Home » All posts
वारकरी लहान, नेते महान!
सध्या पंढरीच्या वारीचे रिपोर्टींग करण्याची विविध
वाहिन्यांमध्ये जोरदार स्पर्धा सुरू आहे. खरे तर विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने
पंढरीची पायी वारी वर्षानुवर्षे करणाऱ्या वारकऱ्यांना अगदी आत्ता काही वर्षात सुरू
झालेल्या या लाईव्ह रिपोर्टींगचे कौतुक असण्याचे काहीच कारण नाही. आपला टीआरपी
वाढविण्याकडे लक्ष देणाऱ्या वाहिन्यांना मात्र त्याची आवश्यकता वाटत आहे. पण
रिपोर्टींग करण्यासाठी वारीसोबत जाणाऱ्या या वाहिन्यांच्या वार्ताहरांनी काही
गोष्टींचे भान राखण्याची गरज आहे.
या दिंडीत पायी चालणाऱ्या वारकऱ्यांच्याऐवजी जे सेलिब्रेटी
काही मिनीटांसाठी वारीत सहभागी होतात, त्यांना फुकटचा भाव देण्यामुळे खऱ्याखुऱ्या
वारकऱ्यांवर मात्र अन्याय होत आहे, असे वारीचे विशेष बातमीपत्र पहाणाऱ्या सर्वसामान्य
प्रेक्षकांची भावना झाल्यास नवल नाही. खऱ्या वारकऱ्यांना या असल्या प्रसिध्दीची
हौस नसते. ते तर टाळमृदंगाच्या नादब्रम्हात दंग होऊन भक्तीरसात चिंब होऊन, विठ्ठल नामाचा
गजर करत उन-पाऊस, थंडी-वाऱ्याची पर्वा न करता अथकपणे मार्गक्रमण करत असतात.
अलीकडे वारीमध्ये काही मिनीटांसाठी सामील होण्याची सेलिब्रेटी,
नेतेमंडळीमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. पण काही मिनीटांसाठी वारीत सामील झाल्यामुळे आपल्या
सोबत आलेल्या लवाजम्यामुळे आणि सिक्युरिटीमुळे, पांडुरंगाच्या भेटीच्या ओढीने पंढरीकडे
वाहणाऱ्या या भक्तीरसाच्या प्रवाहाला अडथळा होतो आहे याचे भान त्यांना रहात नाही.
आणि अशातच हे वार्ताहर तुम्ही मला सांगा, तुम्हाला या वारीत सामील झाल्यामुळे कसं
वाटतयं? काय वाटतयं? यासारखे भंपक प्रश्न विचारत त्यांच्या
मागेपुढे फिरत असतात. आता यावर हे सेलिब्रेटी म्हणतील की आम्हाला काही प्रसिध्दीची
हौस नाही. तर मग हे वार्ताहर त्यांना उगीचच का भाव देत त्यांच्या मागेपुढे गोंडा
घोळत का फिरत रहातात हेच समजत नाही.
त्याऐवजी त्यांनी वारीच्या मार्गावर रस्ते आहेत की खड्डे, त्यात
पाणी साठलयं की चिखल झालाय, वाहनांच्या रहदारीमुळे काय त्रास होतोय, उन-पाऊस,
थंडी-वारा याचा वारकऱ्यांना काय त्रास होतोय, मुक्कामाच्या ठिकाणी स्वच्छतागृहाअभावी
काही गैरसोयी होतात का, वारकऱ्यांना वैद्यकीय सुविधा, रॉकेल, गॅस, पाणी, रस्ता
सुरक्षा यासारख्या सुविधा, पुरेश्या प्रमाणात, वेळेवर व व्यवस्थिपणे मिळत आहेत का,
याबाबतचे वार्तांकन केल्यास वारकरी त्यांना धन्यवाद तरी देतील.
