2013 | आगळं! वेगळं !!!

प्रस्थापित पोरखेळ



वृत्तपत्रे प्रबोधन करतात हे आम्ही ऐकून आणि वाचूनही होतो, पण त्याची प्रचिती आम्हाला कधी आली नव्हती किंवा आम्ही ती घेण्याच्या फंदात पडलो नव्हतो. पण तो योग आज आलाच. त्याला कारणही तसंच घडलं. शुक्रवार दि. 18 ऑक्टोबर 2013 रोजी आम्ही दै. लोकमत मधील प्रस्थापित पोरखेळ नामक अग्रलेखावर नजर टाकली, अन् तत्क्षणीच हा साक्षात्कार आम्हाला झाला. अर्थात आमच्या बालबुध्दीमुळे असा साक्षात्कार व्हायला आमच्या वयाची पन्नाशी उलटावी लागली हा भाग वेगळा, असो.

तर या अग्रलेखातून जनसामान्यांचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला आहे, असा आमचा पक्का समज झाला आहे. त्या प्रबोधनातून आम्ही जो काही बोध घेतला आहे, तो आम्ही आपणांपुढे जसाच्या तसा सादर करीत आहोत.

अग्रलेखाचे शीर्षक - प्रस्थापित पोरखेळ

कायद्याच्या कच्याट्यात अडकलेल्या कोणत्याही इसमाने उठावे आणि थेट पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग किंवा काँग्रेसाध्यक्ष सोनिया गांधी यांच्यावर दगडफेक करावी हा आपल्या राजकारणातील आताचा प्रस्थापित पोरखेळ आहे.

प्रकाश जावडेकरांसारखी हलकीफुलकी आणि जनाधारहीन माणसे जेव्हा पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा, असे म्हणताना दिसतात तेव्हा ती याच पोरखेळाचा पुरावा देत असतात...इत्यादी इत्यादी आणखी बोध घेण्यासारखे बरेच काही

आमच्या बालबुध्दीला झालेला बोध - 1) प्रकाश जावडेकरांसारख्या हलक्या फुलक्या माणसांनी आपली प्रकृती लक्षात घेता पोरखेळ खेळायला जड असे दगड पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग किंवा काँग्रेसाध्यक्ष सोनिया गांधी यांच्यावर दगडफेक करण्यासाठी उचलू नयेत. दुसऱ्या भाषेत हलक्याफुलक्या जावडेकरांनी पचायला जड (काँग्रेसला) असं काही उच्चारु नये.

2) केवळ प्रकाश जावडेकरांनीच नव्हे तर काँग्रेसेतर सर्वच पक्षाच्या प्रवक्त्यांनी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग किंवा काँग्रेसाध्यक्ष सोनिया गांधी यांच्यावर अशी दगडफेक करण्यापूर्वी आपली प्रकृती हलकीफुलकी आहे की जड, मजबूत, भक्कम आहे, तसेच आपल्याला जनाधार आहे, की फक्त पक्षाचा आधार आहे हे दगडफेक करण्याआधी तपासून घेणे यापुढे अतिशय आवश्यक झाले आहे. ( खरं तर हे अनिवार्य करावं असं आमचं प्रामाणिक मत आहे. पण यातून काँग्रेसच्या प्रवक्त्यांना सूट देण्यात यावी अशीही सूचना आहे.)

या अग्रलेखात आणखीही बोध घेण्याजोगं बरंच काही लिहीलं आहे. पण आमची बालबुध्दी आत्ता तरी यापेक्षा अधिक काही टंकायला नकार देत आहे. तेव्हा तूर्त एवढेच पुरे.

‘वट’ गांधीचा आणि ‘हूकूम’ही गांधींचाच

दोन किंवा त्यापेक्षा अधिक वर्षे शिक्षा सुनावलेल्यांची आमदार, खासदारकी रद्द करुन त्यांच्यावर सहा वर्षे निवडणूक लढविण्यास प्रतिबंध करणारा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला केराची टोपली दाखविण्यासाठी  आणण्यात आलेला वादग्रस्त अध्यादेश सरकारने मागे घेतला.

लोकप्रतिनिधीपेक्षा कुणीही श्रेष्ठ नाही,  हे सिध्द करण्याचा हा केवढा आटापिटा आणि किती ही तत्परता! घटनेने कायदा बनविण्याचे अधिकार संसदेला दिलेले आहेत. पण या संदर्भात चर्चा करुन कायदा करण्याइतपतही धीर सरकारला निघाला नाही, त्यामुळे तातडीने अध्यादेश काढण्याची गरज सरकारला वाटली.

खरे तर सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालात काहीच चुकीचे नाही अशी सर्वसामान्यांची समजूत. पण जे सर्वसामान्यांना मान्य ते या लोकप्रतिनिधींना मान्य कसे होईल? आणि असे झाले तर मग सर्वसामान्य आणि लोकप्रतिनीधी यांच्यात फरक तो काय राहिला?

तेव्हा मग असे ना का सर्वोच्च न्यायालयाचा निकाल, आमच्या सोईसाठी त्यालाही केराची टोपली आम्ही दाखवू शकतो हे दाखवून देण्यासाठी हा अध्यादेश काढून राष्ट्रपतींच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आला होता. परंतु सर्वसामान्य भारतीयांच्या सुदैवाने जागृत सद् विवेक बुध्दीचे राष्ट्रपती आपल्या राष्ट्राला लाभले आहेत, त्यामुळे या अध्यादेशाला राष्ट्रपती भवनातून लाल कंदील दाखविण्यात आला.

मग अशा परिस्थीती सरकारची होणारी नाचक्की टाळण्यासाठी राहुल गांधीच्या विरोधाचे नाट्य घडवून आणण्यात आले, आणि सरकारची होणारी बेअब्रु टाळण्याचा केविलवाणा आणि हास्यास्पद प्रयोग पार पडला. अध्यादेश मागे घेतल्याची घोषणा केल्यानंतर रात्री विविध वाहिन्यांवर रंगलेल्या चर्चेत राहुल गांधींचा विरोध म्हणजे जनसामान्यांच्या मताचा आदर होता अशी बाजू मांडण्याची काँग्रेसच्या प्रवक्त्यांची केविलवाणी धडपड सुरू होती.

