2014 | आगळं! वेगळं !!!

अॅन्ड्रॉईड फोनवरील इंटरनेट वापरात बचत शक्य

मर्यादित वापर करुनही अॅन्ड्रॉईड फोनवरील इंटरनेट पॅक लवकर संपतो अशी बऱ्याच जणांनी तक्रार असते. त्यात काही प्रमाणात तथ्यही आहे. कारण जेव्हा आपण फोन इंटरनेटला कनेक्ट करतो, तेव्हा फोनमधील बरीचशी अॅल्पीकेशन्स आपल्या नजरेस न येता, आपल्या अपरोक्ष इंटरनेटचा वापर करुन त्यांच्या...

गुगल अॅडसेन्स आता हिंदी भाषेसाठीही

गुगल अॅडसेन्समध्ये आता हिंदी भाषेसाठी अच्छे दिन आ गये है असं म्हणायला हरकत नाही. हिंदी भाषेतून ब्लॉग लिहणाऱ्या ब्लॉगर्सनी केलेल्या प्रयत्नांना (जर त्यांनी काही प्रयत्न केले असतील तर, कारण त्यांनी काय प्रयत्न केले, कधी केले, कुठे केले याबाबत माहिती उपलब्ध नाही)...

व्हॉटसअॅप ग्रुपमधे पोस्ट केलेला मेसेज कोणी कोणी वाचला?

व्हॉटसअॅप वापरणारे जवळपास सर्वजण आपापल्या आवडीनुसार कोणत्या ना कोणत्या ग्रुपचे सदस्य असतात. आणि ते ग्रुपमधे आपलेही मेसेज पोस्ट करत असतात, पण त्यांनी पोस्ट केलेले मेसेज ग्रुपमधे कोणी वाचले की नाही हे मात्र समजत नाही. पण आता व्हॉटसअॅप ग्रुपमधे तुम्ही जेव्हा काही मेसेज पाठवाल...

सर्व ईमेल खात्यासाठी एकच अॅप

सध्याच्या काळात बहुतांश लोकांची जीमेल, याहू, आऊटलूक इत्यादी विविध सर्व्हिस प्रोव्हायडर्सची ईमेल अकाऊंटस् असतात. त्यांचा अॅन्ड्रॉईड स्मार्टफोनवर वापर करताना आत्तापर्यंत स्मार्टफोनधारकांना गुगलच्या ईमेल अकाऊंटसाठी Gmail आणि याहू, आऊटलूक यासारख्या इतर ईमेल्सच्या अकाऊंटसाठी Email...

लाल दिव्यांची स्वप्ने

होय नाहीच्या गोंधळात उरकला आहे एक टप्पा चर्चेपुरत्याच उरल्या आहेत आता नैतिकतेच्या गप्पा इकडे सगळ्या चॅनेल्सवर चर्चेवर चर्चा घडत आहेत तिकडे मात्र प्रत्येकाला लाल दिव्यांची स्वप्ने पडत आहे...

मराठी सचिनचे इंग्रजी आत्मकथन

सचिनच्या प्लेईंग इट माय वे या आत्मकथनाच्या इंग्रजी पुस्तकाचे काही भारतीय भाषांसोबत मराठीतही भाषांतर प्रकाशित करण्याचा निर्णय प्रकाशकांनी घेतला आहे. एका दृष्टीने मराठी भाषिकांवर हा एक प्रकारे उपकारच झाला म्हणायचा. मराठी मातीत जन्मलेल्या, माय मराठी भाषा बोलत मोठा झालेल्या...

एमआयएम पक्षावर बंदी घालावी का?

ओवेसीच्या एमआयएम पक्षावर बंदी घालावी का? ही मागणी सध्या मिडीयातून चर्चेत आहे. चिथावणीखोर, प्रक्षोभक व जातीयवाद भडकवणारी भाषणे ही या पक्ष्याची ओळख आहे. असे असूनही, या पक्षावर कडक कारवाई करण्याविषयीचे ठोस धोरण आजवर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने न स्विकारल्यामुळे, त्यांनीच...