सर्व समान आहेत हा लहान आणि तो मोठा असा भेदभाव वारकरी
सांप्रदाय करत नाही त्यामुळेच जयहरी माऊली म्हणत वयस्करांनीसुध्दा लहानांचे पाय
धरलेले दिसतात. वारीसोबत जाणाऱ्या वार्ताहरांनी वारकरी सांप्रदायाच्या या शिकवणीचा
जर काही बोध घेतला तर वारकरी लहान आणि नेते महान असा भेदभाव दिसणार नाही.
***
एलबीटी वसुलीसाठी पर्याय
बुधवार दि.15 मे 2013 रोजी रात्री एका खाजगी दूरचित्रवाणी
वाहिनीवर झालेल्या चर्चेच्या कार्यक्रमात काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी व्यापारी
प्रतिनिधींना जवळपास बोलूच दिले नाही. प्रत्येक वेळी व्यापारी प्रतिनिधी बोलत
असताना त्यांचे बोलणे प्रेक्षकांना कळू नये अशा स्वरात आपले म्हणणे जोरजोरात
मांडण्याचा त्यांचा सूर होता. याचवेळी हा एलबीटी तुम्ही कुठे तुमच्या खिशातून
भरणार आहात तो तर नागरिकांकडून घेऊन तुम्ही भरायचा आहे याचा उल्लेख केला.
हा कर नागरिक भरणार आहेत, तर मग यासाठी शासनाने
व्यापाऱ्यांची माध्यम म्हणून निवड करून त्यांना वेठीस धरण्याचे कारण काय? असा
प्रश्न त्यांना विचारावासा वाटतो. महानगरपालिका इतर जे काही कर नागरिकांकडून वसूल
करते त्याच बिलामध्ये हा एलबीटी कर लावून खुशाल वसूल करावा.
याच संदर्भात मुख्यमंत्र्यांनी काही दिवसापूर्वी घेतलेल्या
पत्रकार परिषदेमध्ये, त्यांनी या कराला पर्याय म्हणून व्हॅटच्या दरात वाढ
करण्याच्या शक्यतेला नकार दिला होता. काही स्थानिक संस्थासाठी राज्यातील सर्व
नागरिकांनी कर का भरायचा? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. मग आता महानगरपालिका हद्दीत
असलेल्या व्यापाऱ्यांच्याकडून राज्यातील किरकोळ व्यापारी माल खरेदी करतात तेव्हा
राज्यातील इतर सर्व व्यापाऱ्यांनी म्हणजेच नागरिकांनी त्या महानगरपालिकेसाठी हा
एलबीटी कर का भरायचा? यावर काय उत्तर आहे. महानगरपालिका
हद्दीबाहेर विक्री केलेल्या मालावर एलबीटी भरण्याची सूट दिली जाणार आहे काय?
***
संवेदनाहीन राज्य शासन
कालच सातारा येथे बोलताना मा. शरद पवार यांनी व्यापारी
आपले शत्रू नाहीत. मुंबई सारखे होलसेल मार्केट बंद रहाणे राज्याच्या दृष्टीने
चांगले नाही. एलबीटीच्या प्रश्नावर तातडीने मार्ग काढावा, असा सल्ला देऊनही राज्य
शासनाकडून अद्यापही त्यादृष्टीने काही सकारात्मक पाऊले उचलली गेल्याचे दिसत नाही. शासनाची
संवेदना बोथट झाल्याचे तर हे लक्षण नव्हे
व्यापाऱ्यांचा संप, प्राध्यापकांचा संप, डॉक्टरांचा संप, मागील
आठवड्यात झालेला हॉटेल रेस्टॉरंटचा संप, आणि आता आज मेडिकल दुकानदारांचा संप. ही संपण्याऐवजी
वाढत चाललेली यादी पाहून राज्यातील किती समाज घटक नाराज आहेत हे लक्षात यावे. पण
त्यांच्या व्यथा जाणून घेऊन त्यातून मार्ग काढण्याऐवजी शासनाकडून कारवाई
करण्याच्या धमक्या मिळतात. ही सामंज्यस्याची आणि सर्वांना घेऊन पुढे जाण्याची
भूमिका निश्चितच नाही.
