आगळं! वेगळं !!!
Showing posts with label ब्लॉग टिप्स. Show all posts
Showing posts with label ब्लॉग टिप्स. Show all posts

गुगल अॅडसेन्स आता हिंदी भाषेसाठीहीगुगल अॅडसेन्समध्ये आता हिंदी भाषेसाठी अच्छे दिन आ गये है असं म्हणायला हरकत नाही. हिंदी भाषेतून ब्लॉग लिहणाऱ्या ब्लॉगर्सनी केलेल्या प्रयत्नांना (जर त्यांनी काही प्रयत्न केले असतील तर, कारण त्यांनी काय प्रयत्न केले, कधी केले, कुठे केले याबाबत माहिती उपलब्ध नाही) यश आले आणि गुगल अॅडसेन्स आता हिंदी भाषेसाठी उपलब्ध झाले आहे. गुगल लँग्वेज सपोर्ट या लिंकवर हिंदी भाषेचा समावेश केलेला पाहता येईल. 

आत्तापर्यंत जे हिंदी भाषिक ब्लॉगर्स पदरमोड करुन ब्लॉग लिहीत होते, किंवा त्यांना त्यासाठी उत्पन्नाचा स्त्रोत उपलब्ध नव्हता, त्यांना आता ही एक चांगली संधी उत्पन्न झाली आहे. 

पण यामुळे एक झाले की, आता हिंदी भाषिक ब्लॉगर्सना ब्लॉगद्वारे गुगल अॅडसेन्सच्या माध्यमातून अर्थार्जन करण्यासाठी अधिक परिश्रम घेऊन चांगले लिखाण करावे लागेल आणि त्याचसोबत ब्लॉगच्या ट्रॅफिकवरही लक्ष ठेवावे लागेल.  आता सर्वप्रथम कोणत्या हिंदी ब्लॉगला गुगल अॅडसेन्सच्या जाहिराती दाखविण्याचा मान मिळणार आहे हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. 

हिंदी भाषिक ब्लॉगर्सना याबद्दल शुभेच्छा देतानाच, मराठी भाषिक ब्लॉगर्सच्या मनात गुगल अॅडसेन्समध्ये आपल्या मराठीला अच्छे दिन कधी येतील असा विचार नक्कीच येत असेल.

ऑनलाईन पैसे कमवा<A title="ऑनलाईन पैसे कमवा-आगळं! वेगळं!!!" href="http://nathtel.blogspot.com/">
प्रत्येकाला इंटरनेटवर वेळ घालविताना त्याच्या जोडीला ऑनलाईन पैसे कमविण्याची इच्छा असते. त्यासाठी अनेक मार्गही आहेत. पैसा लाईव्ह हा एक त्यापैकी आहे. आपणांपैकी पुष्कळ लोकांकडे पैसा लाईव्हचे अकाउंट असेलसुध्दा. काही लोकांची अशीही समजूत असू शकेल की, पैसा लाईव्ह ही फ्रॉड साईट आहे. पण त्या साईटवरील मेल वाचून आजपर्यंत बऱ्याच लोकांनी भरपूर पैसे कमविले आहेत. त्याची खात्री कंपनीच्या वेबसाईटवर कंपनीने नाव व तारखेसह लाभार्थी खातेधारकांना दिलेले चेक आणि कुरियर कंपनीच्या रिसीटच्या स्कॅन्ड कॉपीजचे पुरावे पाहून खात्री करुन घेता येईल.
<A title="ऑनलाईन पैसे कमवा-आगळं! वेगळं!!!" href="http://nathtel.blogspot.com/">

>> पैसा लाईव्हचे अकाउंट कसे काढायचे?

