमचे श्रीमुख



तुमचा हात आमचे श्रीमुख
तुम्ही आमआदमी मी पक्षप्रमुख
भेटण्यासाठी नाही सुरक्षेचे हूक
केली असेल जर मी काही चूक
तर तुमचा हात, आमचे श्रीमुख

व्होट शिफ्टींग



व्होट शिफ्टींग
हार्ड वाटणारे प्रॉब्लेम्स सुध्दा
आम्ही एकदम सॉफ्ट करतो
तुम्ही कुणालाही व्होट गिफ्टकरा
आम्ही पाहिजे तिकडे शिफ्ट करतो

अंनिसने यांनाही आव्हान द्यावे



अंनिसने यांनाही आव्हान द्यावे
लोकसभा निवडणूक 2014 च्या पार्श्वभूमीवर काही ज्योतिष्य तज्ञांनी, नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत असे भाकित केले आहे. त्यामुळे ज्योतिष्यशास्त्राने केलेला हा दावा सध्या चर्चेत आहे. अशातच अंधश्रध्दा निर्मूलन समितीने म्हणजेच अंनिसने ज्योतिष्यशास्त्राला निवडणूकांच्या निकालांचे अंदाज अचूक सांगण्याचे आव्हान दिलेले आहे.
ज्या ज्या वेळी सार्वत्रिक निवडणूका येतात त्या त्या वेळी, निवडणूकांच्या तोंडावर अश्या चर्चा नेहमीच घडत असतात. निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर फक्त ज्योतिषीच भविष्य वर्तवून दावा करतात असे नाही, तर प्रिंट मिडिया व इलेक्ट्रॉनिक मिडीया म्हणजेच विविध वर्तमानपत्रे आणि विविध दूरचित्रवाहिन्यासुध्दा वेगवेगळया सर्वेक्षण करणाऱ्या संस्थांच्या सहकार्याने सर्व्हे करुन, त्यांचे रिपोर्टस आपल्या वाहिन्यांवर, वर्तमानपत्रातून प्रसिध्द करुन आपली लोकप्रियता वाढविण्याचा प्रयत्न करत असतात हेही सर्वश्रुत आहेच.
बरे केवळ माध्यमेच दावा करतात असेही नाही, तर विविध राजकीय पक्षांचे नेते, प्रवक्ते सुध्दा आपापल्या पक्षाला इतक्या जागा मिळतील, तर विरोधी पक्षाला तितक्या जागा मिळतील असे दावे छातीठोकपणे करताना दिसत असतात. सर्व्हे करणाऱ्या संस्थांचे रिपोर्टस शास्त्रीय पध्दतीवर आधारित असल्याचा दावा केला जातो. तर सत्ताधारी राजकीय पक्षांच्या दाव्यांना सरकारी गुप्तचर यंत्रणांच्या अवहलांचे पाठबळ असते ही बाब नाकारुन चालणार नाही.
काही महिन्यापूर्वीच पार पडलेल्या देशातील पाच विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर विविध चॅनेल्सवर व वर्तमानपत्रातून प्रसिध्द झालेल्या जवळपास सगळ्याच सर्व्हेंचे रिपोर्टस विशेषतः दिल्ली विधानसभेबाबतचे बऱ्याच प्रमाणात चुकीचे ठरले हे देशातील जनतेने अनुभवले आहे. नाही म्हणायला याला केवळ चाणक्य टुडे ही एकमेव सर्वेक्षण संस्था अपवाद ठरली. मग असे असताना सर्वसामान्य जनतेने विश्वास कोणावर ठेवायचा हा प्रश्न निर्माण होतो.
प्रत्यक्ष जनतेतील काही लोकांना प्रश्न विचारून, शास्त्रीय पध्दतीचा अवलंब करुन केलेले सर्वेक्षण संस्थांचे सर्व्हे जर चुकीचे ठरत असतील, गुप्तचर यंत्रणांनी संकलित केलेल्या माहितीच्या आधारे सत्ताधारी पक्षांनी केलेले दावे चुकीचे ठरत असतील, तर अंनिसने फक्त ज्योतिष्यशास्त्राकडूनच अचूक अंदाजांची अपेक्षा का ठेवावी?
त्यामुळे अंनिस केवळ ज्योतिष्य शास्त्रालाच, त्यांनी केलेले दावे असत्य व चुकीचे आहेत असे मानून का आव्हान देत आहे असा प्रश्न पडतो. अंनिसने निवडणूकांच्या अंदाजाबाबत केवळ ज्योतिष्यशास्त्रालाच आव्हान देण्याऐवजी, त्यांनी त्यांच्या आव्हानाची कक्षा अधिक रुंद करावी, व वर उल्लेख केल्याप्रमाणे विविध सर्व्हे करणाऱ्या संस्था, त्यांना प्रसिध्दी देणारी प्रिंट मिडीया व इलेक्ट्रॉनिक मिडीया, विविध पक्षांचे प्रमुख, प्रवक्ते असे जे पण कोणी निवडणूकीच्या निकालाबाबतचे दावे करत आहेत, त्या सर्वांनाच त्यांनी केलेले दावे सिध्द करण्याचे आव्हान द्यावे.

* * *

आमचीच नाती अन् आमचीच माती



आमचीच नाती अन् आमचीच माती
एकाच्या कपाळी दगड तर
दुसऱ्याच्या डोक्यात बाटली
कशाला चर्चा, दोष कोणाचा किती
आमचीच नाती अन् आमचीच माती

डाऊनलोड करा पॉलिटिका ई-पुस्तक


डाऊनलोड करा पॉलिटिका ई-पुस्तक


माझे ई-पुस्तक पॉलिटिका गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रकाशित झाले. बऱ्याच दिवसांपासून वात्रटिकांचे ई-पुस्तक काढावे अशी कल्पना मनात होती. ती कल्पना या निमित्ताने साकार झाली. या पुस्तकाचे लेखन, प्रकाशन, टाईपसेटींग, रचना, मुखपृष्ठ अश्या सर्व जबाबदाऱ्या मीच पार पाडल्यामुळे या निमित्ताने ई-पुस्तक निर्मितीमधील पुष्कळशा गोष्टी मला शिकायला मिळाल्या. स्वनिर्मितीचा आनंद काही वेगळाच असतो याचाही प्रत्यय आला.

हे पुस्तक येथून डाऊनलोड करुन घ्या.




अॅन्ड्रॉईड मोबाईलसाठी गुगल प्ले वरही उपलब्ध आहे.

लोकसभेची रणभूमी



लोकसभेची रणभूमी
आमनेसामने उभ्या ठाकलेल्या सेना
एकमेकांना ललकारायला लागल्या
शत्रूवर आक्रमण करण्याऐवजी
आपसांतच लढायला लागल्या

रागरंग



रागरंग
पेपरबाण मारुनी मागता काय
टाळी अन पुसता काय औकात
आता होईल सगळी इच्छा पुरी
जाहिर सभेत अन भर चौकात