एलबीटीच्या प्रश्नाबाबत सध्या प्रत्येक जणांकडून
व्यापाऱ्यांनाच सल्ला दिला जातो, की त्यांनी सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरु
नये, व्यापार सुरू ठेवून आंदोलन करावे. इतक्या दिवसांपासून राज्यातील व्यापारपेठा
ठिकठिकाणी बंद ठेवून सुध्दा शासनाची त्यांच्याकडे पहाण्याची तयारी नाही. तेव्हा
व्यापार सुरू ठेवून व्यापाऱ्यांनी कितीही विरोध दर्शवायचा प्रयत्न केला तर डोळ्यावर
कातडे ओढून बसलेले शासन त्यांच्या मागण्याकडे लक्ष तरी देईल का? याचे
उत्तर व्यापाऱ्यांना सल्ला देणारांनी द्यावे.
राजकारणी लोक आणि विविध संघटना जेव्हा बंद पुकारतात तेव्हा
दुकाने बंद करा म्हणून व्यापाऱ्यांना वेठीस धरतात. बसच्या काचा फोडतात. व्यापारी
तोडफोड करत नाहीत किंवा इतरांवर दबाव आणत नाहीत, तर ते स्वतःच्या मालकीची आपापली
दुकाने बंद ठेऊन निषेध व्यक्त करतात. त्यांच्या मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी
त्यांच्या हाती असलेले हे शस्त्रही त्यांनी वापरू अशी अपेक्षा त्यांच्याकडून का
करावी?
शेवटी व्यापारीही एक सर्वसामान्य नागरिकच आहे. तो व्यापार
करत असलेली वस्तू वगळता इतर सर्व बाबतीत तो ही ग्राहकच आहे. तेव्हा या बंदमुळे
निर्माण झालेल्या परिस्थितीला त्यालाही तोंड द्यावे लागत आहे, आणि
सर्वसामान्यांच्या व्यथाही तो भोगत आहे ही बाब नाकारून चालणार नाही. पण ही दुहेरी
भूमिका त्याला का वठवावी लागत आहे याकडे बघणे ही तितकेच गरजेचे आहे.
व्यापार ठप्प झाल्याने व्यापाऱ्यांचेच सर्वाधिक आर्थिक
नुकसान होत आहे. व्यापारी वृत्तीला नुकसान ही न पटणारी गोष्ट आहे. पण तरीही
त्यांच्यावर आज ही वेळ का आली आणि त्यातील आगतिकता काय आहे याचा विचार व्हायला
हवा.
पण तसा तो न करता व्यापाऱ्यांनी व्यापार करावा राजकारण
करण्याच्या भानगडीत पडू नये असे राज्यकर्ते सुनावतात तेव्हा आश्चर्य वाटते.
त्यांच्या वेदना समजून घेण्यापेक्षा आपल्या मालकीच्या राजकारणाच्या क्षेत्रात
इतरांचा प्रवेश होऊ नये याकडे यांचे किती लक्ष आहे हे अधोरेखीत होते. तेच लक्ष जर राज्यातील नाराज समाज घटकांच्या मागण्यांकडे
दिले तर, संपकऱ्यांचे प्रश्न चिघळणार नाहीत.
***
कर्नाटकांत ‘भ्रष्टाचारा’ ची खांदेपालट
कर्नाटकांत ‘भ्रष्टाचारा’ ची खांदेपालट
कर्नाटक मध्ये सत्तापरिवर्तन झाले; भाजप
आणि जेडीएस दुसऱ्या स्थानानर गेले आणि येडियुरप्पांचाही फुगा फुटला. कर्नाटकात ते होणे
अपेक्षितच होते. भाजप मधील अंतर्गत कलहाच्या दररोज बाहेर येणाऱ्या बातम्या आणि भ्रष्टाचारांच्या
नवनविन कहाण्या ऐकून राज्यातील लोक कंटाळले होते.
आता मात्र बरे झाले, दगडापेक्षा वीट मऊ! या न्यायाने तेथील लोकांनी स्विकारलेला नविन पर्याय हा या सगळ्या गोष्टींना
एक सक्षम पर्याय आहे. भ्रष्टाचार शिरोमणी म्हणून केंद्रात ख्याती पावलेल्या; सर्वच बाबतीतील समृध्द अनुभव गाठीशी असलेल्या काँग्रेसला लोकांनी पर्याय
म्हणून स्विकारले आहे.
