शिवीगाळ, मारहाण करण्याचा पोलीसांना परवाना?

एका पोलीस कर्मचाऱ्याला विधानभवनांत मारहाण झाली काय अन्
या घटनेचा निषेध आणि संताप व्यक्त करण्यासाठी समाजाच्या सर्वच थरांतून आणि
प्रसिध्दी माध्यमांतून चढाओढ सुरु झाली. यांत आपण मागे राहिलो तर, आपण या
मारहाणीचे समर्थक आहोत असा संदेश जाईल अशी भितीच जणू काही सगळ्यांना वाटू लागली...