तुम्हालासुध्दा पैसा लाईव्हच्या माध्यमातून पैसे कमवायचे असतील तर, त्यासाठी सर्वप्रथम तुमचे पैसा लाईव्हवर अकाउंट असणे आवश्यक आहे. जर तुम्ही अजून अकाउंट काढले नसेल तर  येथे क्लिक करुन अकाउंट काढता येईल. तुमचे अकाउंट काढल्यावर तुमच्या खात्यावर लगेच रु.99/- जमा होतील. त्याचबरोबर तुम्ही जर तुमची आयडी लिंक मित्रामध्ये शेअर केली व त्यावरुन जर आणखीन अकाउंट सुरु झाले, तर त्या प्रत्येक अकाउंटसाठी रु.2/- प्रमाणे तुमच्या खात्यावर पैसे जमा होतील. म्हणजेच अकाउंट उघडल्यापासूनच पैसे तुमच्या खात्यात जमा होत रहाण्यास सुरुवात होईल.

>>  पैसा लाईव्हवर प्रत्यक्ष काय काम करावे लागते?

तुम्ही दररोज तुमच्या अकाउंटमध्ये लॉगीन होऊन इनबॉक्स मधील मेल चेक करुन वाचावे/पहावे लागतात. हे मेल वाचल्यावर प्रत्येक मेलमागे पंचेवीस पैश्यापासून ते पांच रुपयांपर्यंतची रक्कम तुमच्या खात्यात जमा होते. केवळ तुम्ही अकाउंटमध्ये लॉगीन झालात तरीदेखील दहा पैसे इंसेन्टीव्ह तुमच्या खात्यावर जमा होतो. हा इन्सेटीव्ह 24 तासांतून एकदाच मिळतो. पाचशे रुपयांपेक्षा अधिक रक्कम तुमच्या खात्यावर जमा झाल्यानंतर तुम्ही ती मिळण्यासाठी विनंती करु शकता, आणि व्हॅलीडेशन नंतर ती मान्य झाल्यानंतर पुढील महिन्याच्या 15 तारखेनंतर तुम्हाला रकमेचा चेक कुरिअरने अथवा रजि. पोस्टाने घरपोहोच मिळतो. किमान सात-आठशे रुपयांचा बॅलन्स खात्यावर जमा झाल्यावर रक्कम मिळण्यासाठी विनंती करावी.

>> दहा सेकंदांची ट्रीक


पण रोज प्रत्येक मेलवर क्लिक करुन वाचणे म्हणजे कंटाळवाणे आणि वेळखाऊ काम आहे. पण आता हेच काम मेल न वाचता आपोआप सुध्दा करता येईल. अनेक मेल चेक करण्याचे कंटाळवाणे आणि निरस काम फक्त दहा सेकंदात आपोआप चेक करुन तुमच्या खात्यात त्याची रक्कम झटपट जमा होण्यासाठी खाली सांगितलेल्या पध्दतीप्रमाणे प्रत्येक पायरीचा काळजीपूर्वक अवलंब करा.
तुम्ही जर गुगल क्रोम ब्राऊजर वापरत असताल तर टूल डाऊनलोड करु घेण्यासाठी येथे क्लिक करा.

तुम्ही जर फायरफॉक्स ब्राऊजर वापरत असाल तर, येथे क्लिककरुन टूल डाऊनलोड करावे लागेल.

हे टूल तुमच्या ब्राऊजरमध्ये अड झाल्यावर तुमचा ब्राऊजर रिस्टार्ट करा.

ब्राऊजरच्या ऊजव्या कोपऱ्यात एक आयकॉन दिसू लागेल.

<A title="ऑनलाईन पैसे कमवा-आगळं! वेगळं!!!" href="http://nathtel.blogspot.com/">

आता तुम्हाला इथे क्लिक करुन आणखीन एक फाईल डाऊनलोड करुन इन्स्टॉल करावी लागेल.

यानंतर तुमच्या अकाउंटमध्ये लॉगीन व्हा. इनबॉक्समध्ये जा. तेथे दिसत असलेले अनेक मेल वाचून तुम्हाला पैसे मिळणार आहेत, पण आता मात्र हे मेल वाचण्याची गरज नाही. इनबॉक्स उघडल्याबरोबर ब्राऊजरच्या उजव्या कोपऱ्यात एक बॉक्स दिसेल.