त्यामुळे आता भाजपमधील अंतर्गत मतभेद व कलह जसे जाहिरपणे
बाहेर येत होते किंवा मिडीयाला हाताशी धरुन आणले जात होते; तसे
यापुढे घडताना दिसणार नाही. काँग्रेसमध्ये अश्या गोष्टींना थारा नाही. ‘गॉडमदर’च्या हाती एकसूत्री
कारभार असल्याने उठ म्हणले की उठायचे आणि बस म्हणले की बसायचे अशा शिस्तीत वाढलेली
जेष्ठ मंडळी आता कर्नाटकचा राज्यशकट हाकणार आहेत.
आणि आता
रहाता राहिला दुसरा मुद्दा भ्रष्टाचाराचा. या प्रांतातील भाजपचे अननुभवी सुभेदार
तो झाकण्यात अपयशी ठरले यावरुन यातील काँग्रेसइतका अनुभव भाजपच्या गाठीशी नव्हता हे
स्पष्ट झाले. आता स्वातंत्र्यापासून अपवादात्मक काळ
सोडता कायम हाती असलेली केंद्रातील सत्ता, हाती असलेली सीबीआय सारखी तपास यंत्रणा,
अवहालातही हवे तसे बदल करण्याची हातोटी अशी सर्व बलस्थाने व अनुभव पाठीशी असलेली
काँग्रेस कर्नाटकचा राज्य कारभार पहाणार आहे. त्यामुळे तेथील जनतेला आता सत्तापक्षातील
अंतर्गत कलह आणि भ्रष्टाचाराच्या बाहेर येणाऱ्या कहाण्यापासून मुक्ती मिळेल अशी
आशा करायला हरकत नाही.
***
एलबीटीच्या राजकारणाचा दुसरा अंक
एलबीटीच्या राजकारणाचा दुसरा अंक
एलबीटी विरोधात व्यापाऱ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाला
आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही पाठिंबा दिल्यामुळे, व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला एक
नविन बळ मिळाले आहे. व्यापाऱ्यांच्या या मागणीला भाजप व शिवसेना यांनी आधीच
पाठिंबा जाहिर केलेला आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत एलबीटी मागे घेणार नाही,
तर लागू करणारच या शासनाच्या हटवादी व हेकेखोर भूमिकेबाबत मुख्यमंत्री एकटे
पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
अर्थातच भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या या व्यापारी
प्रेमाला राजकीय किनार आहेच ही गोष्ट लपून राहिलेली नाही. काँग्रेसने सुरूवातीपासूनच
व्यापाऱ्यांचा विरोध न जुमानता, एलबीटी लागू करण्याबाबत घेतलेल्या ताठर भूमिकेमुळे
व्यापारी वर्ग काँग्रेसवर प्रचंड नाराज आहे आणि तो व्यापारी वर्ग येत्या
विधानसभेच्या निवडणूकीत काँग्रेस पक्षाला कदापिही मतदान करणार नाही. ही गोष्ट
काँग्रेसेतर पक्षांनी नेमकी हेरली आहे. त्यामुळे पाठिंबा जाहिर करत असतांना एकीकडे
राज्यातील लाखो व्यापाऱ्यांच्या एकगठ्ठा मतांवर डोळा ठेवायचा, तर दुसरीकडे वरकरणी व्यापाऱ्यांना
सहानुभूती दाखवत आम्ही या प्रश्नावर तुमच्या पाठीशी खंबिरपणे उभे आहोत असे चित्र
निर्माण करून मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणायचे, असा एलबीटीच्या राजकारणाचा दुसरा
अंक आता रंगत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसला व्यापाऱ्यांच्या या मागणीविषयी
कळवळा असता तर त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीतच एलबीटी लागू करण्याच्या मुद्द्यावरून
कडाडून विरोध केला असता. आणि तसे घडले असते तर, व्यापाऱ्यांचा व बेमुदत बंदमुळे
सर्वसामान्य नागरिकांचा अंत पाहिला जात असल्याचे चित्र आज दिसले नसते. पण तसे घडलेले
नाही, व्यापाऱ्यांची ही व्होट बँक इतर पक्षांच्या हाती जाऊ नये, आणि मुख्यमंत्र्यांना
या मुद्द्यावरुन अडचणीत आणायची आयती मिळालेली संधी हातची जाऊ नये या दुहेरी
उद्देशानेच राष्ट्रवादीने ही खेळी खेळली आहे. ही खेळी मोठ्या साहेबांच्या
सांगण्यावरून खेळली गेली असू शकते.