या निमित्ताने काही प्रश्न उपस्थित होतात, मंत्रीमंडळाचा निर्णय अंतिम की राहुल गांधींचा? जनमताचा आदर करण्याची सुबुध्दी लोकपाल, महिलांवरील अत्याचार किंवा त्यासारख्या अनेक संवेदनाशील विषयांत राहुल गांधींना का झाली नाही? नेमकी याचवेळी कशी झाली? राहुल गांधी यांच्या मते हा अध्यादेश नॉनसेन्स आणि फाडून फेकून देण्याच्या लायकीचा होता (आणि सरकारनेही ते मान्य केले) तर मग जे राहुल गांधींना समजले ते मंत्रीमंडळातील जेष्ठ, श्रेष्ठ, राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या मंत्र्यांना कसे समजले नाही? राहुल गांधी यांनी जनमताचा आदर राखला म्हणजेच मंत्रीमंडळाने तो पायदळी तुडविला होता हे तर उघडच आहे, तेव्हा या चुकीबद्दल सरकार सर्वसामान्य जनतेची माफी मागणार आहे का हाच खरा प्रश्न आहे.


* * *

कशाला डोकं खाता भाऊ




दारु गुटखा आणि मटका
कठीण आहे यातून 
व्यसनाधिनांची सुटका

मावा बंद, पण तंबाखू चालू
गुटखा बंद, पण सिगारेट चालू
हातभट्टी बंद, पण विदेशी चालू
मटका बंद, पण लॉटरी चालू

कायद्याने बंदी म्हणजेच
नोकरशाहीची चांदी
म्हणजे काम बंद
पण रस्ता चालू 

कशाला डोकं खाता भाऊ
जाऊद्या दुसऱ्या विषयावर 
काही तरी बोलू

विनम्र अभिवादन

संतशिरोमणी श्री नामदेव महाराज 






---------------------------------------------------------------

संतश्रेष्ठ


संतशिरोमणी श्री नामदेव महाराज 


यांच्या 663 व्या पुण्यतिथी


निमित्त त्यांचे चरणी


विनम्र अभिवादन!

वारकरी लहान, नेते महान!

सध्या पंढरीच्या वारीचे रिपोर्टींग करण्याची विविध वाहिन्यांमध्ये जोरदार स्पर्धा सुरू आहे. खरे तर विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने पंढरीची पायी वारी वर्षानुवर्षे करणाऱ्या वारकऱ्यांना अगदी आत्ता काही वर्षात सुरू झालेल्या या लाईव्ह रिपोर्टींगचे कौतुक असण्याचे काहीच कारण नाही. आपला टीआरपी वाढविण्याकडे लक्ष देणाऱ्या वाहिन्यांना मात्र त्याची आवश्यकता वाटत आहे. पण रिपोर्टींग करण्यासाठी वारीसोबत जाणाऱ्या या वाहिन्यांच्या वार्ताहरांनी काही गोष्टींचे भान राखण्याची गरज आहे.
या दिंडीत पायी चालणाऱ्या वारकऱ्यांच्याऐवजी जे सेलिब्रेटी काही मिनीटांसाठी वारीत सहभागी होतात, त्यांना फुकटचा भाव देण्यामुळे खऱ्याखुऱ्या वारकऱ्यांवर मात्र अन्याय होत आहे, असे वारीचे विशेष बातमीपत्र पहाणाऱ्या सर्वसामान्य प्रेक्षकांची भावना झाल्यास नवल नाही. खऱ्या वारकऱ्यांना या असल्या प्रसिध्दीची हौस नसते. ते तर टाळमृदंगाच्या नादब्रम्हात दंग होऊन भक्तीरसात चिंब होऊन, विठ्ठल नामाचा गजर करत उन-पाऊस, थंडी-वाऱ्याची पर्वा न करता अथकपणे मार्गक्रमण करत असतात.
अलीकडे वारीमध्ये काही मिनीटांसाठी सामील होण्याची सेलिब्रेटी, नेतेमंडळीमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. पण काही मिनीटांसाठी वारीत सामील झाल्यामुळे आपल्या सोबत आलेल्या लवाजम्यामुळे आणि सिक्युरिटीमुळे, पांडुरंगाच्या भेटीच्या ओढीने पंढरीकडे वाहणाऱ्या या भक्तीरसाच्या प्रवाहाला अडथळा होतो आहे याचे भान त्यांना रहात नाही. आणि अशातच हे वार्ताहर तुम्ही मला सांगा, तुम्हाला या वारीत सामील झाल्यामुळे कसं वाटतयं? काय वाटतयं? यासारखे भंपक प्रश्न विचारत त्यांच्या मागेपुढे फिरत असतात. आता यावर हे सेलिब्रेटी म्हणतील की आम्हाला काही प्रसिध्दीची हौस नाही. तर मग हे वार्ताहर त्यांना उगीचच का भाव देत त्यांच्या मागेपुढे गोंडा घोळत का फिरत रहातात हेच समजत नाही.
त्याऐवजी त्यांनी वारीच्या मार्गावर रस्ते आहेत की खड्डे, त्यात पाणी साठलयं की चिखल झालाय, वाहनांच्या रहदारीमुळे काय त्रास होतोय, उन-पाऊस, थंडी-वारा याचा वारकऱ्यांना काय त्रास होतोय, मुक्कामाच्या ठिकाणी स्वच्छतागृहाअभावी काही गैरसोयी होतात का, वारकऱ्यांना वैद्यकीय सुविधा, रॉकेल, गॅस, पाणी, रस्ता सुरक्षा यासारख्या सुविधा, पुरेश्या प्रमाणात, वेळेवर व व्यवस्थिपणे मिळत आहेत का, याबाबतचे वार्तांकन केल्यास वारकरी त्यांना धन्यवाद तरी देतील.
सर्व समान आहेत हा लहान आणि तो मोठा असा भेदभाव वारकरी सांप्रदाय करत नाही त्यामुळेच जयहरी माऊली म्हणत वयस्करांनीसुध्दा लहानांचे पाय धरलेले दिसतात. वारीसोबत जाणाऱ्या वार्ताहरांनी वारकरी सांप्रदायाच्या या शिकवणीचा जर काही बोध घेतला तर वारकरी लहान आणि नेते महान असा भेदभाव दिसणार नाही.
***