<A title="ऑनलाईन पैसे कमवा-आगळं! वेगळं!!!" href="http://nathtel.blogspot.com/">

त्यावरील Click Here To Start Checking Mail या संदेशावर क्लिक करा. आता दहा सेकंद थांबून F5 बटन दाबून वेबपेज रिलोड करा. वाचून झालेले मेल डिलीट झालेले असतील. व जर पुन्हा नविन ईमेल इनबॉक्समध्ये दिसत असतील तर पुन्हा Here To Start Checking Mail या संदेशावर क्लिक करा. अश्याप्रकारे सर्व अनरीड मेल वाचले जाऊन डिलीट होतील आणि त्याचे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील. ते तुम्ही My Earning वर क्लिक करुन बघू शकता. 
महत्वाची सूचना :

या ब्लॉगवरील माहितीचा उपयोग स्वतःचे जबाबदारीवर करावा. कोणत्याही साईटबद्दल कोणतीही खात्री देता येत नाही. कोणत्याही प्रकारची जबाबदारी आगळं! वेगळं!!! वर रहाणार नाही याची नोंद घ्यावी.

ब्लॉगचा बॅकअप : एक नविन पर्यायब्लॉगचा बॅकअप : एक नविन पर्याय


ब्लॉगरमध्ये ब्लॉगचा बॅकअप घेण्यासाठी Settings > Other > Export Blog असा एकमेव पर्याय सध्या उपलब्ध आहे. परंतु त्याद्वारे एकावेळेस केवळ एकच ब्लॉगचा बॅकअप आपण घेऊ शकतो. पण गुगलच्या फारश्या प्रसिध्द नसलेल्या Google Takeout या सुविधेद्वारे ब्लॉगचा बॅकअप घेण्याचा दुसरा एक पर्याय आता उपलब्ध झाला आहे.

गुगलच्या विविध सेवांचा उपयोग सर्वजण करतात. गुगलने विशेष प्रसिध्दी न करता, त्यांच्या उपयोगकर्त्यांना खात्याचा बॅकअप घेण्यासाठी Google Takeout या नावाने एक नविन सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

याद्वारे सुविघेद्वारे Google+1s, Blogger, Buzz, Contacts, Drive, Google+ Circles, Google+ Stream, Pages, Picasa Web Albums, Profile, Reader, You Tube इतक्या सेवांचा आपल्या निवडीनुसार डाटा डाऊनलोड करुन घेता येतो.


या सुविधेद्वारे एकापेक्षा अधिक ब्लॉग्जचा बॅकअप सुध्दा एकाच वेळेस घेता येण्याची सोय आहे. आणि तेही आकाराने लहान अशा Zip स्वरुपातील फाईलमध्ये.

Google Takeout चा उपयोग कसा करावा


त्यासाठी प्रथम आपण या लिंकवर क्लिक करा. त्या विंडोमधील Choose Services बटन क्लिक करा. नंतर समोर येणाऱ्या विंडोमध्ये विविध सेवांचे बटन्स दिसतील. त्यापैकी Blogger बटनावर क्लिक करा. नंतर एक बॉक्स समोर येईल, त्यामध्ये एकूण तुमच्या सर्व ब्लॉगच्या Estimated files Size दिसेल. तुम्हाला जर सर्वच ब्लॉग्लचा बॅकअप नको असेल तर, तेथेच दिसणाऱ्या Configure पर्यायावर क्लिक करा. तेथे Download a single blog पर्याय निवडून तुम्हाला पाहिजे तो ब्लॉग निवडा. त्यानंतर खाली दिसत असलेल्या Create Archive वर क्लिक करा. आणि डाऊनलोडसाठी तयार असलेली फाईल डाऊनलोड करुन घ्या. Zip स्वरुपात प्राप्त झालेल्या फोल्डरमध्ये Atom स्वरुपातील फाईल असेल.

याप्रकारे ब्लॉगचा डाटा तुमच्याजवळ सुरक्षित राहील, व प्रसंगानुसार या डाटामधून तुमच्या ब्लॉगमधील लेख Settings > Other > Import Blog पर्यायाने पुन्हा परत मिळविता येतील.