एलबीटीच्या मुद्द्यावर सर्व विरोधी पक्ष एकवटले आहेत, आणि
आता तर सत्तेत सहभागी असलेला मित्र पक्षही या मुद्द्यावर साथ देत नाही अश्या
अडचणीच्या परिस्थितीमध्ये आता मुख्यमंत्री सापडले आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांचाही
अधिक अंत पाहिला जाऊ नये, आणि सर्वसामान्य नागरिकांचेही हाल होऊ नये असे जर मुख्यमंत्र्यांना
वाटत असेल तर, त्यांनी आता हा प्रश्न प्रतिष्ठेचा न करता व तुटेपर्यंत न ताणता एलबीटी
मागे घ्यावा अशीच सर्वसामान्यांचीही भावना आहे.
पुढच्या वर्षीच जीएसटी म्हणजेच गुडस् अँड सर्व्हिस टॅक्स
येत आहे, आणि त्यामुळे लागू असलेले इतर सर्व करसुध्दा संपुष्टात येणार आहेत मग एक
वर्षापेक्षाही कमी कालावधीसाठी हा एलबीटी टॅक्स लागू करण्याचा राज्य शासनाचा एवढा
अट्टाहास का? व्यापाऱ्यांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नासाठी मुख्यमंत्र्यांच्याकडे काही
उत्तर आहे का?
ऑनलाईन पैसे कमवा
प्रत्येकाला इंटरनेटवर वेळ घालविताना त्याच्या जोडीला ऑनलाईन पैसे कमविण्याची इच्छा असते. त्यासाठी अनेक मार्गही आहेत. पैसा लाईव्ह हा
एक त्यापैकी आहे. आपणांपैकी पुष्कळ लोकांकडे पैसा लाईव्हचे अकाउंट असेलसुध्दा.
काही लोकांची अशीही समजूत असू शकेल की, पैसा लाईव्ह ही फ्रॉड साईट आहे. पण त्या
साईटवरील मेल वाचून आजपर्यंत बऱ्याच लोकांनी भरपूर पैसे कमविले आहेत. त्याची
खात्री कंपनीच्या वेबसाईटवर कंपनीने नाव व तारखेसह लाभार्थी खातेधारकांना दिलेले चेक
आणि कुरियर कंपनीच्या रिसीटच्या स्कॅन्ड कॉपीजचे पुरावे पाहून खात्री करुन घेता
येईल.
>> पैसा लाईव्हचे
अकाउंट कसे काढायचे?
तुम्हालासुध्दा पैसा लाईव्हच्या माध्यमातून पैसे कमवायचे
असतील तर, त्यासाठी सर्वप्रथम तुमचे पैसा लाईव्हवर अकाउंट असणे आवश्यक आहे. जर
तुम्ही अजून अकाउंट काढले नसेल तर येथे क्लिक करुन अकाउंट काढता येईल. तुमचे अकाउंट काढल्यावर
तुमच्या खात्यावर लगेच रु.99/- जमा होतील. त्याचबरोबर तुम्ही जर तुमची आयडी लिंक
मित्रामध्ये शेअर केली व त्यावरुन जर आणखीन अकाउंट सुरु झाले, तर त्या प्रत्येक
अकाउंटसाठी रु.2/- प्रमाणे तुमच्या खात्यावर पैसे जमा होतील. म्हणजेच अकाउंट
उघडल्यापासूनच पैसे तुमच्या खात्यात जमा होत रहाण्यास सुरुवात होईल.