एलबीटी वसुलीसाठी पर्याय


http://nathtel.blogspot.com/
बुधवार दि.15 मे 2013 रोजी रात्री एका खाजगी दूरचित्रवाणी वाहिनीवर झालेल्या चर्चेच्या कार्यक्रमात काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी व्यापारी प्रतिनिधींना जवळपास बोलूच दिले नाही. प्रत्येक वेळी व्यापारी प्रतिनिधी बोलत असताना त्यांचे बोलणे प्रेक्षकांना कळू नये अशा स्वरात आपले म्हणणे जोरजोरात मांडण्याचा त्यांचा सूर होता. याचवेळी हा एलबीटी तुम्ही कुठे तुमच्या खिशातून भरणार आहात तो तर नागरिकांकडून घेऊन तुम्ही भरायचा आहे याचा उल्लेख केला.
हा कर नागरिक भरणार आहेत, तर मग यासाठी शासनाने व्यापाऱ्यांची माध्यम म्हणून निवड करून त्यांना वेठीस धरण्याचे कारण काय? असा प्रश्न त्यांना विचारावासा वाटतो. महानगरपालिका इतर जे काही कर नागरिकांकडून वसूल करते त्याच बिलामध्ये हा एलबीटी कर लावून खुशाल वसूल करावा.
याच संदर्भात मुख्यमंत्र्यांनी काही दिवसापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये, त्यांनी या कराला पर्याय म्हणून व्हॅटच्या दरात वाढ करण्याच्या शक्यतेला नकार दिला होता. काही स्थानिक संस्थासाठी राज्यातील सर्व नागरिकांनी कर का भरायचा? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. मग आता महानगरपालिका हद्दीत असलेल्या व्यापाऱ्यांच्याकडून राज्यातील किरकोळ व्यापारी माल खरेदी करतात तेव्हा राज्यातील इतर सर्व व्यापाऱ्यांनी म्हणजेच नागरिकांनी त्या महानगरपालिकेसाठी हा एलबीटी कर का भरायचा? यावर काय उत्तर आहे. महानगरपालिका हद्दीबाहेर विक्री केलेल्या मालावर एलबीटी भरण्याची सूट दिली जाणार आहे काय?
***

संवेदनाहीन राज्य शासन


http://nathtel.blogspot.com/
कालच सातारा येथे बोलताना मा. शरद पवार यांनी व्यापारी आपले शत्रू नाहीत. मुंबई सारखे होलसेल मार्केट बंद रहाणे राज्याच्या दृष्टीने चांगले नाही. एलबीटीच्या प्रश्नावर तातडीने मार्ग काढावा, असा सल्ला देऊनही राज्य शासनाकडून अद्यापही त्यादृष्टीने काही सकारात्मक पाऊले उचलली गेल्याचे दिसत नाही. शासनाची संवेदना बोथट झाल्याचे तर हे लक्षण नव्हे
व्यापाऱ्यांचा संप, प्राध्यापकांचा संप, डॉक्टरांचा संप, मागील आठवड्यात झालेला हॉटेल रेस्टॉरंटचा संप, आणि आता आज मेडिकल दुकानदारांचा संप. ही संपण्याऐवजी वाढत चाललेली यादी पाहून राज्यातील किती समाज घटक नाराज आहेत हे लक्षात यावे. पण त्यांच्या व्यथा जाणून घेऊन त्यातून मार्ग काढण्याऐवजी शासनाकडून कारवाई करण्याच्या धमक्या मिळतात. ही सामंज्यस्याची आणि सर्वांना घेऊन पुढे जाण्याची भूमिका निश्चितच नाही.
एलबीटीच्या प्रश्नाबाबत सध्या प्रत्येक जणांकडून व्यापाऱ्यांनाच सल्ला दिला जातो, की त्यांनी सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरु नये, व्यापार सुरू ठेवून आंदोलन करावे. इतक्या दिवसांपासून राज्यातील व्यापारपेठा ठिकठिकाणी बंद ठेवून सुध्दा शासनाची त्यांच्याकडे पहाण्याची तयारी नाही. तेव्हा व्यापार सुरू ठेवून व्यापाऱ्यांनी कितीही विरोध दर्शवायचा प्रयत्न केला तर डोळ्यावर कातडे ओढून बसलेले शासन त्यांच्या मागण्याकडे लक्ष तरी देईल का? याचे उत्तर व्यापाऱ्यांना सल्ला देणारांनी द्यावे.
राजकारणी लोक आणि विविध संघटना जेव्हा बंद पुकारतात तेव्हा दुकाने बंद करा म्हणून व्यापाऱ्यांना वेठीस धरतात. बसच्या काचा फोडतात. व्यापारी तोडफोड करत नाहीत किंवा इतरांवर दबाव आणत नाहीत, तर ते स्वतःच्या मालकीची आपापली दुकाने बंद ठेऊन निषेध व्यक्त करतात. त्यांच्या मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांच्या हाती असलेले हे शस्त्रही त्यांनी वापरू अशी अपेक्षा त्यांच्याकडून का करावी?
शेवटी व्यापारीही एक सर्वसामान्य नागरिकच आहे. तो व्यापार करत असलेली वस्तू वगळता इतर सर्व बाबतीत तो ही ग्राहकच आहे. तेव्हा या बंदमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला त्यालाही तोंड द्यावे लागत आहे, आणि सर्वसामान्यांच्या व्यथाही तो भोगत आहे ही बाब नाकारून चालणार नाही. पण ही दुहेरी भूमिका त्याला का वठवावी लागत आहे याकडे बघणे ही तितकेच गरजेचे आहे.
व्यापार ठप्प झाल्याने व्यापाऱ्यांचेच सर्वाधिक आर्थिक नुकसान होत आहे. व्यापारी वृत्तीला नुकसान ही न पटणारी गोष्ट आहे. पण तरीही त्यांच्यावर आज ही वेळ का आली आणि त्यातील आगतिकता काय आहे याचा विचार व्हायला हवा.
पण तसा तो न करता व्यापाऱ्यांनी व्यापार करावा राजकारण करण्याच्या भानगडीत पडू नये असे राज्यकर्ते सुनावतात तेव्हा आश्चर्य वाटते. त्यांच्या वेदना समजून घेण्यापेक्षा आपल्या मालकीच्या राजकारणाच्या क्षेत्रात इतरांचा प्रवेश होऊ नये याकडे यांचे किती लक्ष आहे हे अधोरेखीत होते. तेच लक्ष जर  राज्यातील नाराज समाज घटकांच्या मागण्यांकडे दिले तर, संपकऱ्यांचे प्रश्न चिघळणार नाहीत.
***

