आगळं! वेगळं !!!

'पोस्टशंभरी'

आज माझी 'पोस्टशंभरी'. म्हणजेच मी आज लिहलेली पोस्ट शंभरावी आहे. ३१ ऑगस्ट २०१० रोजी ब्लॉग सुरु केला, दररोज किमान एक पोस्ट लिहायचे ठरविले होते. त्याच प्रयत्नाचे फळ म्हणून बघताबघता आज ही शंभरावी पोस्ट लिहायचा योग आला आहे.

त्याच सोबत माझ्या ब्लॉगच्या पेजव्ह्यूजनेही आता पाच हजारांचा टप्पा पार केला आहे. हा ही या 'पोस्टशंभरी' बाबत एक योगायोगच म्हणावा लागेल.

अर्थातच याचं सर्व श्रेय आपण सर्व रसिक वाचकांना आहे. (का असू नये? काहीही लिहलेलं वाचायचं म्हणजे सहनशीलतेचा अंतच नाही का?)

तसेच मला ब्लॉगिंग बद्दल प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे मार्गदर्शन करणाऱ्या नेट गुरूंना आहे. त्या नेट गुरूंचा मी ऋणी आहे, की ज्यांनी नविन ब्लॉगर्सना उपयुक्त ठरतील असे लेख मायमराठी भाषेत लिहून ठेवले आहेत. या क्षेत्रात येणाऱ्या सर्व नविन मंडळींना ते सतत मार्गदर्शक ठरतील यात शंकाच नाही.

आता हे ब्लॉगिंग करत असताना व्यावसायिक दृष्टिकोन म्हणजेच जाहिरातींच्या माध्यमातून अर्थप्राप्तीची अपेक्षा बाळगणे काही गैर नाही, किंबहुना सर्व मराठी ब्लॉगर्सनी असा व्यावसायिक दृष्टिकोन अवश्य बाळगावा असे माझे वैयक्तिक मत आहे.  (सर्व ब्लॉगर्सनी या संदर्भातील निलेश बने यांचा मराठी ब्लॉगवरचा सायबर'ब्लॉक' हा  लेख अवश्य वाचवा.)

त्यामुळे त्या दिशेने वाटचाल करताना गुगलच्या मराठी भाषेतील ब्लॉग्जना जाहिराती द्यायच्या नाहीत या आडमुठ्या धोरणामुळे आता काही लेख इंग्रजीमध्ये लिहणे मला अपरिहार्य आहे. (मनसेची जर 'ई शाखा' असेल तर त्यांनी हा मुद्दा हाती घ्यायला काहीच हरकत नाही. गुगलवर मराठी भाषेतील ब्लॉग्जना केवळ 'इंग्रजीच्या' मुद्द्यावर न अडवता जाहिराती देण्यासाठी मनसेवाले गुगलवर दबाव आणतील का किंवा 'ई राडा' करतील का? हा प्रश्न आहे.)

मात्र त्यामुळे आपणांस विनंती आहे की, या ब्लॉगवरील आपला स्नेह कमी होऊ नये, हीच यानिमित्ताने आपणा सर्व रसिकांना नम्र विनंती आहे. आपणा सर्वांचे पुन्हा एकवार मन:पूर्वक आभार!

Ad-Aware Free Internet Security

Ad-Aware Free provides core protection against Internet threats. Featuring real-time anti-malware protection, advanced Genotype detection technology, rootkit protection, a scheduler, Ad-Aware Free Internet Security gives you the power to protect yourself online. Ad-Aware Free version is a complete malware protection that now combines Lavasoft's pioneer technology for anti-spyware with traditional anti-virus protection.




What's new in this version:
  • Improved detection. Two new proactive detection technologies added.
  • Faster, more efficient updates.

भक्तीसंगीताचा अनमोल खजिना

आपणापैकी बरेच जण इंटरनेटवरून संगीताचा आस्वाद घेत असतात. संगीताची आवड ही प्रत्येक व्यक्तीनुसार भिन्न असणे स्वाभाविकच आहे. आजपर्यंत तुम्ही संगीताविषयीच्या पुष्कळ वेबसाईट पहिल्या असतील.

पण आज आपण अशा एका वेबसाईट विषयी माहिती घेणार आहोत, की जेथे आहे भारतीय हिंदू धर्माच्या भक्ती संगीताचा अध्यात्मिक, धार्मिक सांस्कृतिक परंपरेचा वारसा जपणारा विशाल अनमोल खजिना.

वीस वर्षानंतर तुम्ही कसे दिसणार?

तुम्ही वीस वर्षानंतर कसे दिसणार आहात? काही कल्पना आहे का? किंवा तसे कल्पनाचित्र तरी तुमच्या डोळ्यासमोर येते का? नाही ना?

'गुलाबी' थंडी

दात नसलेल्या
'बोचऱ्या'
थंडीचा
रंग मात्र
'गुलाबी' कसा?

