अण्णांचे आंदोलन भरकटणार तर नाही? | आगळं! वेगळं !!!

अण्णांचे आंदोलन भरकटणार तर नाही?

सोळा ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या अण्णांच्या उपोषणाची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे. आणि विविध प्रसारमाध्यमातून आपण ती पहात आहोत. या सर्व चर्चेतून वारंवार अण्णांचे हे आंदोलन 'भरकट'णार तर नाही ना? अशी भीती व्यक्त केली जात आहे. या चर्चेत सहभागी होणारी तज्ञ, विचारवंत मंडळी हे आंदोलन चुकीच्या मार्गाने जाऊ नये अशी अपेक्षा व्यक्त करताहेत.



अण्णांचे हे आंदोलन म्हणजे प्रातिनिधिक असून त्यातून लोकांच्या मनात सरकारविरोधी असलेला असंतोष व्यक्त होत आहे हे सर्वच तज्ञ मान्य करत आहेत. मात्र अण्णांच्या आंदोलनाची दिशा काय असावी? ते भरकटू नये यासाठी कोणत्या मार्गाने ते जायला हवे याबाबत कुणीही बोलायला तयार नाहीत.

अण्णांच्याही मसुद्यात अनेक त्रुटी आहेत आणि काही अव्यवहार्य आहेत असे सांगत एका कार्यक्रमात तर एका जेष्ठ पत्रकाराने, सरकारने अण्णांच्या टीमचा जनलोकपालचा मसुदा जसा आहे तसा संसदेत मांडावा आणि प्रत्येक पक्षाने आपल्या खासदारांना कोणताही 'व्हीप' जारी करु नये, असे केले तर अण्णांच्या टीमचा मसुदा असलेले हे विधेयक शंभर टक्के फेटाळले जाईल असा विश्वास व्यक्त केला. अशी उलटसुलट, साधकबाधक चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे.

अण्णांच्या या आंदोलनाला संपूर्ण देशातून प्रचंड प्रमाणात पाठींबा मिळत आहे हे जरी खरे असले तरीही अण्णा आणि टीमने हे आंदोलन 'भरकटू' नये ही विचारवंतानी व्यक्त केलेली अपेक्षा, आणि सर्वसामान्य जनतेनेतूनही व्यक्त होत असलेली अपेक्षा लक्षात घेणे आवश्यक आहे. आणि थोर तज्ञ व विचारवंतानी याबाबत आपले विचार नेमकेपणाने व्यक्त करावेत.

1 Comments:

  1. जादा पोलिस नेमून कायदा सुव्यवस्था सुधारू शकत नाही. त्यादृष्ठीने अण्णांचे आंदोलन कधीच मार्गावर नव्हते

    ReplyDelete