>>
पैसा लाईव्हवर प्रत्यक्ष काय काम करावे लागते?
तुम्ही दररोज तुमच्या अकाउंटमध्ये लॉगीन होऊन इनबॉक्स मधील
मेल चेक करुन वाचावे/पहावे लागतात. हे मेल वाचल्यावर प्रत्येक मेलमागे पंचेवीस
पैश्यापासून ते पांच रुपयांपर्यंतची रक्कम तुमच्या खात्यात जमा होते. केवळ तुम्ही
अकाउंटमध्ये लॉगीन झालात तरीदेखील दहा पैसे इंसेन्टीव्ह तुमच्या खात्यावर जमा
होतो. हा इन्सेटीव्ह 24 तासांतून एकदाच मिळतो. पाचशे रुपयांपेक्षा अधिक रक्कम
तुमच्या खात्यावर जमा झाल्यानंतर तुम्ही ती मिळण्यासाठी विनंती करु शकता, आणि व्हॅलीडेशन
नंतर ती मान्य झाल्यानंतर पुढील महिन्याच्या 15 तारखेनंतर तुम्हाला रकमेचा चेक
कुरिअरने अथवा रजि. पोस्टाने घरपोहोच मिळतो. किमान सात-आठशे रुपयांचा बॅलन्स
खात्यावर जमा झाल्यावर रक्कम मिळण्यासाठी विनंती करावी.
>> दहा सेकंदांची
ट्रीक
पण रोज प्रत्येक मेलवर क्लिक करुन वाचणे म्हणजे कंटाळवाणे
आणि वेळखाऊ काम आहे. पण आता हेच काम मेल न वाचता आपोआप सुध्दा करता येईल. अनेक मेल
चेक करण्याचे कंटाळवाणे आणि निरस काम फक्त दहा सेकंदात आपोआप चेक करुन तुमच्या
खात्यात त्याची रक्कम झटपट जमा होण्यासाठी खाली सांगितलेल्या पध्दतीप्रमाणे प्रत्येक
पायरीचा काळजीपूर्वक अवलंब करा.
तुम्ही जर गुगल क्रोम ब्राऊजर वापरत असताल तर टूल डाऊनलोड
करु घेण्यासाठी येथे क्लिक करा.
तुम्ही जर फायरफॉक्स ब्राऊजर वापरत असाल तर, येथे क्लिककरुन टूल डाऊनलोड करावे लागेल.
हे टूल तुमच्या ब्राऊजरमध्ये अड झाल्यावर तुमचा ब्राऊजर रिस्टार्ट करा.
ब्राऊजरच्या ऊजव्या कोपऱ्यात एक आयकॉन दिसू लागेल.
आता तुम्हाला इथे क्लिक करुन आणखीन एक फाईल डाऊनलोड करुन
इन्स्टॉल करावी लागेल.
यानंतर तुमच्या अकाउंटमध्ये लॉगीन व्हा. इनबॉक्समध्ये जा.
तेथे दिसत असलेले अनेक मेल वाचून तुम्हाला पैसे मिळणार आहेत, पण आता मात्र हे मेल
वाचण्याची गरज नाही. इनबॉक्स उघडल्याबरोबर ब्राऊजरच्या उजव्या कोपऱ्यात एक बॉक्स
दिसेल.
त्यावरील Click Here To Start Checking Mail या संदेशावर क्लिक करा. आता दहा सेकंद थांबून F5 बटन
दाबून वेबपेज रिलोड करा. वाचून झालेले मेल डिलीट झालेले असतील. व जर पुन्हा नविन
ईमेल इनबॉक्समध्ये दिसत असतील तर पुन्हा Here To Start Checking Mail या संदेशावर क्लिक करा. अश्याप्रकारे सर्व अनरीड मेल वाचले जाऊन डिलीट
होतील आणि त्याचे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील. ते तुम्ही My Earning वर क्लिक करुन बघू शकता.