TATA DOCOMO ची 3G FREE ट्रायल ऑफर

टाटा डोकोमोने 3G सेवा आधीच सुरु केलेली आहे. आता या सेवेचा अनुभव घेण्यासाठी त्यांनी त्यांच्या ग्राहकांना फ्री ट्रायल ऑफर जाहीर केली आहे.

मोबाईलवर मिळवा फ्री एसएमएस

ज्या न्यूज, हेल्थ टिप्स, जोक्स, स्पोर्टस्‌ अशा सारख्या एसएमएस सर्विसेस मिळण्यासाठी मोबाईल ऑपरेटर दरमहा प्रत्येक चॅनल्ससाठी चार्जेस आकारतात, तेच एसएमएस चॅनल्स आपल्या मोबाईलवर फ्री मिळायला लागले तर तुम्हाला फार मजा येईल की नाही?

तुम्ही म्हणाल की हे कसं शक्य आहे? होय हे खरे आहे आणि शक्यही आहे. 'Googlesmschannels' ही एक पूर्ण मोफत मिळणारी सेवा आहे. त्यासाठी तुम्हाला काहीही शुल्क आकारले जात नाही. या सेवेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला प्रथम गुगलच्या http://labs.google.co.in/smschannels/browse या साईटवर भेट द्यावी लागेल.

तेथे तुमचे गुगल अकाऊंट व तुमचा मोबाईल नंबर देऊन साईनअप झाल्यावर, तुम्हाला एक व्हेरिफिकेशन कोड तुमच्या मोबाईलवर पाठविला जाईल. तुम्हाला मिळालेला कोड साईटवर विचारलेल्या ठिकाणी तुम्ही एन्टर केलात की साईनअपची प्रक्रिया पूर्ण होईल.

त्यानंतर तुम्हाला येथे बिजनेस, एज्युकेशन, एंटरटेन्टमेंट, फायनान्स, फूड, हेल्थ, जॉब्स, जोक्स, न्यूज, शॉपींग, स्पिरिच्युअल, स्पोर्टस, टेक्नॉलॉजी, ट्रॅव्हल्स, वेदर अशी चॅनल्सची भली मोठी यादीच दिसेल. त्यापैकी आपल्या आवडीचे चॅनल्स पाहून निवडून सबस्क्राईब करा.

याशिवाय तुम्हाला झटपट जर अधिक काहीतरी शोधायचे असेल तर सर्च बॉक्सची मदत घ्या. उदा. या पेजवरील 'सर्च फॉर चॅनल्स' या सर्च बॉक्स मध्ये तुम्ही जर टाईप केले marathi news तर मराठी न्यूज चॅनल्सची यादी आपल्यापुढे येईल. आणि तुम्ही जर ते 'मराठी न्यूज चॅनल्स' सबस्क्राईब केलेत तर, चक्क मराठी भाषेतील न्यूज तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळायला लागतील अगदी मोफत.

याशिवाय तुम्ही सबस्क्राईब झालेल्या चॅनल्सवर तुमच्या मित्रमंडळींनाही आमंत्रित करु शकता. येथील 'इन्व्हाईट युजर्स' या पर्यायाद्वारे एकाचवेळी जास्तीतजास्त पाच जणांना, त्यांचे मोबाईल नंबर या बॉक्समध्ये टाईप करून आमंत्रित करू शकता. आणि त्यानाही या मोफत सेवेत सामील करून घेऊ शकता.

त्यासाठी तुमचे आमंत्रण मिळालेल्या मित्रांनी ज्या चॅनल्सच्या नावाने आमत्रण मिळाले आहे त्या चॅनल्स च्या नावाने 'ON' असा फक्त एक एसएमएस 9870807070 या क्रमांकावर पाठवून प्रतिसाद देणे आवश्यक आहे. उदाहरण : 'ON AajTakMarathi' याप्रमाणे.

शेतकऱ्यांचा कळवळा

=> शेतकऱ्यांचा कळवळा तुम्हालाच आहे असे समजू नका : विरोधकांच्या गोंधळावर मुख्यमंत्र्यांची रोखठोक भूमिका
  • हे आम्हालाही "कळतयं" पण "वळत" नाही.
=> आदर्शमध्ये फ्लॅट घेतला कसा? : सनदी अधिकाऱ्यांना

'श्रीमंतीची गुरुकिल्ली'

व्यक्ती : नमस्कार सर, आपल्या संस्थेमार्फत माझा अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम 'श्रीमंतीची गुरुकिल्ली' अर्थात 'श्रीमंत व्हा' हा आयोजित करावा अशी आपणांस विनंती आहे.
संस्थाचालक : अस्सं! बरं आता मला असं सांगा की, तुमच्या या कार्यक्रमामुळे कुणाला फायदा झाला आहे का? आणि खरोखरीच कुणी श्रीमंत झाले आहे का?
व्यक्ती : (विनम्रपणे) या दोन्ही प्रश्नांचे उत्तर माझ्यारुपाने आपणासमोर उभे आहे सर!

3D Dual SIM मोबाईल फोन

3D च्यम्ष्याशिवाय इमेजेस, व्हिडिओज आणि इंटरफेस 3D मध्ये पहाता येऊ शकेल असा आपला पहिला 3D फोन ZEN S30 झेन मोबाईलने सादर केला आहे.