कर्नाटकांत ‘भ्रष्टाचारा’ ची खांदेपालट




http://nathtel.blogspot.com/
कर्नाटकांत भ्रष्टाचारा ची खांदेपालट

कर्नाटक मध्ये सत्तापरिवर्तन झाले; भाजप आणि जेडीएस दुसऱ्या स्थानानर गेले आणि येडियुरप्पांचाही फुगा फुटला. कर्नाटकात ते होणे अपेक्षितच होते. भाजप मधील अंतर्गत कलहाच्या दररोज बाहेर येणाऱ्या बातम्या आणि भ्रष्टाचारांच्या नवनविन कहाण्या ऐकून राज्यातील लोक कंटाळले होते.
आता मात्र बरे झाले, दगडापेक्षा वीट मऊ! या न्यायाने तेथील लोकांनी स्विकारलेला नविन पर्याय हा या सगळ्या गोष्टींना एक सक्षम पर्याय आहे. भ्रष्टाचार शिरोमणी म्हणून केंद्रात ख्याती पावलेल्या; सर्वच बाबतीतील समृध्द अनुभव गाठीशी असलेल्या काँग्रेसला लोकांनी पर्याय म्हणून स्विकारले आहे.
त्यामुळे आता भाजपमधील अंतर्गत मतभेद व कलह जसे जाहिरपणे बाहेर येत होते किंवा मिडीयाला हाताशी धरुन आणले जात होते; तसे यापुढे घडताना दिसणार नाही. काँग्रेसमध्ये अश्या गोष्टींना थारा नाही. गॉडमदरच्या हाती एकसूत्री कारभार असल्याने उठ म्हणले की उठायचे आणि बस म्हणले की बसायचे अशा शिस्तीत वाढलेली जेष्ठ मंडळी आता कर्नाटकचा राज्यशकट हाकणार आहेत.
आणि आता रहाता राहिला दुसरा मुद्दा भ्रष्टाचाराचा. या प्रांतातील भाजपचे अननुभवी सुभेदार तो झाकण्यात अपयशी ठरले यावरुन यातील काँग्रेसइतका अनुभव भाजपच्या गाठीशी नव्हता हे स्पष्ट झाले. आता स्वातंत्र्यापासून अपवादात्मक काळ सोडता कायम हाती असलेली केंद्रातील सत्ता, हाती असलेली सीबीआय सारखी तपास यंत्रणा, अवहालातही हवे तसे बदल करण्याची हातोटी अशी सर्व बलस्थाने व अनुभव पाठीशी असलेली काँग्रेस कर्नाटकचा राज्य कारभार पहाणार आहे. त्यामुळे तेथील जनतेला आता सत्तापक्षातील अंतर्गत कलह आणि भ्रष्टाचाराच्या बाहेर येणाऱ्या कहाण्यापासून मुक्ती मिळेल अशी आशा करायला हरकत नाही.

***

एलबीटीच्या राजकारणाचा दुसरा अंक

"http://nathtel.blogspot.com/"
एलबीटीच्या राजकारणाचा दुसरा अंक
एलबीटी विरोधात व्यापाऱ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाला आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही पाठिंबा दिल्यामुळे, व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला एक नविन बळ मिळाले आहे. व्यापाऱ्यांच्या या मागणीला भाजप व शिवसेना यांनी आधीच पाठिंबा जाहिर केलेला आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत एलबीटी मागे घेणार नाही, तर लागू करणारच या शासनाच्या हटवादी व हेकेखोर भूमिकेबाबत मुख्यमंत्री एकटे पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
अर्थातच भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या या व्यापारी प्रेमाला राजकीय किनार आहेच ही गोष्ट लपून राहिलेली नाही. काँग्रेसने सुरूवातीपासूनच व्यापाऱ्यांचा विरोध न जुमानता, एलबीटी लागू करण्याबाबत घेतलेल्या ताठर भूमिकेमुळे व्यापारी वर्ग काँग्रेसवर प्रचंड नाराज आहे आणि तो व्यापारी वर्ग येत्या विधानसभेच्या निवडणूकीत काँग्रेस पक्षाला कदापिही मतदान करणार नाही. ही गोष्ट काँग्रेसेतर पक्षांनी नेमकी हेरली आहे. त्यामुळे पाठिंबा जाहिर करत असतांना एकीकडे राज्यातील लाखो व्यापाऱ्यांच्या एकगठ्ठा मतांवर डोळा ठेवायचा, तर दुसरीकडे वरकरणी व्यापाऱ्यांना सहानुभूती दाखवत आम्ही या प्रश्नावर तुमच्या पाठीशी खंबिरपणे उभे आहोत असे चित्र निर्माण करून मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणायचे, असा एलबीटीच्या राजकारणाचा दुसरा अंक आता रंगत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसला व्यापाऱ्यांच्या या मागणीविषयी कळवळा असता तर त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीतच एलबीटी लागू करण्याच्या मुद्द्यावरून कडाडून विरोध केला असता. आणि तसे घडले असते तर, व्यापाऱ्यांचा व बेमुदत बंदमुळे सर्वसामान्य नागरिकांचा अंत पाहिला जात असल्याचे चित्र आज दिसले नसते. पण तसे घडलेले नाही, व्यापाऱ्यांची ही व्होट बँक इतर पक्षांच्या हाती जाऊ नये, आणि मुख्यमंत्र्यांना या मुद्द्यावरुन अडचणीत आणायची आयती मिळालेली संधी हातची जाऊ नये या दुहेरी उद्देशानेच राष्ट्रवादीने ही खेळी खेळली आहे. ही खेळी मोठ्या साहेबांच्या सांगण्यावरून खेळली गेली असू शकते.
एलबीटीच्या मुद्द्यावर सर्व विरोधी पक्ष एकवटले आहेत, आणि आता तर सत्तेत सहभागी असलेला मित्र पक्षही या मुद्द्यावर साथ देत नाही अश्या अडचणीच्या परिस्थितीमध्ये आता मुख्यमंत्री सापडले आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांचाही अधिक अंत पाहिला जाऊ नये, आणि सर्वसामान्य नागरिकांचेही हाल होऊ नये असे जर मुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर, त्यांनी आता हा प्रश्न प्रतिष्ठेचा न करता व तुटेपर्यंत न ताणता एलबीटी मागे घ्यावा अशीच सर्वसामान्यांचीही भावना आहे.
पुढच्या वर्षीच जीएसटी म्हणजेच गुडस् अँड सर्व्हिस टॅक्स येत आहे, आणि त्यामुळे लागू असलेले इतर सर्व करसुध्दा संपुष्टात येणार आहेत मग एक वर्षापेक्षाही कमी कालावधीसाठी हा एलबीटी टॅक्स लागू करण्याचा राज्य शासनाचा एवढा अट्टाहास का? व्यापाऱ्यांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नासाठी मुख्यमंत्र्यांच्याकडे काही उत्तर आहे का?