महत्वाची सूचना :
या ब्लॉगवरील माहितीचा उपयोग स्वतःचे
जबाबदारीवर करावा. कोणत्याही साईटबद्दल कोणतीही खात्री देता येत नाही. कोणत्याही
प्रकारची जबाबदारी आगळं! वेगळं!!! वर रहाणार नाही याची नोंद घ्यावी.
आत्मक्लेश
बी बोल्ड; ईट ‘गोल्ड’!
>> सोने गडगडले,
पेट्रोलही एक रुपयाने स्वस्त; आली स्वस्ताई!
- बी बोल्ड; ईट ‘गोल्ड’!
>> आणखी वेळ द्या;
संजय दत्तची सुप्रिम कोर्टात याचिका
- सरेंडर के लिए भी 'तारीख पे तारीख'?
>> धर्मनिरपेक्षतेचे प्रमाणपत्र नको; भाजपने जद(यू) ला
सुनावले,
नव्या वादाला फुटले तोंड
- या वादात जनतेने आपलं तोंड फोडू नये म्हणजे झालं!
>> ना राजीनामा,
ना दिलगिरी अजित पवार सभागृहात परतले
- हा तो 'आत्मक्लेश' जाणावा!
गुगल रीडरसाठी पर्याय
गुगल रीडरसाठी पर्याय
गुगलने आपली गुगल रीडर ही सेवा १ जुलै २०१३ पासून बंद
करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे गुगल रीडर वापरणारांना आता रीडरसाठी दुसरा
पर्याय शोधावा लागणार आहे. रीडरसाठी इंटरनेटवर अनेक पर्याय उपलब्ध आहेत, त्यांपैकी काहींच्या लिंक्स खाली दिल्या आहेत.
जेव्हा तुम्ही नविन रीडर निवडताल, तेव्हा त्यामध्ये
तुमच्या पूर्वीच्या फीडस् चा डाटा इंपोर्ट करण्यासाठी, गुगल टेकआऊटची मदत घ्यावी
लागेल. गुगल टेकआऊटद्वारे बॅकअप कसा घ्यावा याची माहिती आपण येथे वाचू शकता.
आठ दिवसांनी माझ्या फीडचा डाटा इंपोर्ट झाला. तोपर्यंत मी फीडपैकी
काही लिंक +Add
A Subcription वर मॅन्युअली फीड करुन माझे काम सुरु ठेवले. सांगायचे
तात्पर्य हे की, झटपटच्या जमान्यात काही चांगल्या गोष्टी मिळण्यासाठी वेळप्रसंगी
प्रतिक्षा देखील करावी लागते.
ऑनलाईन जाहिरातींची वाढती लोकप्रियता
ऑनलाईन जाहिरातींची वाढती लोकप्रियता
ऑनलाईन जाहिरातींची बाजारपेठ मार्च पर्यंत २ हजार ९३८ कोटी
रुपयांवर जाण्याचा अंदाज इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडिया आणि आयएमआरबी
इंटरनॅशनल यांनी संयुक्तपणे प्रसिध्द केलेल्या एका अहवालात व्यक्त करण्यात आला
आहे.
ऑनलाईन जाहिरातीमध्ये डिस्प्ले, मोबाईल, सोशल मिडीया,
ई-मेल आणि व्हिडीओ जाहिरातींचा समावेश असून ही बाजारपेठ वार्षिक २० टक्के वाढीची
नोंद करीत यंदाच्या मार्चमध्ये २ हजार ६५० कोटी रुपयांवर गेली आहे; परंतु
अन्य सर्व इलेक्ट्रॉनिक गॅजेटस, सोशल मिडीया तसेच अन्य गोष्टींचा वाढता वापर
लक्षात घेता ही बाजारपेठ पुढील वर्षाच्या मार्च महिन्यात २,९३८ कोटी रुपयांवर
जाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या आर्थिक वर्षात ही बाजारपेठ १,७५०
कोटी रुपयांची होती.