भारतातील हा दुसरा 3D फोन असून पहिला 3D फोन Spice ने सर्वप्रथम सादर केला आहे.

स्लीक आणि स्टायलीश डिझाईन लेटेस्ट 3D यूजर इंटरफेस, 3D Stereoscopic टेक्नोलॉजी असलेल्या या Dual SIM फोनमध्ये 1.3MP camera आहे. 2.4 इंच QVGA डिस्प्ले ज्यावर यूजर आपल्या आवडीनुसार 2D किंवा 3D इंटरफेस वापरू शकतात. Mp3 प्लेयर, ब्लूटूथ, Dual external स्पीकर्ससह एफएम रेडिओ, 3D मेनू, 8 GB पर्यंत वाढविता येणारी मेमरी अशी काही याची ठळक वैशिष्ट्ये आहेत. शिवाय याच्या सोबत 2GB मेमरी कार्ड फ्री आहे.

Zen S30 3D मोबाईल फोनची स्पेसिफिकेशन्स:

    * Dual SIM (GSM + GSM) (900 /1800 )
    * Type -Bar
    * 3D interface
    * 3D menu
    * Display 2.4” inch Bright TFT LCD Screen
    * Camera 1.3 Megapixel ,1280 x 1024 Pixels
    * 3D Videos
    * 3D images
    * USB connectivity
    * Bluetooth
    * GPRS -32-48kbps
    * USB
    * Video Player and Video Recording (MP4;3GP)
    * Music Player with Multi Format MP3,M4A, aac, amr
    * 2GB Memory card and can be extended  up to 8GB
    * FM Radio with FM Recording
    * Dual external speakers

Zen S30 हा फोन ४५९९ रुपयांत सर्व मोबाईल विक्रेत्याकडे उपलब्ध आहे.

स्वस्त 3G मोबाईल फोन

थ्रीजी मोबाईल म्हणजे महाग या कल्पनेला छेद देणारा एक स्वस्त मोबाईल फोन मार्केट मध्ये आलाय. लेमन या कंपनीने W100 3G या फोनची घोषणा केली आहे. या फोनच्या पुढील बाजूस व्हिडिओ कॉलिंगसाठी एक VGA camera व मागील बाजूस 1.3MP camera असणार आहे.

हाय स्पीड इंटरनेटसाठी GPRS व 3G ला हा फोन सपोर्ट करतो. Vibrant Red आणि Stylish Blue कलर मधील या फोनचा स्क्रीन साईज २ इंच इतका आहे. या फोनला 3.5 mm audio jack असून, याचा म्युझिक प्लेयर MP3, WAV, MIDI, AAC, AMR and AAC+ formats ना सपोर्ट करतो तर  व्हिडीओ प्लेयर 3GP and MP4 formats ना सपोर्ट करतो. यात Opera Mini Browser,Facebook,Twitter,Yahoo,Nimbuzzयासारखी अप्लिकेशन्स प्रीलोड केलेली आहेत.

जावा अप्लिकेशन्सना सपोर्ट करणारा हा फोन प्रीलोडेड LiveTV application सोबत येतो. 3G सेवेद्वारे या लाइव्ह टीव्हीवर लोकप्रिय चॅनेल्स पहातायेणे शक्य आहे. यासाठी एक महिना मोफत सबस्क्रिप्शन देऊ केले आहे. या फोनला 60 MB इंटर्नल मेमरी असून ती 16 GB पर्यंत वाढविता येऊ शकते.

Lemon W100 3G ची Full Specification याप्रमाणे :

Mode Type: GSMOnly GSM(900MHZ,1800MHZ), WCDMA (2100MHZ)

Display: 2.0" (5.09 cm), Display Type: QVGA(240x320), Dimensions: 109*46*13mm Weight with battery: (grams)90

Battery Capacity: 800 mAh, Talk time: 3.5 Hrs, Stand by time: 200 Hrs

Memory:

Phonebook Capacity: 1000, SMS: 255, Internal memory: 60 MB, Memory Card: 16GB.

Multimedia:

Ring Tones/Music Player (Supportable format): MP3, MIDI, AAC, AMR, AAC+MP3 Video player: MP4,3GP,3G2, Video Recorder: MP4,3GP,3G2, Voice recorder: Yes, FM: Yes,

Camera: 1.3 MP (Rear), 0.3MP (Front)

Connectivity:

Bluetooth: Yes, GPRS/WAP: Yes, MMS: Yes, PC Synchronization: Yes, Work as Modem: Yes, USB drive: Yes

Others:

Alarm clock: Yes, World clock: Yes, Stopwatch: Yes, Calculator: Yes,

Pre-loaded applications: Opera Mini Browser,Lemon Twist (Facebook,Twitter,Yahoo,Nimbuzz).

Lemon W100 हा फोन ३५०० रुपयांत सर्व मोबाईल विक्रेत्याकडे उपलब्ध आहे.