आगळं! वेगळं !!!
Showing posts with label पॉलीटिका. Show all posts
Showing posts with label पॉलीटिका. Show all posts

आमचीच नाती अन् आमचीच माती



आमचीच नाती अन् आमचीच माती
एकाच्या कपाळी दगड तर
दुसऱ्याच्या डोक्यात बाटली
कशाला चर्चा, दोष कोणाचा किती
आमचीच नाती अन् आमचीच माती

लोकसभेची रणभूमी



लोकसभेची रणभूमी
आमनेसामने उभ्या ठाकलेल्या सेना
एकमेकांना ललकारायला लागल्या
शत्रूवर आक्रमण करण्याऐवजी
आपसांतच लढायला लागल्या

रागरंग



रागरंग
पेपरबाण मारुनी मागता काय
टाळी अन पुसता काय औकात
आता होईल सगळी इच्छा पुरी
जाहिर सभेत अन भर चौकात

झेंडा



झेंडा
भ्रष्टाचाराच्या विरोधात लाल झेंडा
जाहिर सभेत फडकवायचा असतो
नांदेड एक्सप्रेसला हिरवा दाखविताना
मात्र तो गुंडाळून ठेवायचा असतो

शाईनिंग



शाईनिंग
वर्तमानपत्राच्या कागदावर
राजकीय नेत्यांच्या तोंडावर
सर्वसामान्य मतदारांच्या बोटावर
सगळीकडे ‘शाई’चीच इनिंग सुरु आहे
जरी असेल रंग काळा तरी
शेवटी तिच ‘शाई’निंग करत आहे

कॅन्डीडसी पोर्टेबिलीटी





कॅन्डीडसी पोर्टेबिलीटी
‘कॅन्डीडसी पोर्टेबिलीटी’कडे
इच्छुक आता वळत आहेत कारण
पक्ष बदलला तरी उमेदवारी कायम
ही ‘मस्त सुविधा’ त्यात मिळत आहे

पक्षांतराचा ज्वर



पक्षांतराचा ज्वर
नाराजीची लागण झाल्याने सर्वत्र
पक्षांतराचा ज्वर चढायला लागला
बंडखोरीची साथ येण्याच्या भितीने
नेत्यांचा घोर वाढायला लागला

‘नमो’ थाळी



‘नमो’ थाळी
‘एके’ पाठोपाठ ‘नमो’ थाळी
आता लाखोंत मिळायला लागली
पंचतारांकित भोजनांमुळे पक्षांची भूक
भागण्याऐवजी वाढायला लागली

तिकीटाचे पॅकेज



तिकीटाचे पॅकेज
निवडणूकीच्या तोंडावर नेतेमंडळी
नाराजांना निमंत्रणे धाडायला लागली
प्रवेशासोबतच तिकीटाची पॅकेजेस
निष्ठावंतांनाही भुरळ पाडायला लागली

आमची 'खास' थाळी



आमची 'खास' थाळी
पार्टी फंड गोळा करण्याचा
'आम' भोजनालयाचा नवा फंडा
दहा हजाराची 'एके' थाळी बघून
'आम' आदमी मात्र पुरता थंडा

‘हात’ बल



‘हात’ बल
उमेदवार शोधून शोधून
घड्याळ झाले हतबल
‘हात’कणंगलेत वाढले अखेर
काँग्रेसचेच ‘हात’बल