आगळं! वेगळं !!!

वृत्तवाहिन्यांचे भान सुटले

अलीकडे टीआरपी वाढविण्याच्या हव्यासापोटी विविध वृत्तवाहिन्या आपले तारतम्य सोडून बातम्या दाखवत आहेत असे दिसते. आणि विशेषतः जेव्हा कधी मुंबईवर अतिरेकी हल्ले किंवा बॉम्बस्फोट होतात तेव्हा ही बाब प्रकर्षाने जाणवते. या नादात वृत्तवाहिन्या आपणच 'गुप्तचर' असल्याच्या अविर्भावात, (जेव्हा की तपासयंत्रणा अजून घटनास्थळावरून सॅम्पल गोळा करत होत्या, त्यानंतर त्यांची तपासणी होऊन त्याचे निष्कर्ष जाहीर होणार त्याआधीच) स्फोटके कोणती वापरली गेली, या बॉम्बस्फोटामागे कोणत्या संघटनेचा हात आहे हे फक्त आपल्यालाच 'कळले' अशा थाटात बातम्या दाखवताना दिसत होत्या.

बॉम्बस्फोट आणि मुंबईकर

१३ जुलै २०११ रोजी सायंकाळी मुंबईत ३ ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटाने, मुंबई सुरक्षित आहे हे राज्य सरकारने वेळोवेळी केलेले दावे फोल ठरवले आहेत. आणि मुंबईकर आजही असुरक्षित आहेत हे पुन्हा एकवार अधोरेखित झाले आहे.

बॉम्बस्फोट करण्यासाठी लागणारी स्फोटके आणि इतर साधनसामग्री मुंबईची सुरक्षाव्यवस्था भेदून अतिरेकी पार आतपर्यंत घेऊन येऊ शकतात ही एकच गोष्ट सुरक्षाव्यवस्थेचे धिंडवडे काढण्यास पुरेशी आहे. त्यामुळे सरकारच्या कोणत्याही दाव्यावर मुंबईकरांनी विसंबून रहाण्याचे कारण नाही.

मंत्री व्हायचेच कशाला?

=> महाराष्ट्राचे पंख कापले; गुरुदास कामत यांचा 'नाराजीनामा'
  • केंद्रीय नेतृत्वाला निदान एक तरी 'गुरु' भेटला

दिग्विजयसिंह यांची मुक्ताफळे

=> पाच किलोमीटर धावा आणि पोलीस व्हा! भरतीचे निकष बदलले; तोंडी परीक्षा झाली बंद
  • नवा निकष : प्राप्त परिस्थितीला 'तोंड' न देता 'पळता' येणे आवश्यक

भूमी अधिग्रहण कायदा

=> मंत्रीमंडळ फेरबदलाबाबत सोनिया, मनमोहनसिंग चर्चा; द्रमुककडून नावे न देण्याचा निर्णय
  • बरोबर आहे, कुणाला 'बाळू' अन् कुणाला 'टाळू' ही भानगडच नको

बीएसएनएलची ओबीसी टू ओबीसी फ्री कोंलिंग योजना

बीएसएनएल ओबीसी टू ओबीसी फ्री कोंलिंग योजना सादर करणार ही बातमी सकाळनेच सोमवार दि.४ जुलै रोजी दिली आणि अपेक्षेप्रमाणे त्यावर प्रतिक्रियांचे वादळ उठले. ही बातमी ई-सकाळच्या http://72.78.249.107/esakal/20110704/4700594298586467547.htm या लिंकवर वाचता येईल.

जातींच्या पेटवा ज्योती

=> राष्ट्रवादीची प्रकरणे बाहेर काढण्यासाठी अण्णांचा खांदा कशाला?
  • म्हणजे कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे कशाला? असचं ना?

सोशल इंजिनिअरिंग

=> कलमाडींना 'व्हीआयपी' ट्रीटमेंट; कारागृह अधिक्षकांची उचलबांगडी
  • 'चहापाण्यासाठी' एवढे आकांडतांडव कशाला?

टाईम

=> मी दुबळा नाही : पंतप्रधान मनमोहनसिंग
  • 'रामलीला' वरील कारवाईवरून ते तुमच्या लक्षात आलं असेलच!

वन्समोअर!

=> सरकारने योगगुरूंना उघडे पाडले : कपिल सिब्बल
  • ते आधीच उघडे आहेत

नाईलाज

=> न लढताच हरले मुंडे; सुषमा स्वराज यांच्याशी चर्चेनंतर पक्षातच राहणार असल्याची घोषणा
  • कॉंग्रेसने केली 'कोंडी' आणि मुंडेंची उडाली 'दांडी'