ऑनलाईन पैसे कमवा



<A title="ऑनलाईन पैसे कमवा-आगळं! वेगळं!!!" href="http://nathtel.blogspot.com/">
प्रत्येकाला इंटरनेटवर वेळ घालविताना त्याच्या जोडीला ऑनलाईन पैसे कमविण्याची इच्छा असते. त्यासाठी अनेक मार्गही आहेत. पैसा लाईव्ह हा एक त्यापैकी आहे. आपणांपैकी पुष्कळ लोकांकडे पैसा लाईव्हचे अकाउंट असेलसुध्दा. काही लोकांची अशीही समजूत असू शकेल की, पैसा लाईव्ह ही फ्रॉड साईट आहे. पण त्या साईटवरील मेल वाचून आजपर्यंत बऱ्याच लोकांनी भरपूर पैसे कमविले आहेत. त्याची खात्री कंपनीच्या वेबसाईटवर कंपनीने नाव व तारखेसह लाभार्थी खातेधारकांना दिलेले चेक आणि कुरियर कंपनीच्या रिसीटच्या स्कॅन्ड कॉपीजचे पुरावे पाहून खात्री करुन घेता येईल.
<A title="ऑनलाईन पैसे कमवा-आगळं! वेगळं!!!" href="http://nathtel.blogspot.com/">

>> पैसा लाईव्हचे अकाउंट कसे काढायचे?

तुम्हालासुध्दा पैसा लाईव्हच्या माध्यमातून पैसे कमवायचे असतील तर, त्यासाठी सर्वप्रथम तुमचे पैसा लाईव्हवर अकाउंट असणे आवश्यक आहे. जर तुम्ही अजून अकाउंट काढले नसेल तर  येथे क्लिक करुन अकाउंट काढता येईल. तुमचे अकाउंट काढल्यावर तुमच्या खात्यावर लगेच रु.99/- जमा होतील. त्याचबरोबर तुम्ही जर तुमची आयडी लिंक मित्रामध्ये शेअर केली व त्यावरुन जर आणखीन अकाउंट सुरु झाले, तर त्या प्रत्येक अकाउंटसाठी रु.2/- प्रमाणे तुमच्या खात्यावर पैसे जमा होतील. म्हणजेच अकाउंट उघडल्यापासूनच पैसे तुमच्या खात्यात जमा होत रहाण्यास सुरुवात होईल.

>>  पैसा लाईव्हवर प्रत्यक्ष काय काम करावे लागते?

तुम्ही दररोज तुमच्या अकाउंटमध्ये लॉगीन होऊन इनबॉक्स मधील मेल चेक करुन वाचावे/पहावे लागतात. हे मेल वाचल्यावर प्रत्येक मेलमागे पंचेवीस पैश्यापासून ते पांच रुपयांपर्यंतची रक्कम तुमच्या खात्यात जमा होते. केवळ तुम्ही अकाउंटमध्ये लॉगीन झालात तरीदेखील दहा पैसे इंसेन्टीव्ह तुमच्या खात्यावर जमा होतो. हा इन्सेटीव्ह 24 तासांतून एकदाच मिळतो. पाचशे रुपयांपेक्षा अधिक रक्कम तुमच्या खात्यावर जमा झाल्यानंतर तुम्ही ती मिळण्यासाठी विनंती करु शकता, आणि व्हॅलीडेशन नंतर ती मान्य झाल्यानंतर पुढील महिन्याच्या 15 तारखेनंतर तुम्हाला रकमेचा चेक कुरिअरने अथवा रजि. पोस्टाने घरपोहोच मिळतो. किमान सात-आठशे रुपयांचा बॅलन्स खात्यावर जमा झाल्यावर रक्कम मिळण्यासाठी विनंती करावी.

>> दहा सेकंदांची ट्रीक


पण रोज प्रत्येक मेलवर क्लिक करुन वाचणे म्हणजे कंटाळवाणे आणि वेळखाऊ काम आहे. पण आता हेच काम मेल न वाचता आपोआप सुध्दा करता येईल. अनेक मेल चेक करण्याचे कंटाळवाणे आणि निरस काम फक्त दहा सेकंदात आपोआप चेक करुन तुमच्या खात्यात त्याची रक्कम झटपट जमा होण्यासाठी खाली सांगितलेल्या पध्दतीप्रमाणे प्रत्येक पायरीचा काळजीपूर्वक अवलंब करा.
तुम्ही जर गुगल क्रोम ब्राऊजर वापरत असताल तर टूल डाऊनलोड करु घेण्यासाठी येथे क्लिक करा.

तुम्ही जर फायरफॉक्स ब्राऊजर वापरत असाल तर, येथे क्लिककरुन टूल डाऊनलोड करावे लागेल.

हे टूल तुमच्या ब्राऊजरमध्ये अड झाल्यावर तुमचा ब्राऊजर रिस्टार्ट करा.

ब्राऊजरच्या ऊजव्या कोपऱ्यात एक आयकॉन दिसू लागेल.

<A title="ऑनलाईन पैसे कमवा-आगळं! वेगळं!!!" href="http://nathtel.blogspot.com/">

आता तुम्हाला इथे क्लिक करुन आणखीन एक फाईल डाऊनलोड करुन इन्स्टॉल करावी लागेल.

यानंतर तुमच्या अकाउंटमध्ये लॉगीन व्हा. इनबॉक्समध्ये जा. तेथे दिसत असलेले अनेक मेल वाचून तुम्हाला पैसे मिळणार आहेत, पण आता मात्र हे मेल वाचण्याची गरज नाही. इनबॉक्स उघडल्याबरोबर ब्राऊजरच्या उजव्या कोपऱ्यात एक बॉक्स दिसेल.

<A title="ऑनलाईन पैसे कमवा-आगळं! वेगळं!!!" href="http://nathtel.blogspot.com/">

त्यावरील Click Here To Start Checking Mail या संदेशावर क्लिक करा. आता दहा सेकंद थांबून F5 बटन दाबून वेबपेज रिलोड करा. वाचून झालेले मेल डिलीट झालेले असतील. व जर पुन्हा नविन ईमेल इनबॉक्समध्ये दिसत असतील तर पुन्हा Here To Start Checking Mail या संदेशावर क्लिक करा. अश्याप्रकारे सर्व अनरीड मेल वाचले जाऊन डिलीट होतील आणि त्याचे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील. ते तुम्ही My Earning वर क्लिक करुन बघू शकता. 
महत्वाची सूचना :

या ब्लॉगवरील माहितीचा उपयोग स्वतःचे जबाबदारीवर करावा. कोणत्याही साईटबद्दल कोणतीही खात्री देता येत नाही. कोणत्याही प्रकारची जबाबदारी आगळं! वेगळं!!! वर रहाणार नाही याची नोंद घ्यावी.

आत्मक्लेश



बी बोल्ड; ईट गोल्ड’!