Backlink Signature - प्रतिक्रियेखालील सही


Backlink Signature - प्रतिक्रियेखालील सही


आपण जेव्हा कधी दुसऱ्या एखाद्या ब्लॉगवर प्रतिक्रिया नोंदविता, तेव्हा त्याखाली तुमच्या ब्लॉगची Backlink Signature सही त्याखाली करणे फायदेशीर ठरते. त्या लिंकवर क्लिक करणारे वाचक तुमच्या ब्लॉगवर येतात. म्हणजेच तुमच्या ब्लॉगच्या वाचकसंख्येत वाढ होण्यास मदतच होते.

ही सही (Backlink Signature)कशी करायची ते आता पाहू.
खाली दिलेला कोड कॉपी करुन नोटपॅडमध्ये पेस्ट करा.

<a href ='http://nathtel.blogspot.com/' title ='आगळं!वेगळं!!!-जरा हटके'> आगळं!वेगळं!!!</a>

  • यातील http://nathtel.blogspot.com/ लिंकऐवजी तुमच्या ब्लॉगची लिंक टाका. टायटल टॅगमध्ये आगळं!वेगळं!!!-जरा हटके ऐवजी तुमच्या ब्लॉगचे नांव टाका आणि त्यापुढे कॅचलाईन टाका.
  • आता ही नोटपॅड फाईल encoding UTF-8 या पर्यायाने सेव्ह करा.
आगळं!वेगळं!!! या लिंकवर माऊस नेल्यास कॅचलाईनसह नांव दिसते हे खालील उदाहरणावरुन लक्षात येईल.

आगळं!वेगळं!!!

तुम्ही जेव्हा कधी प्रतिक्रिया नोंदवाल तेव्हा त्याखाली या नोटपॅड फाईल मध्ये सेव्ह केलेला कोड कॉपी पेस्ट करा.

ब्लॉगपोस्टच्या खाली सही कशी कराल?

ब्लॉगवरील प्रत्येक पोस्टच्या खाली आपली मस्त वळणदार सही असल्यास कशी दिसेल? अर्थातच चांगलीच दिसणार.  तुम्हालासुद्धा तुमची सही ब्लॉगपोस्टच्या खाली करता येऊ शकते. 

ब्लॉगसाठी अ‍ॅनिमेटेड घड्याळ
आपल्या ब्लॉगसाठी एक नविन ‍अ‍ॅनिमेटेड घड्याळ. यात आहे तारीख, वार, महिना, साल आणि तास, मिनिट व सेकंद म्हणजे सगळे काही. आणि यावर आपण जसा माउस फिरवाल तसे हे घड्याळ हालचाल करते. शिवाय हे घड्याळ चालू आणि बंद करण्यासाठी बटन सुद्धा आहे.

फायरफॉक्स ब्राऊजरसाठी मराठी अ‍ॅड ऑन

आपण जर फायरफॉक्स ब्राऊजर वापरत असाल तर, मराठीतून शुद्धलेखन तपासण्यासाठी (Spell Checking) मराठी डिक्शनरी ९.१ ही एक उत्तम अ‍ॅड ऑन सुविधा आपणासाठी उपलब्ध आहे.

ब्लॉगवरील पोस्ट्स ट्विटरवर आणि फेसबुकवर आपोआप कशा प्रसिद्ध कराव्यात?


मी ब्लॉग सुरु केल्यापासून माझ्या ब्लॉगवरील पोस्ट्स ट्विटरवर आणि फेसबुकवर काही प्रसिद्ध होत नव्हत्या. आणि त्या आपोआप कशा प्रसिद्ध करायच्या याचीही मला कल्पना नव्हती. मग पुढे काही दिवसांनी गुगल फीड मध्ये Socialize एक नावाचा पर्याय यासाठी उपलब्ध आहे असं माझ्या लक्षात आलं.

ब्लॉगचा पेज लोड स्पीड कसा वाढवाल?

