Home » All posts
आता कुठे आहेत युवराज?
मंगळवार दि.९ ऑगस्ट २०११ रोजी म्हणजेच क्रांतीदिनी मावळ भागातील जलवाहिनीवरून एक्सप्रेस हायवेवर झालेल्या आंदोलनात पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार करत तीन आंदोलकांना टिपले. क्रांतिदिनाचे हे दुर्दैव म्हणायचे. या ठार झालेल्या आंदोलकांना सर्वप्रथम श्रध्दांजली!
भारताची 'पत'ही धोक्यात
=> अमेरिकेला सर्दी, जगाला शिंका; सर्व शेअर बाजार आपटले; भारतात पाच कोटींचा फटका
- अखेर अमेरिका 'गारठली'
'कॅग'चा अहवाल संसदेत सादर
=> संसदेला तुमची गरज नाही; दिल्ली उच्च न्यायालयाचा कलमाडींना दणका, १ लाखाचा दंड
- पण मला संसदेची आहे ना...
अण्णांचे आंदोलन भरकटणार तर नाही?
सोळा ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या अण्णांच्या उपोषणाची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे. आणि विविध प्रसारमाध्यमातून आपण ती पहात आहोत. या सर्व चर्चेतून वारंवार अण्णांचे हे आंदोलन 'भरकट'णार तर नाही ना? अशी भीती व्यक्त केली जात आहे. या चर्चेत सहभागी होणारी तज्ञ, विचारवंत मंडळी हे आंदोलन चुकीच्या मार्गाने जाऊ नये अशी अपेक्षा व्यक्त करताहेत.
रुतला विकासाचा गाडा
=> अधिवेशनापूर्वीच खडाजंगी, भ्रष्टाचाराबाबत पंतप्रधान आक्रमक
- कुणाच्या भ्रष्टाचाराबाबत? भाजपच्या...?
नारळाची बर्फी
=> पाक परराष्ट्रमंत्री हीना रब्बानी खार प्रसारमाध्यमांच्या 'फॅशन आयकॉन' म्हणून केलेल्या उल्लेखामुळे अस्वस्थ
- हाय रब्बा! हिंदुस्थान में मैं क्या करने आई थी, यह भी मुझे नही याद आ रहा है
संतशिरोमणी श्री नामदेव महाराज यांचे चरणी विनम्र अभिवादन!
नाचू कीर्तनाचे रंगी
ज्ञानदीप लाऊ जगी
ज्ञानदीप लाऊ जगी
असा भक्तिचा संदेश देत भागवत धर्माची पताका संपूर्ण भारतभर फडकविण्याचे अलौकिक कार्य करणाऱ्या संतशिरोमणी श्री नामदेव महाराजांची आज (आषाढ कृष्ण १४) ६६१ वी पुण्यतिथी. त्यानिमित्त संतशिरोमणी श्री नामदेव महाराजांचे चरणी विनम्र अभिवादन!
इतरवेळी संतशिरोमणी श्री नामदेव महाराजांच्या साहित्यातील उतारे, अभंग रचना विविध प्रसंगी आपल्या लेखात उधृत करणाऱ्या 'प्रिंट मिडीयाला' दरवर्षी या पुण्यतिथीचा विसर पडतो, हे दुर्दैव!
इतरवेळी संतशिरोमणी श्री नामदेव महाराजांच्या साहित्यातील उतारे, अभंग रचना विविध प्रसंगी आपल्या लेखात उधृत करणाऱ्या 'प्रिंट मिडीयाला' दरवर्षी या पुण्यतिथीचा विसर पडतो, हे दुर्दैव!
ऑफ सिझन डिस्काऊंट
=> भ्रष्टाचाराच्या खाणीत येडीयुरप्पा; लोकायुक्तांच्या अहवालात ठपका
- भ्रष्टाचार के इस सफर में, तू अकेला ही नहीं है, हम भी तेरे हमसफर हैं...
'अर्धे' भारतीय
=> मुंबई बॉम्बस्फोट तपासाबाबत स्कॉटलंड यार्डची मदत घेणार : मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
- फक्त दिग्विजयसिंह याचीच मदत पुरेशी होईल
काँगेसचा दिग्गीराजा तो 'बाब्या'
काँगेस पक्षाचे सरचिटणीस दिग्विजयसिंह उर्फ दिग्गीराजा पुन्हा बरळले. अर्थातच ते नेहमीप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आपला निशाना बनविण्यास चुकले नाहीत. त्यांचीही मजबुरी असेल कदाचित्! हायकमांडला खुश करण्यासाठी काय काय करावे लागते, त्याचा समृद्ध अनुभव त्यांच्या पाठीशी आणि गाठीशी आहेच.