निवडणूका म्हणजे ...

निवडणूका म्हणजे ... पक्षात सन्मानाने वागविले जात नसल्याचा अचानकपणे साक्षात्कार होण्याचा, निवडणूकांची संधी साधत पक्षांतर करण्याचा काळ विरोधकांनी दिशाभूल केली हे पटवून देण्याचा प्रयत्न करत विकासाच्या आठवणीने गळे काढण्याचा काळ एकाला हात, तर दुसऱ्याला लाथ देत गरळ ओकण्याचा, मुखवटे...

हा महाराष्ट्र माझा!

=> युती तोडणाऱ्यांना भांडी घासायला लाऊ -संजय राऊत म्हणजे पुन्हा भांड्याला भांडे लागणारच => मोदींनी केंद्राचे पहावे, महाराष्ट्राचे आम्ही बघून घेऊ -राज ठाकरे आम्ही एकदा वाटणी केली म्हणजे केली, मतदार मंडळी तेल लावीत गेली => फक्त खर्च वाढला, सिंचन झालेच नाही -पृथ्वीराज चव्हाण खर्चात पुढे आहे, हा महाराष्ट्र माझा! => रिकामे जहाज...

व्हॉटॅन आयड्या सर्जी!

स्थळ : बारमधला एक निवांत कोपरा वेळ : निवडणूकीतल्या रात्रीची चार-पाच विविध पक्षांचे कार्यकर्ते बारमध्ये एकाच टेबलवर बसून घोटासह चकण्याचा मजा घेत गप्पा मारण्यात मग्न. पहिला : काय बी म्हना राव, पन ह्या येळला आपलं तर डोस्कचं चालना झालयं. दुसरा : कशामुळं? तिसरा : आरं कशामुळं म्हून...

मनसेची ब्लूप्रिंट

मनसेची बहुचर्चित ब्लूप्रिंट राज ठाकरेंनी अखेर सादर केली. त्याच दिवशी नेमके महाराष्ट्रात युती आणि आघाडींच्या फूटीचे राजकीय भूकंप झाल्यामुळे त्याच बातम्यांना अधिकाधिक कव्हरेज मिळाले. साहजिकच अनेंकांचे या ब्लूप्रिंटकडे दुर्लक्ष झाले. नियोजनपूर्वक जुळविलेले टायमिंग आयत्यावेळी चुकले...

संतशिरोमणी श्री नामदेव महाराजांचे चरणी विनम्र अभिवादन!

नाचू कीर्तनाचे रंगी  ज्ञानदीप लाऊ जगी असा भक्तिचा संदेश देत भागवत धर्माची पताका संपूर्ण भारतभर फडकविण्याचे अलौकिक कार्य करणाऱ्या संतशिरोमणी श्री नामदेव महाराजांची आज पुण्यतिथी. त्यानिमित्त संतशिरोमणी श्री नामदेव महाराजांचे चरणी विनम्र अभिवादन!  ...

पक्षनिष्ठ की सत्तानिष्ठ

पक्षनिष्ठ की सत्तानिष्ठ सोळाव्या लोकसभेसाठी 2014 ची सार्वत्रिक निवडणूक एकदाची पार पडली. ही निवडणूक बऱ्याच कारणांनी सर्वांच्या लक्षात रहाणारी ठरली आहे. निवडणूकीचा हा अंक संपला, आणि आता सुरू झाला आहे, तो आत्मपरिक्षणाचा आणि चिंतनाचा अंक. या अंकातील प्रसंग चांगलेच मनोरंजक होणार...

पॉलिटिका ई-पुस्तकावरील प्रतिक्रिया

पॉलिटिका ई-पुस्तकावरील प्रतिक्रिया माझे ई-पुस्तक पॉलिटिका गुढीपाडवा दि.31.03.2014 या दिवशी प्रसिध्द झाल्यानंतर काही वाचकांनी त्यावर दिलेल्या प्रतिक्रिया येथे दिल्या आहेत. ज्या वाचकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत, त्यांचेही आभार आणि ज्या वाचकांनी दिलेल्या नाहीत त्यांचेही आभार....