आपल्या ब्लॉगचे पेज लोड होण्यास लागणाऱ्या वेळेकडे आणि वेगाकडे आपण कधीतरी लक्ष दिले आहे का? नसल्यास या गोष्टीकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. कारण ही दुर्लक्षिली जाणारी गोष्टच वाचकांवर बरा किंवा वाईट प्रभाव टाकत असते.

ब्लॉगच्या हेडरमध्ये बॅनर कसे लावावे?ब्लॉगच्या हेडरमध्ये लावलेली बॅनर प्रकारातील जाहिरात पटकन्‌ वाचकांच्या नजरेत भरते. अ‍ॅडसेन्स रेडी प्रकारच्या ब्लॉग टेम्प्लेटमध्ये अशी जाहिरात करण्याची सोय आधीच असते. पण जर अशी सोय नसेल तरीही ब्लॉगच्या हेडरमध्ये बॅनर जाहिरात कशी करावी हे आपण पाहू.

डोमेन नेम विकत घेताना...भाग १

हल्ली कशाकशाचा सेल सुरु असेल ते सांगता येत नाही, कारण सध्या डोमेन नेम्सचा ही सेल सुरु आहे. अगदी ९९ रुपया पासून तुम्हाला या सेलमध्ये .in, .co.in अशा प्रकारची डोमेन नेम्स उपलब्ध होतील. त्यामुळे साहजिकच फक्त शंभर रुपयात तर डोमेन नेम रजिस्ट्रेशन होतंय तर मग काय हरकत आहे. चला आपली स्वतःची एक वेबसाईट चालू करून टाकू किंवा आपल्या ब्लॉगसाठी एक डोमेन नेम घेऊन टाकू असे विचार मनात डोकावणे साहजिकच आहेत.

ब्लॉगवर 'ताज्या प्रतिक्रिया' (Recent Comments) कशा दर्शवाव्यात?

तुम्हाला जर तुमच्या ब्लॉगवर जर 'ताज्या प्रतिक्रिया' (Recent Comments) दाखवायच्या असतील तर, एका फार सोप्या पद्धतीने तुम्ही त्या दाखवू शकता.

१. प्रथम डॅशबोर्ड मधून Design -> Page Elements हा पर्याय निवडा.

मराठी ब्लॉग्स डिरेक्टरी

सध्या मराठी ब्लॉग्जची नोंदणी करणारी मराठी ब्लॉग विश्व, मराठीसूची, मराठी मंडळी, मराठी ब्लॉग जगत, ब्लॉगकट्टा नेटभेट ही संकेतस्थळे तर सर्वपरिचित आहेतच, पण आणखीन एक 'मराठी ब्लॉग्स डिरेक्टरी' या नावाचे बऱ्याच लोकांना फारसे माहित नसलेले एक मराठी ब्लॉगची नोंदणी करणारे संकेतस्थळ सुरु झालेले माझ्या पाहण्यात आले आहे.

ब्लॉगच्या मुखपृष्ठावर लेखांची फक्त शीर्षकेच कशी दाखवावीत?

ब्लॉगच्या मुखपृष्ठावर सर्वसाधारणपणे नेहमी लेखाचे शीर्षक, चित्रे व मजकूर असे चित्र  वाचकांना दिसत असते.

पण त्याऐवजी ब्लॉगच्या मुखपृष्ठावर लेखांची फक्त शीर्षकेच (Links Only) कशी दाखविता येतील ते आज आपण या लेखात पहाणार आहोत.

गुगलच्या अ‍ॅडसेन्ससाठी प्रयत्न करताय?

जर तुमचा मराठी ब्लॉग असेल, आणि तुम्ही जर त्यावर जाहिराती मिळाव्यात म्हणून गुगलच्या अ‍ॅडसेन्ससाठी प्रयत्न करत असाल तर गुगलच्या अ‍ॅडसेन्स संदर्भातील काही धोरणांची माहिती होण्यासाठी हा लेख अवश्य वाचावा.