>> वार्षिक २० टक्के वाढीची नोंद >> मार्चमध्ये गाठली २२६० कोटी रुपयांची पातळी>> मोबाईलवरील जाहिरातीत दुप्पट वाढसहज इंटरनेटची उपलब्धता, वेगवेगळ्या गरजांमुळे मोबाइलचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे मोबाईल जाहिरातींवरील खर्च त्यानुसार वाढला आहे. २०११-१२ या वर्षातील११५ कोटी रुपयांच्या खर्चात दुपटीने वाढ होऊन तो नुकताच संपलेल्या आर्थिक वर्षात २३० कोटी रुपयांवर गेला आहे. मोबाइल फोन्स आणि टॅब्लेटवरील जाहिरात खर्चाचे प्रमाण ७ टक्क्यांवरुन (२०११-१२) १० टक्क्यांवर (२०१२-१३) झाले.
येत्या चार वर्षाच्या कालावधीत ऑनलाईन जाहिरातींची बाजारपेठ
सरासरी ४० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. गेल्या आर्थिक वर्षात ऑनलाईन
जाहिरातीमध्ये सर्च आणि डिस्प्ले जाहिरातींचा वाटा सर्वाधिक होता; परंतु
२०१२-१३ आर्थिक वर्षात हा वाटा मोबाईल, सोशल आणि व्हिडिओ जाहिरातींच्या चढत्या
आलेखाप्रमाणे घटला असल्याचे दिसून आले आहे.
संदर्भ : दै. दिव्यमराठी
या बातमीवरुन ऑनलाईन जाहिरातींची वाढती लोकप्रियता व
वेगाने विस्तारीत होत जाणाऱ्या ऑनलाईन जाहिरात क्षेत्राची कल्पना यावी. या
प्रगतीमध्ये ऑनलाईन जाहिराती प्रदर्शित करणाऱ्या ब्लॉग्सचा सहभाग विशेष लक्षणीय व उल्लेखनीय आहे.
HTML CODE चे टेस्टिंग कसे करावे?
अनेक वेळा असा प्रसंग येतो की, आपल्या ब्लॉगवर एखादे नविन विजेट
जोडताना, त्यामध्ये काही किरकोळ बदल करावे लागतात. उदा. आपल्या ब्लॉगचे नांव,
आपल्या ब्लॉगची लिंक किंवा आपल्या Twitter, Facebook, Google+ इ.
सोशल साईटच्या लिंक्स आणि आपल्या ब्लॉगचे RSS Feed लिंक,
किंवा इतर काही मजकूर इत्यादी इत्यादी.
मग मूळ विजेटच्या HTML कोडमध्ये आपण केलेले बदल
हे बरोबर झालेले आहेत की नाहीत? याची खात्री ते विजेट आपल्या
ब्लॉगवर जोडण्याआधी आपण करुन घेणे आवश्यक ठरते. त्यासाठी एका सोप्या पध्दतीची माहिती
आज आपण येथे करुन घेणार आहोत.
HTML कोड टेस्ट करण्यासाठी या साईटवर जा. तेथील बॉक्समध्ये तुम्ही बदल केलेला HTML विजेट कोड कॉपी करुन पेस्ट करा आणि Test The HTML Code या बटणावर क्लिक करा. त्यानंतर एका नविन उघडलेल्या विंडोमध्ये तुमच्या
कोडचा टेस्ट रिझल्ट म्हणजे ते विजेट कसे दिसणार त्याचा प्रिव्ह्यू प्रदर्शित होईल.
आता यातील तुम्ही बदल केलेल्या लिंक्सवर माऊसचा कर्सर नेऊन किंवा क्लिक करुन
कोडमध्ये तुम्ही केलेले बदल अचूक आहेत याची तुम्ही खात्री करुन घेऊ शकता.
Clear Text Box या बटणावर क्लिक करुन तुमचा सध्याचा कोड क्लिअर करुन
पुन्हा दुसरा कोड त्या बॉक्समध्ये कॉपी पेस्ट करु शकता.
आणि मग हे अचूक बदल केलेले विजेट तुमच्या ब्लॉगवर लावण्यात
आता तुम्हाला काहीच अडचण येणार नाही.






.jpg)








