एमआयएम पक्षावर बंदी घालावी का? | आगळं! वेगळं !!!

एमआयएम पक्षावर बंदी घालावी का?


ओवेसीच्या एमआयएम पक्षावर बंदी घालावी का? ही मागणी सध्या मिडीयातून चर्चेत आहे. चिथावणीखोर, प्रक्षोभक व जातीयवाद भडकवणारी भाषणे ही या पक्ष्याची ओळख आहे. असे असूनही, या पक्षावर कडक कारवाई करण्याविषयीचे ठोस धोरण आजवर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने न स्विकारल्यामुळे, त्यांनीच अप्रत्यक्षपणे या पक्षाला खतपाणी घातल्याचे स्पष्ट होते. एमआयएमच्या भाषणामुळे मुस्लीम मते हिंदुत्ववादी पक्षांना मिळण्याऐवजी आपल्याला मिळतील असा हेतू त्यामागे असावा. पण तो हेतू सफल न होता, मुस्लीम मतदार काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापासून दूरावला गेला, आणि त्यांची पारंपारिक मतेही थेट एमआयएम पक्षाकडे गेली.

त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला आता तो पक्ष जातियवादी आहे याचा साक्षात्कार झाला, आणि त्यातून ही मागणी पुढे आली असावी. राज ठाकरे, प्रवीण तोगडीया यांच्यासारख्या नेत्यांना प्रवेशबंदी, भाषणबंदी किंवा काय भाषण करावे व करु नये याविषयी बंधने घातली जातात हे आपण आजपर्यंत पहात आहोत, मात्र ओवेसींना यासारखे कायदे नियम लागू केले जात नाहीत. मुस्लीमांचे लांगूलचालन म्हणजे धर्मनिरपेक्षता अशी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या मते धर्मनिरपेक्षतेची व्याख्या असावी.

याचसोबत हिंदूत्ववादी संघटनाही डावपेचात कमी पडत आहेत असे दिसते. याचे कारण असे की, राज ठाकरे, प्रविण तोगडीया इत्यादी नेत्यांवर देशाच्या विविध प्रांतात स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये, कोर्टामध्ये तक्रारी, गुन्हे, दावे दाखल केले जातात त्यामागे पध्दतशीरपणे डावपेच आखले गेलेले असतात. देशाच्या विविध भागात कोर्टकचेऱ्यांच्या चकरा मारुन या नेत्यांना कसे जेरीस आणता येईल हा हेतू त्यामागे असतो. असे डावपेच आखण्याच्या कौशल्यचा अभाव हिंदूत्ववादी संघटनामध्ये दिसून येतो.

1 Comments:

  1. छान लिहिलंत. पण थोडं अधिक भाष्य करायला हवं होतं. मला ही या विषयावर लिहीयच आहे पण उद्धव ठाकरे डोकं वर काढू देईनात.

    ReplyDelete