तुमच्या ब्लॉगच्या टेम्प्लेटचे डिझाईन तुम्ही स्वतःच करा

तुमच्या ब्लॉगसाठी तुम्ही अनेक टेम्प्लेट पहिल्या असतील, त्यातील काही वापरल्या असतील. पण असे करताना तुम्हाला प्रत्येक टेम्प्लेटमध्ये काही गोष्टी पाहिजे होत्या अथवा नको होत्या असे वाटलेही असेल, पण प्रोग्रामिंग लँग्वेजेसची माहिती नसणाऱ्या नविन ब्लॉगर्सना असे काही बदल करणे शक्य नाही. पण म्हणून त्यांनी नाराज होण्याचे कारण नाही.

पोस्टच्या खाली इतर पोस्टच्या लिंक्स कशा अ‍ॅड कराव्यात?

इतरांचे काही ब्लॉग पहात असताना त्या ब्लोगवर पोस्टच्या खालील भागात त्याच ब्लॉगवरील इतर पोस्टच्या लिंक्स इमेजेसह पाहून मला त्या पोस्टच्या खाली कशा अ‍ॅड केल्या असतील याबाबत कुतूहल वाटत होते.

मग मी त्या अनुषंगाने इंटरनेटवर सर्च करून माहिती मिळविली. ही सुविधा माझ्या ब्लॉगवर अ‍ॅड केली. आणि हीच माहिती तुम्हालाही द्यावी, याच उद्देशाने हा लेख लिहला आहे.

LinkWithin याचं हे विजेट आहे. हे विजेट आपल्या ब्लॉगवर अ‍ॅड केल्यावर आपल्या ब्लॉगवरील इतर पोस्टच्या लिंक्स आपोआपच सर्व पोस्टच्या खाली प्रदर्शित केल्या जातात.

ब्लॉगच्या लेखातील अक्षरांचा साईज व रंग कसा बदलावा?

तुमच्या ब्लॉगवरील लेखासाठी वापरलेला फॉन्टचा साईज जर लहान असेल किंवा मोठा असेल तर ब्लॉगच्या वाचकांना ते गैरसोयीचे ठरू शकते. अशावेळी जर तुम्ही तुमच्या ब्लॉगवर फॉन्टचा साईज लहान अथवा मोठा करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली तर वाचकांना ते सोईचे तर ठरेलच पण वाचक समाधानी झालेले पाहून तुम्हालाही आनंद होईल. आणि या सुविधेसोबत फॉन्टचा रंग बदलण्याचीही सोय असेल तर ते अधिकच रंगतदार होईल.

अशी सोय उपलब्ध करून देणारे एक विजेट तुमच्या ब्लॉगमध्ये जोडून तुम्ही ही सुविधा वाचकांसाठी उपलब्ध करून देऊ शकता.

हे विजेट लेखामधील मजकुराचा रंग काळा, पांढरा, निळा व राखाडी (ग्रे) रंगात बदलण्याची सोय उपलब्ध करून देते.

हे विजेट लेखामधील मजकुराचा साईज १०, १२, १४ व १६ याप्रमाणे लहान मोठा करण्याची सुविधा उपलब्ध करून देते.

अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही हे विजेट तुमच्या ब्लॉगमध्ये जोडू शकता.

१. तुमच्या ब्लॉगच्या अकाऊंटमध्ये लॉगइन व्हा.
२. डॅशबोर्ड--> डिझाईन-->एडीट एचटीएमएल हा पर्याय निवडा.
३. स्क्रोलडाऊन करून ब्लॉगच्या टेम्प्लेटमधील </head> हा टॅग शोधा.
४. खालील कोड कॉपी करून </head> या टॅगच्या "आधी" पेस्ट करा.

<script type="text/javascript" src="http://code.jquery.com/jquery-latest.js"></script>

५. टेम्प्लेट सेव्ह करा.
६. आता Page Elements मध्ये जाऊन तुम्हाला जेथे हा विजेट लावयचा आहे तेथील 'Add a Gadget' हा पर्याय निवडा.
७. त्यातून 'HTML/Javascript' हा पर्याय निवडून खालील कोड कॉपी करून पेस्ट करा.

