डोमेन नेम विकत घेताना...भाग १ | आगळं! वेगळं !!!

डोमेन नेम विकत घेताना...भाग १

हल्ली कशाकशाचा सेल सुरु असेल ते सांगता येत नाही, कारण सध्या डोमेन नेम्सचा ही सेल सुरु आहे. अगदी ९९ रुपया पासून तुम्हाला या सेलमध्ये .in, .co.in अशा प्रकारची डोमेन नेम्स उपलब्ध होतील. त्यामुळे साहजिकच फक्त शंभर रुपयात तर डोमेन नेम रजिस्ट्रेशन होतंय तर मग काय हरकत आहे. चला आपली स्वतःची एक वेबसाईट चालू करून टाकू किंवा आपल्या ब्लॉगसाठी एक डोमेन नेम घेऊन टाकू असे विचार मनात डोकावणे साहजिकच आहेत.



पण तसे करण्याआधी थोडासा विचार करणेही तितकच गरजेचे आहे. सेलमध्ये दाखविलेली डोमेन नेमची किमान आकर्षक किंमत ही पहिल्या एका वर्षासाठीच असते, हे सर्वप्रथम येथे लक्षात घ्यायला हवे. पुन्हा दरवर्षी ते डोमेन नेम रिन्युअल करण्यासाठी किती रुपये दयावे लागणार आहेत हे आधी तपासून पहावे. नाही तर 'घी देखा लेकिन बडगा नही देखा' अशी वेळ येऊ शकते.

उदाहरण पहायचे झाल्यास सध्या .in हे डोमेन नेम रु.९९ इतक्या स्वस्तात मिळत आहे. पण याच्या दरवर्षीची रिन्युअलची फी आहे रु.६५० ते ८०० इतकी. जर आपण या गोष्टीकडे आधीच लक्ष दिले नाही तर आत्ता शंभर रुपयात मिळालेले हे डोमेन नेम पुन्हा किती महाग पडू शकते याची कल्पना पुन्हा ते रिन्युअल करतेवेळीच येईल.

याउलट .com या डोमेन नेमसाठी सध्या ४५० रुपये (सेलमध्ये) मोजावे लागत असल्यामुळे ते आत्ता इतर डोमेनपेक्षा जरी महाग वाटत असले तरी ते दरवर्षी रिन्युअल करताना साधारणतः रु.४५० ते ५०० इतकीच रिन्युअल फी त्यासाठी मोजावी लागते. म्हणजेच जे स्वस्त वाटते ते महाग आणि जे महाग वाटते ते स्वस्त पडते हे यावरून लक्षात येईल.

यासंदर्भात आणखी काय काळजी घ्यावी हे आपण डोमेन नेम विकत घेताना...भाग २ मध्ये पहाणार आहोत.

1 Comments: