March 2011 | आगळं! वेगळं !!!

कौतुक मराठी ब्लॉग्जचे

रविवार दि. २७ मार्च २०११ रोजी सकाळी सहजपणे टीव्ही लावला असता, स्टार माझा वाहिनीवर मराठी ब्लॉगर्सना स्टार माझातर्फे आयोजित केलेल्या पारितोषक व प्रमाणपत्र वितरणाचा सोहळा पाहण्यात आला. ज्यांचे ब्लॉग आपण नेहमी पाहतो, वाचतो त्या ब्लॉग्जधारकांना प्रत्यक्षपणे टीव्हीवर पारितोषिके स्वीकारताना व आपले मनोगत व्यक्त करताना बघून

सगळं कसं शिस्तीत झालं पाहिजे!

=> हिंदू राष्ट्रवाद म्हणजे भाजपाचे संधीसाधू राजकारण; विकिलीक्सचा बॉम्बगोळा : अरुण जेटली यांचा मात्र या विधानाचा इन्कार
  • विकिलीक्सवर आमच्या पक्षाविषयी जे काही प्रसिद्ध होईल, त्यास आमचा कायमस्वरूपी इन्कार समजावा, मात्र विरोधी पक्षाविषयी केलेल्या आरोपाबाबत आमचा पूर्ण होकार समजावा

लवकरच करावी लागेल 'नवग्रह' शांती

=> क्रिकेट डिप्लोमसी! मी मोहलीवर असेलच...झरदारी, गिलानी तुम्हीपण या! : पंतप्रधान मनमोहनसिंग यांचे पाकला निमंत्रण
  • येताना 'दाउद'लाही आणा, आम्हीपण हसणाऱ्या अफजल गुरूला आणि टाळ्या वाजवणाऱ्या कसाबला आणणार आहोत

हायटेक हुरडा

=> सध्या आम्ही तोंड चालविण्यापेक्षा ते बंद ठेवण्याच्या प्रयत्नात आहोत : ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पोंटिंग
  • नको तिथे तोंड घालणं महागात पडतं हे समजलं वाटतं!

वृत्तपत्रात अस्सल मराठी वापरावी का

लोकमतच्या औरंगाबाद (मराठवाडा) आवृत्तीचे निवासी संपादक चक्रधर दळवी यांचे 'मराठीच्या पिंडावरील कावळे' हे भाष्य नुकतेच वाचण्यात आले. त्यात ते म्हणतात, एखाद्या प्रसंगात एखाद्या व्यक्तीने अविवेकी भाषा वापरली असेल, आणि त्या प्रसंगाची बातमी करायची असेल तर वृतपत्रांनी काय करावे? बातमीत ही भाषा वापरावी का 'फुल्या-फुल्या' मारून वेळ मारून न्यावी? परवा एका वाचकाचा फोन आला होता, तेव्हा हा प्रश्न उपस्थित झाला. जे काही घडले ते जसेच्या तसे कळणे, हा वाचक या नात्याने आमचा हक्क आहे. इंग्रजी वृतपत्रे असभ्य ठरविलेल्या शब्दांचे रिपोर्टिंगही करतात. मराठीत ते का घडू नये, असे या वाचकाने ठणकावून सांगितले. याला निमित्त ठरले लोकमत मध्ये प्रसिद्ध झालेली एक बातमी. जनगणना कर्मचाऱ्यावर चिडलेल्या एका महिलेने या कर्मचाऱ्याला 'भाड्या' म्हनून शिवी हासडली. लोकमतने हे वाक्य जसेच्या तसे उचलले. त्यावर या वाचकाने फोन करून लोकमतचे अभिनंदन केले.

काढा आतील कडी'

=> तृणमूलला २२९ तर कॉंग्रेसला ६४ ऐवजी ६५; प. बंगाल मधील जागावाटपाबाबत समझोता
  • काय सांगता? चक्क एक जागा वाढवून मिळाली? 'आत्मसन्मान' म्हणतात तो हाच!

लवचिक 'आत्मसन्मान'

=> बिनचूक खेळण्याचा भारतीयांचा निर्धार; उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश दडपण नसल्याने निश्चिंती
  • त्यातूनही काही चुकलेच तर ते 'चुकीने' घडले असे समजण्यात यावे

कस्टमर केअर उर्फ ग्राहक छळवाद केंद्र

हल्ली मोबाईल कंपन्याकडून ग्राहकांच्या बॅलन्सची नकळतपणे कत्तल सुरु आहे. जे ग्राहक आपल्या बॅलन्सबाबत बेफिकीर असतात, त्यांना हे लक्षात येत नाही. मात्र जे ग्राहक सतत आपल्या बॅलन्सकडे लक्ष ठेवून असतात त्यांच्या निदर्शनास ही बाब लगेच येते. आपल्या मोबाईलवर जे प्रमोशनल कॉल्स आणि एसएमएस येत असतात, प्रमुखाने त्यांचेच हे प्रताप असू शकतात.

ब्रम्हानंदी लागली टाळी

=> माफियांना संरक्षण देणाऱ्या सरकारला जनतेनेच खाली खेचावे : गडकरी
  • माफ करा गडकरी जी! खेचाखेचीचे डावपेच जनतेला अजून कुणी शिकविलेच नाहीत

भाजपा बदनाम

=> महिला आरक्षण विधेयक तूर्त लांबणीवर; अधिवेशनानंतर तो विषय : मुख्यमंत्री
  • अरेरे! राष्ट्रवादीने आजच अर्धा पानाच्या रंगीत जाहिराती की हो दिल्या!

माफीयाराज उध्वस्त करणार

=> महागाईचा दर अखेर एकेरी आकड्यात; फेब्रुवारी अखेर ९.५२ टक्के
  • यासाठी सर्वसामान्य जनतेने सरकारची पाठ थोपटण्याची गरज आहे

मुरलेले राजकारणी

=> हसन अली शस्त्रांचाही व्यापारी? दहशतवादाचाही गुन्हा दाखल करण्याचा सुप्रीम कोर्टाचा आदेश
  • सरकारचा नाकर्तेपणा; न्यायसंस्थेला बनावे लागले 'तपास यंत्रणा'

'झंडू बाम' पेक्षा नवा 'स्ट्राँग फॉर्म्युला'

=> मी 'पळपुटा' नाही; तर दुसऱ्यांना 'पळवितो' : खा. सुरेश कलमाडी
  • आता सीबीआय चेच उदाहरण पहा ना!

तेवढं सोडून बोला!

=> अमीर बनला ऋतीकचा 'फॅन'
  • उन्हाळा आला वाटतं!
=> हसन अली मुंबईतील रुग्णालयात, पण कोणत्या? : 'चार्टर्ड अकाऊंटंट' ची माहिती
  • तेवढं सोडून बोला!
=> 'बोफोर्स'ला मुठमाती, खटला बंद करण्याच्या सीबीआयच्या विनंतीला मान्यता
  • तपासासाठी देशाला अडीचशे कोटींचा चुना!