<!-- Code Begins -->
<!-- http://TheUnnecessaryWorld.co.cc -->
<style type="text/css">
/** TUW Font Color and Size Change widget begins **/
#tuw-font-change-widget {width: auto;}
#tuw-font-change-widget h2 {margin: 0 0 8px 0 !important;font: 12px Tahoma !important;font-weight: normal !important;border: 0 !important;}
#tuw-font-change-widget ul {width: auto; overflow: hidden;margin: 0 0 20px !important;padding: 0 !important;list-style; none !important;}
#tuw-font-change-widget ul li {width: 20px !important;height: 20px !important;overflow: hidden;margin: 0 10px 0 0 !important;padding: 2px !important;display: block !important;float: left !important;border: 1px solid #CCCCCC !important;}
#tuw-font-change-widget ul li a {width: 20px !important;height: 20px !important;display: block !important;line-height: 18px !important;text-align: center !important;color: #FFFFFF !important;font-size: 11px !important;font-family: Tahoma !important;text-decoration: none !important; outline: 0 !important;}
#fcw-black { background: #000000 !important; } #fcw-white { background: #FFFFFF !important; } #fcw-blue { background: #0066CC !important; } #fcw-gray { background: #666666 !important; }
#fcw-color a { text-indent: -999px !important; }
#fcw-size a { text-indent: 0 !important; background: #333333 !important; }
/** TUW Font Color and Size Change widget begins **/
</style>
<script type="text/javascript">
$(document).ready(function(){
// Change Font Color -- begins
$(" #fcw-color #fcw-black ").click(function() {
$(" .post-body ").css({ color: "#000000" });
return false;
});

$(" #fcw-color #fcw-white ").click(function() {
$(" .post-body ").css({ color: "#FFFFFF" });
return false;
});

$(" #fcw-color #fcw-blue ").click(function() {
$(" .post-body ").css({ color: "#0066CC" });
return false;
});

$(" #fcw-color #fcw-gray ").click(function() {
$(" .post-body ").css({ color: "#666666" });
return false;
});
// Change Font Color -- ends

// Change Font Size -- begins
$(" #fcw-size #fcw-10 ").click(function() {
$(" .post-body ").css({ fontSize: "10px" });
return false;
});

$(" #fcw-size #fcw-12 ").click(function() {
$(" .post-body ").css({ fontSize: "12px" });
return false;
});

$(" #fcw-size #fcw-14 ").click(function() {
$(" .post-body ").css({ fontSize: "14px" });
return false;
});

$(" #fcw-size #fcw-16 ").click(function() {
$(" .post-body ").css({ fontSize: "16px" });
return false;
});
// Change Font Size -- ends
});
</script>
<!-- TUW Blogger Change Font color and size widget begins -->
<div id="tuw-font-change-widget">
<div class="tuw-fcw">
<h2> Change Font Color </h2>
<ul id="fcw-color">
<li> <a id="fcw-black" href="#">black</a> </li>
<li> <a id="fcw-white" href="#">white</a> </li>
<li> <a id="fcw-blue" href="#">blue</a> </li>
<li> <a id="fcw-gray" href="#">gray</a> </li>
</ul>
</div>

<div class="tuw-fcw">
<h2> Change Font Size </h2>
<ul id="fcw-size">
<li> <a id="fcw-10" href="#">10</a> </li>
<li> <a id="fcw-12" href="#" title="Default Size">12</a> </li>
<li> <a id="fcw-14" href="#">14</a> </li>
<li> <a id="fcw-16" href="#">16</a> </li>
</ul>
</div>
</div>
<!-- TUW Blogger Change Font color and size widget ends -->
<!-- Code ends -->

८. सेव्ह करा.

आणि आता फॉन्टचा साईज लहान/मोठा करण्याची तसेच रंग बदलण्याची सुविधा उपलब्ध करणारे विजेट तुमच्या ब्लोगवर दिसू लागेल.