गरम गरम बीजेपी | आगळं! वेगळं !!!

गरम गरम बीजेपी

नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतील हा घडलेला किस्सा. या निवडणुकीच्या वार्तसंकालानासाठी एका खेड्यात जाण्याचा प्रसंग आला होता. दुपारची वेळ होती. चहा घेण्यासाठी म्हणून गावाबाहेरील रोडवर असलेल्या हॉटेलात बसलो होतो. दिलेल्या ऑर्डरचा चहा येण्याची वाट पहात होतो,
इतक्यात एका उमेदवाराचा प्रचार करणारी जीप तेथे येऊन थांबली. त्यातून धुळीने माखलेले कार्यकर्ते खाली उतरले, भरपूर भूक लागलेली आहे हे त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होते. मंडळींनी भराभरा हात तोंडे धूऊन घेतली आणि एका टेबलाभोवती गोळा होऊन बसले. त्यांचात काय चर्चा होईल ती ऐकावी म्हणून मी ही कान टवकारले. त्यांचातील म्होरक्याने वेटरला हाक मारून बोलवले, आणि त्यांच्यात घडलेल्या संवादातून मला नवीनच गोष्ट ऐकायला मिळाली ती अशी :
म्होरक्या : ऐ, सांग बाबा लवकर, काय गरम है ते.
वेटर : पुरीभाजी, वडा, बीजेपी काय देऊ बोला.
म्होरक्या : ऐ शान्या, आर आमी तुला हाटीलातलं गरम काय ते इचारलयं, राजकारणातलं न्हाई. तू आमाला शिकऊ नगस कांग्रीस गरम का बीजेपी गरम ते. आमी रोजच करतोय ते राजकारन.
वेटर : अवो मालक, चिडू नगा, म्या बी तुमाला हाटीलातलंच गरम सांगितलयं.आमा गरिबाला काय करायचयं वो तुमच राजकारन.
म्होरक्या : आर बेन्या, तुज्या हाटीलात कुटनं आली रं गरम बीजेपी?
वेटर : मालक, आमी, भजे-पावाला शार्टकटमदी बीजेपी म्हंतो बगा.

0 Comments:

Post a Comment