आगळं! वेगळं !!!
Showing posts with label कस्टमर केअर उर्फ ग्राहक छळवाद केंद्र. Show all posts
Showing posts with label कस्टमर केअर उर्फ ग्राहक छळवाद केंद्र. Show all posts

कस्टमर केअर उर्फ ग्राहक छळवाद केंद्र

हल्ली मोबाईल कंपन्याकडून ग्राहकांच्या बॅलन्सची नकळतपणे कत्तल सुरु आहे. जे ग्राहक आपल्या बॅलन्सबाबत बेफिकीर असतात, त्यांना हे लक्षात येत नाही. मात्र जे ग्राहक सतत आपल्या बॅलन्सकडे लक्ष ठेवून असतात त्यांच्या निदर्शनास ही बाब लगेच येते. आपल्या मोबाईलवर जे प्रमोशनल कॉल्स आणि एसएमएस येत असतात, प्रमुखाने त्यांचेच हे प्रताप असू शकतात.