<A title="आत्मक्लेश-आगळं! वेगळं!!!" href="http://nathtel.blogspot.com/"><img src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg4ZRaiJSmxPRiOD9NEeWwc71pjIs3AqE71SxXwGQogDpUzZTJYrzoV2m9tJjo5WwuFLEiaEitW256iLFMyEZCv0Hhc1VTppIf3iSBrvE7L1KSmoR1sSdj3Xaa0aqZsmIu-yapKFiBrsa4E/s1600/Gold+buskits.jpg" alt="आगळं! वेगळं!!!"></a>



>> सोने गडगडले, पेट्रोलही एक रुपयाने स्वस्त; आली स्वस्ताई!
  • बी बोल्ड; ईट गोल्ड’!


>> आणखी वेळ द्या; संजय दत्तची सुप्रिम कोर्टात याचिका
  • सरेंडर के लिए भी 'तारीख पे तारीख'?


>> धर्मनिरपेक्षतेचे प्रमाणपत्र नको; भाजपने जद(यू) ला सुनावले, नव्या वादाला फुटले तोंड
  • या वादात जनतेने आपलं तोंड फोडू नये म्हणजे झालं!


>> ना राजीनामा, ना दिलगिरी अजित पवार सभागृहात परतले
  • हा तो 'आत्मक्लेश' जाणावा!


गुगल रीडरसाठी पर्याय



गुगल रीडरसाठी पर्याय

गुगलने आपली गुगल रीडर ही सेवा १ जुलै २०१३ पासून बंद करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे गुगल रीडर वापरणारांना आता रीडरसाठी दुसरा पर्याय शोधावा लागणार आहे. रीडरसाठी इंटरनेटवर अनेक पर्याय उपलब्ध आहेत, त्यांपैकी काहींच्या लिंक्स खाली दिल्या आहेत.



जेव्हा तुम्ही नविन रीडर निवडताल, तेव्हा त्यामध्ये तुमच्या पूर्वीच्या फीडस् चा डाटा इंपोर्ट करण्यासाठी, गुगल टेकआऊटची मदत घ्यावी लागेल. गुगल टेकआऊटद्वारे बॅकअप कसा घ्यावा याची माहिती आपण येथे वाचू शकता.

यापैकी मी माझी पसंती The Old Reader ला देतो. एक तर The Old Reader चा लूक जवळपास गुगल रीडरसारखाच आहे. आणि दुसरे म्हणजे तो वापरायला अत्यंत सोपा असा आहे. मी The Old Reader ची निवड केली आणि गुगल रीडरमधील माझा डाटा इंपोर्ट करण्याची रिक्वेस्ट दिली तेव्हा, माझ्या आधी याचसाठी आणखीन ९५४१ लोक आधीच रांगेत प्रतिक्षेत होते.



आठ दिवसांनी माझ्या फीडचा डाटा इंपोर्ट झाला. तोपर्यंत मी फीडपैकी काही लिंक +Add A Subcription वर मॅन्युअली फीड करुन माझे काम सुरु ठेवले. सांगायचे तात्पर्य हे की, झटपटच्या जमान्यात काही चांगल्या गोष्टी मिळण्यासाठी वेळप्रसंगी प्रतिक्षा देखील करावी लागते.

ऑनलाईन जाहिरातींची वाढती लोकप्रियता



ऑनलाईन जाहिरातींची वाढती लोकप्रियता


ऑनलाईन जाहिरातींची बाजारपेठ मार्च पर्यंत २ हजार ९३८ कोटी रुपयांवर जाण्याचा अंदाज इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडिया आणि आयएमआरबी इंटरनॅशनल यांनी संयुक्तपणे प्रसिध्द केलेल्या एका अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.
ऑनलाईन जाहिरातीमध्ये डिस्प्ले, मोबाईल, सोशल मिडीया, ई-मेल आणि व्हिडीओ जाहिरातींचा समावेश असून ही बाजारपेठ वार्षिक २० टक्के वाढीची नोंद करीत यंदाच्या मार्चमध्ये २ हजार ६५० कोटी रुपयांवर गेली आहे; परंतु अन्य सर्व इलेक्ट्रॉनिक गॅजेटस, सोशल मिडीया तसेच अन्य गोष्टींचा वाढता वापर लक्षात घेता ही बाजारपेठ पुढील वर्षाच्या मार्च महिन्यात २,९३८ कोटी रुपयांवर जाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या आर्थिक वर्षात ही बाजारपेठ १,७५० कोटी रुपयांची होती.
>> वार्षिक २० टक्के वाढीची नोंद >> मार्चमध्ये गाठली २२६० कोटी रुपयांची पातळी
>> मोबाईलवरील जाहिरातीत दुप्पट वाढ

सहज इंटरनेटची उपलब्धता, वेगवेगळ्या गरजांमुळे मोबाइलचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे मोबाईल जाहिरातींवरील खर्च त्यानुसार वाढला आहे. २०११-१२ या वर्षातील११५ कोटी रुपयांच्या खर्चात दुपटीने वाढ होऊन तो नुकताच संपलेल्या आर्थिक वर्षात २३० कोटी रुपयांवर गेला आहे. मोबाइल फोन्स आणि टॅब्लेटवरील जाहिरात खर्चाचे प्रमाण ७ टक्क्यांवरुन (२०११-१२) १० टक्क्यांवर (२०१२-१३) झाले.
येत्या चार वर्षाच्या कालावधीत ऑनलाईन जाहिरातींची बाजारपेठ सरासरी ४० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. गेल्या आर्थिक वर्षात ऑनलाईन जाहिरातीमध्ये सर्च आणि डिस्प्ले जाहिरातींचा वाटा सर्वाधिक होता; परंतु २०१२-१३ आर्थिक वर्षात हा वाटा मोबाईल, सोशल आणि व्हिडिओ जाहिरातींच्या चढत्या आलेखाप्रमाणे घटला असल्याचे दिसून आले आहे.
संदर्भ : दै. दिव्यमराठी
या बातमीवरुन ऑनलाईन जाहिरातींची वाढती लोकप्रियता व वेगाने विस्तारीत होत जाणाऱ्या ऑनलाईन जाहिरात क्षेत्राची कल्पना यावी. या प्रगतीमध्ये ऑनलाईन जाहिराती प्रदर्शित करणाऱ्या ब्लॉग्सचा सहभाग विशेष लक्षणीय व उल्लेखनीय   आहे.


HTML CODE चे टेस्टिंग कसे करावे?



