धोनीकडून लाखो भारतीय क्रिकेटप्रेमींचा अपमान
कालच दोन बातम्या वाचण्यात आल्या. एक बातमी वाचण्यात आली त्यात धोनी म्हणतोय की "सचिनला वर्ल्डकप गिफ्ट करायचाय" विजेतेपदाचा चषक भेट करुन सचिनची शेवटची विश्वचषक स्पर्धा साजरी करु असं वक्तव्य त्याने केलंय. आणि त्याचसोबत दुसरी एक बातमी वाचली, "वर्ल्डकप सचिनपुरताच नाही" असं कपिलदेवचं मत आहे. पुढे कपिलदेव म्हणतो की, सचिन महान खेळाडू असून त्याने भारतीय क्रिकेटची अनमोल सेवा केली आहे, पण स्पर्धेत सचिन एकटाच खेळत नाही, संघापेक्षा तो नक्कीच मोठा नाही. कपिलदेवच्या ह्या स्पष्टवक्तेपणाला सर्वानीच 'दाद' आणि सादही द्यायला हवी.