June 2011 | आगळं! वेगळं !!!

टाईम

=> मी दुबळा नाही : पंतप्रधान मनमोहनसिंग 'रामलीला' वरील कारवाईवरून ते तुमच्या लक्षात आलं असेलच!...

वन्समोअर!

=> सरकारने योगगुरूंना उघडे पाडले : कपिल सिब्बल ते आधीच उघडे आहेत...

नाईलाज

=> न लढताच हरले मुंडे; सुषमा स्वराज यांच्याशी चर्चेनंतर पक्षातच राहणार असल्याची घोषणा कॉंग्रेसने केली 'कोंडी' आणि मुंडेंची उडाली 'दांडी'...

च्युईंग गम!

=> मुंडे चालती कॉंग्रेसची वाट, प्रदेश कॉंग्रेसचा धरुनिया हात मुंडेंनी 'पाहिली' वाट, पण पक्षाने 'लावली' वाट ...

खास मनोरंजक कार्यक्रम

=> मुंडेंना देण्यासारखे 'राष्ट्रवादी'कडे काहीच नाही : शरद पवार त्यांच्याकडून घेण्यासारखे काही असेल तर पहावे लागेल...

खास फॉर्मुला

=> हे तर जोकपाल विधेयक; अण्णा व सहकाऱ्यांची टीका समितीतले 'लोक' ही आता करायला लागले 'जोक'...

काडीमोड

=> राज्यात मुंडेंसाठी राजकीय 'स्पेस' नाही; हा संघर्ष भाजपला महागात पडणारा : अण्णा डांगे मुंडेंच्या 'साईज'ची 'स्पेस' हुडकण्यासाठी डांगेंची केवढी ही 'पायपीट'...

सुदृढतेचं लक्षण!

=> संरक्षण खात्यातूनही 'आदर्श'शी संबंधित कागदपत्रे गायब; संरक्षण खात्याच्या वकिलाची आयोगापुढे माहिती आम्ही देशाचे संरक्षण करतो, कागदपत्रांचे नाही...

निवडून न आलेले हुकूमशहा

=> ओबीसी कनेक्शन; मुंडेंनी आजमावले (भुज)बळ गडकरी, पाहतायत ना तुम्ही आमची गळाभेट?...

मंत्रालयातील उंदीरमामा

=> कारवाईशिवाय पर्यायाच नव्हता; पोलीस कारवाईबाबत पंतप्रधानांचे प्रथमच वक्तव्य तुम्हाला म्हणून सांगतो, कारवाई केली नसती तर आमचंच काही खरं नव्हतं ब...

रामदेवाबांचे आंदोलन वेगवेगळ्या दृष्टिकोनातून

लोकशाहीचा खून अखेर रामदेवबाबांना अटक करून त्यांचे आंदोलन चिरडण्यात सरकार यशस्वी झाले. लोकशाहीचा उदोउदो करणाऱ्या कोंग्रेस सरकारला लोकशाहीचाच खून पाडण्याचे आदेश देताना जराही लाज वाटली नाही. मध्यरात्री उशिरा सगळा देश आणि मिडिया झोपेत असताना दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली. अर्थातच दिल्ली पोलिसांनी ही कारवाई स्वतः केली असे म्हणणे हास्यास्पद ठरेल. बराच...

राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकारण कोणत्या दिशेने चालले आहे

अजित पवार यांनी कोणताही संदर्भ नसताना अचानकपणे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर केलेली टीका, आणि राष्ट्रवादीने काहीही कारण नसताना केलेली दादर स्टेशनच्या नामांतराची मागणी या दोन्ही गोष्टी साहजिक वाटत असल्या तरी या दोन्ही गोष्टी सहजपणे घडलेल्या नाहीत, तर त्या राष्ट्रवादीच्या कूटनीतीचा एक भाग आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अचानक आणि...

बॉलीवूडचा नवा मंत्र

=> योगगुरू रामदेवबाबा हे तर संन्यासी नसून उद्योगपती आहेत : कॉंग्रेस सरचिटणीस दिग्विजयसिंह कॉंग्रेस पक्षात दिग्विजयसिंह हे एकमेव 'साक्षात्कारी' सरचिटणीस आहेत...

'रामलीला'

=> धान्यापासून मद्यनिर्मिती बंद! आरारा! सगळाच घोटाळा झाला की, 'प्यायला' मिळाल्याशिवाय धान्य 'खायचं' क...