अनेक वेळा असा प्रसंग येतो की, आपल्या ब्लॉगवर एखादे नविन विजेट जोडताना, त्यामध्ये काही किरकोळ बदल करावे लागतात. उदा. आपल्या ब्लॉगचे नांव, आपल्या ब्लॉगची लिंक किंवा आपल्या Twitter, Facebook, Google+ इ. सोशल साईटच्या लिंक्स आणि आपल्या ब्लॉगचे RSS Feed लिंक, किंवा इतर काही मजकूर इत्यादी इत्यादी.
मग मूळ विजेटच्या HTML कोडमध्ये आपण केलेले बदल हे बरोबर झालेले आहेत की नाहीत? याची खात्री ते विजेट आपल्या ब्लॉगवर जोडण्याआधी आपण करुन घेणे आवश्यक ठरते. त्यासाठी एका सोप्या पध्दतीची माहिती आज आपण येथे करुन घेणार आहोत.

HTML कोड टेस्ट करण्यासाठी या साईटवर जा. तेथील बॉक्समध्ये तुम्ही बदल केलेला HTML विजेट कोड कॉपी करुन पेस्ट करा आणि Test The HTML Code या बटणावर क्लिक करा. त्यानंतर एका नविन उघडलेल्या विंडोमध्ये तुमच्या कोडचा टेस्ट रिझल्ट म्हणजे ते विजेट कसे दिसणार त्याचा प्रिव्ह्यू प्रदर्शित होईल. आता यातील तुम्ही बदल केलेल्या लिंक्सवर माऊसचा कर्सर नेऊन किंवा क्लिक करुन कोडमध्ये तुम्ही केलेले बदल अचूक आहेत याची तुम्ही खात्री करुन घेऊ शकता. Clear Text Box या बटणावर क्लिक करुन तुमचा सध्याचा कोड क्लिअर करुन पुन्हा दुसरा कोड त्या बॉक्समध्ये कॉपी पेस्ट करु शकता.
आणि मग हे अचूक बदल केलेले विजेट तुमच्या ब्लॉगवर लावण्यात आता तुम्हाला काहीच अडचण येणार नाही.

शिवीगाळ, मारहाण करण्याचा पोलीसांना परवाना?



एका पोलीस कर्मचाऱ्याला विधानभवनांत मारहाण झाली काय अन् या घटनेचा निषेध आणि संताप व्यक्त करण्यासाठी समाजाच्या सर्वच थरांतून आणि प्रसिध्दी माध्यमांतून चढाओढ सुरु झाली. यांत आपण मागे राहिलो तर, आपण या मारहाणीचे समर्थक आहोत असा संदेश जाईल अशी भितीच जणू काही सगळ्यांना वाटू लागली की काय अशी शंका यायला लागली.
पण सर्वसामान्य माणूस रोजच अशा प्रसंगातून जात असतो. त्याचे दुःख वेशीवर टांगण्यासाठी ही धडपड होताना दिसत नाही. उँचे लोग उँची बाते दुसरं काय?
या प्रकरणांत एकूण त्या पोलीसाला अथवा त्याच्या सहकाऱ्याला शिवी दिली असे त्याचे म्हणणे असल्याचे दिसते. आणि त्याच गोष्टीचा राग येऊन पुढचे सगळे रामायण घडले असे एकंदरित प्रथमदर्शनी वाटते. यावरुन या ऐरणीवर मला सर्वसामान्य माणसाचा मुद्दा आणायचा आहे. यांत आमदारांचा मुद्दा नाही किंवा त्यांच्या कृतीचे समर्थन नाही.
पोलीसाला शिवी दिली किंवा त्याच्यावर हात उचलला तर तो फार मोठा गुन्हा, पण पोलीसांनी सर्वसामान्य नागरिकाला शिवी दिली, मारहाण केली तर तो मात्र गुन्हा नाही हे कसे? ज्या मध्यमवर्गीय पापभिरु सर्वसामान्य माणसांना असा अनुभव आला असेल त्यांना विचारा, की त्यांच्या मनावर याचे काय परिणाम होतात. हे आठवून त्यांची रात्री झोप उडते. मनांवर सतत दडपण येते. मानसिक दृष्ट्या खच्चीकरण होते.
हे पोलीस कसले? हे तर खाकी वर्दीतले संघटीत अधिकृत गुंडच. कधी कधी हे इतके पिसाळतात की, मारहाण करताना यांच्यतला राक्षस जागा होतो तेव्हा त्या मार खाणाऱ्या व्यक्तीचा प्रसंगी जीवही जातो. अशी कित्येक उदाहरणे कित्येक पोलीस स्टेशनमध्ये घडलेली आहेत. आणि पुन्हा त्या व्यक्तिच्या कुटुंबातील लोकांवर दबाव आणून हे लोक सहिसलामत सुटतात हेही तितकेच भीषण सत्य आहे.
तेव्हा या गुंडांना सर्वसामान्य माणसांशी कसे वागायचे? अठरा वर्षाखालील मुलांशी कोणत्या पध्दतीने बोलायचे यांना कोण शिकवणार? कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये जा आणि पहा काय चित्र दिसते ते. सर्वसामान्य घाबरणाऱ्या व्यक्तिंना काही कारणास्तव चौकशीसाठी बोलावले असेल तर, कशा प्रकारे शिवीगाळ केली जाते, कसा हात उगारला जातो. यांचे तोंड उघडले तरी गटार वहात असल्याचा भास होतो. पण हप्ते देणाऱ्या अवैध धंदेवाल्यांशी मात्र हसून इज्जत देऊन बोलतात.
कायद्याच्या गोष्टी काय करता? कायद्याने पोलीसांना लोकांना मारहाण करण्याचा आणि शिवीगाळ करण्याचा परवाना दिला आहे काय? तसे असेल तर मग न्यायसंस्थेची गरजच काय? हे स्पष्ट होण्याची गरज आहे, याची कुठेही चर्चा होताना दिसत नाही. स्वतःला शिवी दिली तर मिरची लागते, मग सर्वसामान्य लोकांच्या आई-बहिण रस्त्यावर पडल्या आहेत काय? आणि शिवीगाळ केली मारहाण केली या कारणांवरुन पोलीसांवर जर गुन्हे दाखल व्हायला लागले तर, राज्यातील सर्वच पोलीस स्टेशनमध्ये किती कर्मचारी कामावर दिसतील आणि किती जेलमध्ये बसलेले दिसतील याची कल्पना करा.
सर्वसामान्य माणूस शिवीगाळ ऐकून किंवा गालावर मारलेली चापट खाऊन आतून संतापाने खदखदत असला तरी काय करेल बिचारा? तो तर त्या आमदारांप्रमाणे पोलीसांना मारत नाही. तक्रार करायची तर त्याच्याकडे हेलपाटे मारायला वेळ नाही, कोर्टकचेरी वकील फी यांसाठी तो पैसा खर्च करु शकत नाही. आणि यातून जरी त्याने असे करायचे ठरवले तरी तो शिवीगाळ झाली मारहाण झाली ही गोष्ट कोर्टात सिध्द करु शकेल असे वाटत नाही कारण पोलीस स्टेशनच्या आत घडलेल्या या घटनेला साक्षीदार कोण? तर हे पोलीसच, मग ते आपल्याच सहकाऱ्यांविरुध्द साक्ष देतील काय?
म्हणजे सर्वसामान्य नागरिक इथे रोजच पोलीसांच्या शिव्या खातो, मारहाण सहन करतो. पण याची चर्चा प्रसिध्दी माध्यमांना करावीशी वाटत नाही. सर्वसामान्य माणसांच्या मागे आर्थिक, राजकीय पाठबळ नसल्याने त्याला हा अन्याय वर्षानुवर्षे सहन करावा लागत आहे. मोठ्य़ा पदांवर असणाऱ्यांची चर्चा मात्र स्पर्धा लागल्याप्रमाणे सुरु रहाते. हा विरोधाभास आहे.
अर्थातच प्रत्येक गोष्टींना दोन बाजू असतात, उडदामाजी काळेगोरे असतात. त्याप्रमाणे पोलीसातही काही अपवादात्मक चांगले लोक आहेत. त्यामुळे त्यांनी वाईट वाटून घेण्याचे काहीच कारण नाही. चर्चा होण्याची गरज आहे ती, मस्तवाल पोलीसांची मस्ती कशी उतरेल याची, आणि सर्वसामान्य माणसाला जर काही प्रसंगाने पोलीस स्टेशनमध्ये जावे लागले तर त्याला दिलासा कसा मिळेल याची.

