आगळं! वेगळं !!!
Showing posts with label tawala aawade vinod. Show all posts
Showing posts with label tawala aawade vinod. Show all posts

निजानंद

पेशंट : डॉक्टर मी आपला फार आभारी आहे.
डॉक्टर : (आश्चर्याने) पण मी तर आपणास आजच पाहतोय, त्यामुळे मी तुम्हाला काही ट्रीटमेंट दिली आहे असे मला तरी आठवत नाही. मग माझे आभार कशासाठी?

प्रामाणिक दुधवाला भैय्या

मागील पाच-सहा दिवसापासून दुध पातळ येत असल्यामुळे मालतीबाई चिडलेल्या होत्या. पण रोज भैय्याला त्याबद्दल बोलायला सांगूनही पंत आणि मुले ही गोष्ट काही मनावर घेत नव्हते, त्यामुळे भैय्याला कुणीच काही सुनावत नसल्याने आज मालतीबाईंनी स्वतःच भैय्याला फैलावर घ्यायचे ठरविले होते.

'श्रीमंतीची गुरुकिल्ली'

व्यक्ती : नमस्कार सर, आपल्या संस्थेमार्फत माझा अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम 'श्रीमंतीची गुरुकिल्ली' अर्थात 'श्रीमंत व्हा' हा आयोजित करावा अशी आपणांस विनंती आहे.
संस्थाचालक : अस्सं! बरं आता मला असं सांगा की, तुमच्या या कार्यक्रमामुळे कुणाला फायदा झाला आहे का? आणि खरोखरीच कुणी श्रीमंत झाले आहे का?
व्यक्ती : (विनम्रपणे) या दोन्ही प्रश्नांचे उत्तर माझ्यारुपाने आपणासमोर उभे आहे सर!

रंग गेला तर पैसे परत

ग्राहक : या ड्रेसची किंमत किती आहे?
दुकानदार : दीडशे रुपये फक्त ताई.
ग्राहक : पण याच्या रंगाची गॅरंटी आहे का? याचा रंग जाणार का?

नविन मंत्र्यांच्या खास प्रतिक्रिया

नविन मंत्रिमंडळाचं खातेवाटप झालं आणि काही मंत्र्यांच्या खाजगी प्रतिक्रिया आम्हाला मिळाल्या त्या अशा :

अजितदादा पवार : "आमच्या सर्व मंत्र्यांना 'उर्जा' देणं हे मी माझं कर्तव्य मानतो. माझ्या म्हणण्याचा 'अर्थ' तुम्हाला कळला असेलच."

बावळटच आहेस

मॅडम : तुमच्या पसंतीसाठी जर एकीकडे डोकं ठेवलं  आणि दुसरीकडे  पैसा तर तुम्ही काय पसंत कराल?

लै महाग हाय

ग्रामीण भागातील ग्राहकांची, विशेषतः महिलांची खरेदीबाबतची मानसिकता कशी असते ते स्पष्ट करणारा हा एक प्रत्यक्ष घडलेला खराखुरा किस्सा. भावात घासघीस करण्यासाठी बोलण्याची त्यांची पद्धत, भाव कमी करून घेण्यासाठी आपण किती चतुरपणे बोलून ती वस्तू स्वस्तात पदरात पाडून घेतो याचा त्यांना असलेला अभिमान, आणि ते सर्व इतरांना दाखविण्याचा अट्टाहास यातून घडलेला हा प्रसंग पहा.

तल्लफ

दुकानदार : तुम्ही कृपया माझ्यासमोर सिगारेट ओढू नका.

लोणकढी थाप

"एने, साला जे थापाड्या लै च्यान्गली थाप मारेल तेला मी आज रोक शंबर रुपये बक्षीस देईल." घेलाशेठच्या या घोषणेवर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. आणि का नाही होणार हो? घेलासेठ आधीच कंजूष मक्खीचूस माणूस, स्वतःच्या कापल्या करंगुळीवर मुततानाही तीनदा विचार करणारा, त्यात त्याने भर सभागृहात शंभर रुपये देण्याचं कबूल केल्याने लोकही आश्चर्यचकित झाले.
घेलासेठ एका संस्थेने आयोजित केलेल्या 'लोणकढी थाप' स्पर्धेच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते. त्यानंतर स्पर्धेला सुरुवात झाली, एकेक स्पर्धक स्टेजवर येऊन आपापल्या एकापेक्षा एक सरस 'थापा' सादर करू लागले. शेवटी टाळ्यांच्या कडकडाटात स्पर्धेचा शेवट झाला. सुत्रसंचालकाने परीक्षकांचा निर्णय जाहीर केला तो असा,सर्वोत्कृष्ट "लोणकढी थापबहाद्दर" म्हणून सर्व परीक्षकांनी एकमताने घेलाशेठ यांची निवड केली आहे."

गरम गरम बीजेपी

नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतील हा घडलेला किस्सा. या निवडणुकीच्या वार्तसंकालानासाठी एका खेड्यात जाण्याचा प्रसंग आला होता. दुपारची वेळ होती. चहा घेण्यासाठी म्हणून गावाबाहेरील रोडवर असलेल्या हॉटेलात बसलो होतो. दिलेल्या ऑर्डरचा चहा येण्याची वाट पहात होतो,