उत्सव लोकशाहीचा

उत्सव लोकशाहीचा आधी जाणार मतदानाला मगच लागणार कामाला संकल्प मनाशी करुया मतदानाचा हक्क बजवून लोकशाहीचा उत्सव मनवूया प्रचंड मतदान करुन जिल्ह्याच्या नांवावर नवा विक्रम घडवूय...

ई-साहित्य प्रतिष्ठान : एक चळवळ

ई-साहित्य प्रतिष्ठान : एक चळवळ मराठी भाषेतील साहित्यासाठी काही तरी केले पाहिजे या एका विचाराने झपाटलेली, आणि मराठी साहित्यावर प्रेम करणारी काही मंडळी सुमारे पाच वर्षापूर्वी एकत्र आली. मग सुरु झाले विचारमंथन, विचारांना दिशा मिळाली आणि त्यातूनच जन्म झाला एका चळवळीचा. आणि बघता...

नळावरची भांडणे

नळावरची भांडणे शिवीगाळ करत रोजच लफडी बाहेर काढली जात असतात सार्वजनिक नळावरची भांडणे आता उमेदवारांचा प्रचार करत असता...

दिल्लीची किल्ली

दिल्लीची किल्ली गल्लीतून दिल्लीत गेल्याची स्वप्ने हल्ली रोजच पडायला लागली पण सूज्ञ मतदारांच्या हाती दिसणारी किल्ली बघून झोप ऊडायला लागली...

तुमचा हात आमचे श्रीमुख

तुमचा हात आमचे श्रीमुख तुम्ही आमआदमी मी पक्षप्रमुख भेटण्यासाठी नाही सुरक्षेचे हूक केली असेल जर मी काही चूक तर तुमचा हात, आमचे श्रीमु...

व्होट शिफ्टींग

व्होट शिफ्टींग ‘हार्ड’ वाटणारे प्रॉब्लेम्स सुध्दा आम्ही एकदम ‘सॉफ्ट’ करतो तुम्ही कुणालाही ‘व्होट गिफ्ट’ करा आम्ही पाहिजे तिकडे ‘शिफ्ट’ करत...

अंनिसने यांनाही आव्हान द्यावे

अंनिसने यांनाही आव्हान द्यावे लोकसभा निवडणूक 2014 च्या पार्श्वभूमीवर काही ज्योतिष्य तज्ञांनी, नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत असे भाकित केले आहे. त्यामुळे ज्योतिष्यशास्त्राने केलेला हा दावा सध्या चर्चेत आहे. अशातच अंधश्रध्दा निर्मूलन समितीने म्हणजेच अंनिसने ज्योतिष्यशास्त्राला...

आमचीच नाती अन् आमचीच माती

आमचीच नाती अन् आमचीच माती एकाच्या कपाळी दगड तर दुसऱ्याच्या डोक्यात बाटली कशाला चर्चा, दोष कोणाचा किती आमचीच नाती अन् आमचीच मात...

डाऊनलोड करा पॉलिटिका ई-पुस्तक

डाऊनलोड करा पॉलिटिका ई-पुस्तक माझे ई-पुस्तक पॉलिटिका गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रकाशित झाले. बऱ्याच दिवसांपासून वात्रटिकांचे ई-पुस्तक काढावे अशी कल्पना मनात होती. ती कल्पना या निमित्ताने साकार झाली. या पुस्तकाचे लेखन, प्रकाशन, टाईपसेटींग, रचना, मुखपृष्ठ अश्या सर्व जबाबदाऱ्या...

लोकसभेची रणभूमी

लोकसभेची रणभूमी आमनेसामने उभ्या ठाकलेल्या सेना एकमेकांना ललकारायला लागल्या शत्रूवर आक्रमण करण्याऐवजी आपसांतच लढायला लागल्य...

रागरंग

रागरंग पेपरबाण मारुनी मागता काय टाळी अन पुसता काय औकात आता होईल सगळी इच्छा पुरी जाहिर सभेत अन भर चौका...