ब्लॉगचा बॅकअप : एक नविन पर्याय



ब्लॉगचा बॅकअप : एक नविन पर्याय


ब्लॉगरमध्ये ब्लॉगचा बॅकअप घेण्यासाठी Settings > Other > Export Blog असा एकमेव पर्याय सध्या उपलब्ध आहे. परंतु त्याद्वारे एकावेळेस केवळ एकच ब्लॉगचा बॅकअप आपण घेऊ शकतो. पण गुगलच्या फारश्या प्रसिध्द नसलेल्या Google Takeout या सुविधेद्वारे ब्लॉगचा बॅकअप घेण्याचा दुसरा एक पर्याय आता उपलब्ध झाला आहे.

गुगलच्या विविध सेवांचा उपयोग सर्वजण करतात. गुगलने विशेष प्रसिध्दी न करता, त्यांच्या उपयोगकर्त्यांना खात्याचा बॅकअप घेण्यासाठी Google Takeout या नावाने एक नविन सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

याद्वारे सुविघेद्वारे Google+1s, Blogger, Buzz, Contacts, Drive, Google+ Circles, Google+ Stream, Pages, Picasa Web Albums, Profile, Reader, You Tube इतक्या सेवांचा आपल्या निवडीनुसार डाटा डाऊनलोड करुन घेता येतो.


या सुविधेद्वारे एकापेक्षा अधिक ब्लॉग्जचा बॅकअप सुध्दा एकाच वेळेस घेता येण्याची सोय आहे. आणि तेही आकाराने लहान अशा Zip स्वरुपातील फाईलमध्ये.

Google Takeout चा उपयोग कसा करावा






त्यासाठी प्रथम आपण या लिंकवर क्लिक करा. त्या विंडोमधील Choose Services बटन क्लिक करा. नंतर समोर येणाऱ्या विंडोमध्ये विविध सेवांचे बटन्स दिसतील. त्यापैकी Blogger बटनावर क्लिक करा. नंतर एक बॉक्स समोर येईल, त्यामध्ये एकूण तुमच्या सर्व ब्लॉगच्या Estimated files Size दिसेल. तुम्हाला जर सर्वच ब्लॉग्लचा बॅकअप नको असेल तर, तेथेच दिसणाऱ्या Configure पर्यायावर क्लिक करा. तेथे Download a single blog पर्याय निवडून तुम्हाला पाहिजे तो ब्लॉग निवडा. त्यानंतर खाली दिसत असलेल्या Create Archive वर क्लिक करा. आणि डाऊनलोडसाठी तयार असलेली फाईल डाऊनलोड करुन घ्या. Zip स्वरुपात प्राप्त झालेल्या फोल्डरमध्ये Atom स्वरुपातील फाईल असेल.

याप्रकारे ब्लॉगचा डाटा तुमच्याजवळ सुरक्षित राहील, व प्रसंगानुसार या डाटामधून तुमच्या ब्लॉगमधील लेख Settings > Other > Import Blog पर्यायाने पुन्हा परत मिळविता येतील.

वास्तूशास्त्राचे पुस्तक डाऊनलोड करा मोफत


वास्तूशास्त्राचे पुस्तक डाऊनलोड करा मोफत


वास्तूशास्त्राविषयीचे आकर्षण कुणाला नसते? तर सर्वांनाच असते. आणि त्याविषयी जमेल तशी आणि शक्य असेल तशी माहिती मिळविण्याकडे आणि वाचण्याकडे सर्वांचाच कल असतो. पण हीच भरपूर माहिती एखाद्या पुस्तकरुपाने आपल्या हाती पडल्यास आणि त्यातूनही ई-बुकच्या स्वरुपात चक्क मोफत मिळाल्यास दुधात साखरच म्हणावी लागेल.

तर आज आपण एका अशाच संकेतस्थळाबाबत माहिती घेणार आहोत. या संकेतस्थळांवर आपणांस वास्तूशास्त्राविषयीची माहिती मोफत मिळेल. वास्तूशास्त्र तत्व, तसेच एका बाजूने, दोन्ही बाजूने व तीन्ही बाजूने रस्ता असलेल्या उदाहरणांची अशी तीन चार प्रकारची वास्तूशास्त्राबद्दलची भरपूर  आकृत्या समाविष्ट असलेली ई-पुस्तके पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करुन घेता येतील. तसेच याच संकेतस्थळावर धार्मिक संगिताचा मोठा संग्रह ही डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. आपल्या आवडीनुसार आपण धार्मिक संगीतही येथून डाऊनलोड करुन घेऊ शकाल. या संकेतस्थळावर ही सुविधा इंग्रजी व हिंदी या दोन्ही भाषेत उपलब्ध आहे.

या संकेतस्थळाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.